जर तुम्ही सुद्धा नोकरी करत असाल आणि अशातच सण उत्सव जवळ आले की सुट्ट्यांची रांग लागते. प्रत्येकजण विकेंडसाठी वाट पाहत असतो. परंतु तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे सुद्धा आपल्यासारख्या सुट्ट्या घेत असतील का? तुम्हाला असे ही वाटत असेल हे दोघे सुद्धा त्यांना वाट्टेल तेव्हा सुट्टी घेत असतील. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याकडे पंतप्रधानाचे पद आल्यानंतर आजवर एक ही सुट्टी घेतलेली नाही. तर सामान्य नागरिकांप्रमाणे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना सुट्टी घेता येते? याबद्दलच आज सविस्तर जाणून घेऊयात.(PM & President holiday)
राष्ट्रपतींकडे किती सुट्ट्या असतात?
राष्ट्रपती देशाचे प्रथम नागरिक असतात. त्यांना विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. त्यामध्ये त्यांना काही शासकीय सुविधांचा सुद्धा लाभ घेता येतो. वेतनाच्या रुपात त्यांना प्रत्येक महिन्याला ५ लाख रुपये मिळतात. या व्यतिरिक्त भोजन, कर्मचारी आणि राष्ट्रपतींकडून केल्या जाणाऱ्या स्वागतासाठी सुद्धा वेगळा पैसा दिला जातो. अशातच त्यांना काही सुट्ट्या सुद्धा दिल्या जातात. ते आपल्या परिवारासोबत हैरदाबाद मधील राष्ट्रपती निलायम किंवा शिमला मधीस रिट्रीट इमारतीत राहू शकतात.
देशाच्या पंतप्रधानांना किती सुट्ट्या असतात?
देश चालवण्याची खरी जबाबदारी पंतप्रधानांकडे असते. मंत्रीमंडळात हेराफेरी, सत्ता पालट, युद्ध-शांति आणि आपत्कालीन स्थितीत पंतप्रधानंची जबाबदारी आणखी वाढते. पंतप्रधानांच्या सुट्टी संदर्भात आरटीआयच्या उत्तरात पंतप्रधानांनी असे म्हटले की, देशाचे पंतप्रधान नेहमीच ऑन ड्युटी असतात. खरंतर देशाच्या पंतप्रधानांना कोणत्याही स्वरुपात अधिकृत सुट्टी मिळत नाही. त्याचसोबत यापूर्वीच्या पंतप्रधानांना सुद्धा सुट्टी दिल्याचे किंवा घेतल्याचा रेकॉर्ड सुद्धा नाही.
हे देखील वाचा- राज्यसभेतील खासदारांना ‘हे’ नियम पाळावे लागतात

सुट्टी संदर्भात काय आहे नियम?
आरटीआयच्या उत्तरात पीएमओ यांनी असे म्हटले होते की, या संदर्भातील कोणताही रेकॉर्ड आमच्याकडे नाही, परंतु मोदी यांनी जेव्हापासून पंतप्रधानाची कमान आपल्या हाती घेतली आहे तेव्हापासून त्यांनी आजवर सुट्टी घेतलेली नाही. प्राप्त माहितीनुसार पीएम आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांच्या सुट्टी संदर्भात ही नियम नाही. यासाठी कधीच सुट्टीसाठी अर्ज द्यावा लागत नाही.
पंतप्रधानांची सुट्टी असेल तर कारभार कोण सांभाळतं?
पंतप्रधान आजारी आहेत किंवा एखाद्या कारणास्तव आपले काम करु शकत नाहीत तर ते पक्षातील एखाद्या सदस्याला आपला कार्यभार सोपवू शकतात. जेव्हा पीएम ऑफिसमध्ये नसतात तेव्हा कोणताही मोठा निर्णय घेतला जात नाही. तेव्हा कॅबिनेट सेक्रेटरी एक नोट तयार करतात. त्यात असे सांगितले जाते की, पीएम यांच्या अनुउपस्थितीत दुसरा वरिष्ठ मंत्री कॅबिनेटची बैठक घेईल. पंतप्रधानांचा जेव्हा परदेशी दौरा असतो त्यावेळी ही प्रक्रिया वापरली जाते. दरम्यान, पंतप्रधानांच्या आकस्मित मृत्यूनंतर राष्ट्रपती स्वत: किंवा आपल्या सल्ल्यानुसार एखाद्या मंत्र्याला या पदाची जबाबदारी देऊ शकतात.(PM & President holiday)
राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत कोण कारभार पाहतं?
राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांच्या कारभाराची जबाबदारी ही उपराष्ट्रपतींकडे असते. राष्ट्रपतींचा मृत्यू, राजीनामा, बरखास्त किंवा अन्य कारणामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रपतींच्या रिक्त पदाच्या स्थितीत नव्या राष्ट्रपतींची निवड होण्यापर्यंत,जो कोणत्याही परिस्थितीत पद रिक्त झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांपेक्षा अधिक नसावी.