लॉकडाऊन संपल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीने जणू कात टाकली आहे. एकामागून एक चित्रपट येत आहेत आणि ते सुपरहिटही होत आहेत. या सर्व चित्रपटांमध्ये नानाविध विषय हाताळते जात आहेत. विषयांमध्ये असणारं नावीन्य आणि वैविध्य यामुळे प्रेक्षक आपोआपच या चित्रपटांकडे वळत आहेत. तसंच आगामी झाला आणि प्रेक्षकांच्यामराठी चित्रपटांची आतुरतेनं वाटही पाहत आहेत. यापैकीच एक बहुचर्चित चित्रपट म्हणजे ‘दगडी चाळ २’. (Dagadi Chawl-2)

‘दगडी चाळ २’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता शिगेला पोचली. टपरीपासून मॉलपर्यंत सर्वत्र याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे. (Dagadi Chawl-2)

‘अरुण गुलाब गवळी’ उर्फ ‘डॅडी’! मुंबईतील गॅंगवॉरमधील हे सर्वात मोठं नाव. त्यांच्या ‘दगडी चाळी’वर आधारित ‘दगडी चाळ’ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्याप्रमाणे डॅडींनी एक काळ अवघ्या मुंबईवर राज्य केलं, तसंच या चित्रपटाने रसिक प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केलं. दगडी चाळ या लोकप्रिय चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजेच सिक्वल ‘दगडी चाळ २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच या चित्रपटाचा ऑफिशिअल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.(Dagadi Chawl-2)
या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टरचे अनावरण ‘रिअल डॅडीं’च्या हस्ते दगडी चाळीत झालं आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित ‘दगडी चाळ २’ (Dagadi Chawl-2)या चित्रपटाचं दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केलं असून, कार्यकारी निर्माता आहेत रत्नकांत जगताप. सोशल मीडियावर या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. इंस्टाग्रामवर ‘फिल्टर’ वापरून कलाकार त्याचं जोरदार प्रमोशन करत आहेत. एकंदरीतच “काय तो ट्रेलर, काय ते ॲक्टर, काय तो फिल्टर… एकदम ‘ओक्के’ मध्ये आहे सगळं…(Dagadi Chawl-2)