रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचा खास सण आहे. हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा जर पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल, तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला ‘रक्षाबंधन’ म्हणतात. (Rakshabandhan 2022 Shubh Muhurt)
या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. यंदा लोकांमध्ये रक्षाबंधनबाबत चांगलाच संभ्रम दिसून येत आहे. काही ठिकाणी गुगलवर सर्च केल्यास 11 तारखेला रक्षाबंधनाचा सण सांगितला जात आहे, तर काही ठिकाणी 12 ऑगस्टला (Raksha Bandhan 2022 date in India) रक्षाबंधनाचा सण सांगितला जात आहे. तुम्हीही अशा संभ्रमात असाल, तर हा लेख जरूर वाचा. या लेखात आम्ही तुम्हाला येथे रक्षाबंधनाची अचूक तारीख आणि राखी बांधण्याची शुभ वेळ सांगणार आहोत. (Rakshabandhan 2022 Shubh Muhurt)
रक्षाबंधन २०२२ नेमके कधी आहे?
हिंदू धर्मात वैदिक काळापासून प्रत्येक सणात भाद्रची विशेष काळजी घेतली जाते. यावेळी राखीच्या दिवसामध्ये ही भाद्र कालावधी असणार आहे. त्यामुळे राखी कधी बांधणार याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. वास्तविक भद्रकाल हे धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत अशुभ मानले जाते. या काळात कोणतेही काम करताना अडथळे व अडचणी निर्माण होतात. त्यामुळे काही ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, यावेळी 12 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जाईल असे सांगितले जात आहे. (Rakshabandhan 2022 Shubh Muhurt).
====
हे देखील वाचा – या आठवड्यात कोणत्या राशींवर राहणार ग्रहांची कृपा आणि कोणत्या राशींवर होणार प्रकोप?
====
जाणून घ्या भद्रकालची वेळ (Rakshabandhan 2022 Shubh Muhurt)
– भद्रकाल – 11 ऑगस्ट 2022 रोजी
– भाद्र पूंछ संध्याकाळी 5:17 वाजता सुरू होईल आणि 6.18 वाजता संपेल.
– भाद्र मुख संध्याकाळी 6.18 पासून सुरू होऊन रात्री 8 वाजेपर्यंत राहील.
– या दरम्यान बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधणे टाळावे.
– काही कारणास्तव भद्रकालात राखी बांधावी लागली तर प्रदोषकाळात अमृत, शुभ आणि लाभाची वेळ पाहून राखी बांधता येईल.
– 11 ऑगस्ट रोजी अमृत काळ संध्याकाळी 6.55 ते 8.20 पर्यंत असेल.
राखीसाठी सर्वात शुभ मुहूर्त 12 तारखेला सूर्योदयानंतर सकाळी 07:17 पर्यंत आहे. अशा परिस्थितीत 11 रोजी सकाळी 08.30 ते 12 ऑगस्ट रोजी सकाळी 07.18 पर्यंत राखी बांधण्यासाठी सर्वात योग्य वेळ आहे.
राखी बांधण्याची योग्य पद्धत:
रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीला राखी बांधताना पूर्वेकडे तोंड करून बसावे. तसेच राखी बांधताना बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे. यानंतर राखीच्या ताटात अक्षता, कुंकू, चंदन, तुपाचा दिवा ठेवा. सर्वप्रथम भावाच्या कपाळावर चंदन किंवा कुंकू व अक्षत लावावी. यानंतर भावाची आरती करावी. नंतर भावाच्या मनगटावर राखी बांधावी व मिठाई भरवून त्याचे तोंड गोड करावे. राखी बांधताना भावाचे डोके उघडे राहू नये हे लक्षात ठेवा.