Buying new home tips- वास्तुशास्रानुसार काही गोष्टी फॉलो केल्यास काही समस्या कायमच्या दूर होऊ शकतात. खरंतर वास्तुशास्रात काही मुख्य गोष्टींबद्दल उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये घराची दिशा आणि कोणत्या गोष्टी कुठे ठेवल्या पाहिजेत याबद्दल स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. अशातच जर तुम्ही नवं घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे. वास्तुशास्रानुसार घर ज्या पद्धतीने बांधले गेले आहे त्यामधून तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या एनर्जी मिळतात. जेथे पॉझिटिव्ह एनर्जी असते त्या घरात नेहमीच आनंदी वातावरण दिसते. याउलट निगेटिव्ह एनर्जीमुळे आर्थिक समस्या आणि आजारपण येते.
घरात वास्तुदोष असेल तर आयुष्यभर समस्या येत राहतात. आयुष्यात अयशस्वीपणा येतो आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. अशातच वास्तुशास्रात घरासंबंधित काही उपाय सांगण्यात आले आहे. ज्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष हा दूर होऊ शकतो. घरात सुख-समृद्धी येऊ शकते.त्यामुळे नवं घर खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात या संदर्भात आपण जाणून घेऊयात.
घराचा मुख्य गेटची दिशा
वास्तुनुसार घराचा मुख्य गेट म्हणजेच प्रवेशद्वार हे उत्तर दिशेला असेल तर शुभ मानले जाते. मात्र जर घराचा मुख्य दरवाजा या दिशेला नसेल तर प्रयत्न करा की त्याची दिशा उत्तर-पूर्व राहिल.

घराचा आकार
नवं घर खरेदी करताना त्याच्या आकारावर जरुर लक्ष द्या. कारण वास्तुशास्रातील नियमानुसार घर हे चौकोनी किंवा आयाताकृती असावे. जर तुम्ही एखादी जमीन जरी खरेदी करणार असाल तर त्याचा आकार सुद्धा याच पद्धतीने असेल तर उत्तम. या गोष्टी तुमच्या घरासाठी सकारात्मक ठरु शकतात.
घरातील खोलींच्या दिशा
वास्तुशास्रात सांगण्यात आले आहे की, घरातील किचनची दिशा ही चुकीची असेल तर फार मोठी चुक असते. कारण किचन हे दक्षिण पूर्व दिशेला असावे असा सल्ला दिला जातो.तर मास्टर बेडरुम पश्चिम दिशेला आणि मुलांची खोली ही उत्तर पूर्व दिशेला असावी. नव्या घराचा नकाशा तयार करताना या खोल्यांच्या दिशांकडे विशेष लक्ष द्या.
हे देखील वाचा- घरातील ईशान्य दिशेचे वास्तुशास्रात काय आहे महत्व?
सुर्योदयाचा प्रकाश
असे म्हटले जाते की, सुर्योदयाचा प्रकाश येत नाही तर ते अशुभ मानले जाते. त्याचसोबत वास्तुनुसार घरात जर सुर्यकिरणे येत असतील तर पॉझिटिव्ह एनर्जी टिकून राहते. लक्षात असू द्या सूर्यास्तावेळी सूर्याची किरणे तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पडली नाही पाहिजेत. कारण वास्तुसाठी हे वाईट मानले जाते.(Buying new home tips)
घरात असू द्या ही रिकामी जागा
वास्तुनुसार घरातील उत्तर-पूर्व दिशा रिकामी ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे घरात पॉझिटिव्हिटी येते आणि घरातील सदस्यांना आजारपणापासून दूर ठेवते. त्याचसोबत घरातील देव्हाऱ्यासाठी उत्तर आणि पूर्व दिशेचा कोपरा निवडावा.