भारतात कोणत्याही गोष्टीची अफवा ही वाऱ्यासारखी पसरली जाते आणि लोक त्यावर विश्वास ठेवतात. आपण पाहतो की, अशा बनावट अफवांवर विश्वास ठेवल्याने काही मोठ्या घटना घडतात. यामध्ये काहींचा जीव जातो तर काहींना विनाकारण शिक्षा होते. कोरोनाच्या काळात आपण पाहिले की, प्रत्येक जण आरोग्याची काळजी घेण्यासाठी खुप उपाय करत होते. परंतु त्याच दरम्यान सुद्धा खुप अफवा या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या गेल्या. आता सुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टींवरुन अफवा पसवरल्या जातात यामुळे व्यक्तीची फसवणूक होते. परंतु तुम्हाला माहिती आहे का भारतात यापूर्वी सुद्धा पसरलेल्या काही अफमांवमुळे मोठी खळबळ उडाली होती. तर त्या कोणत्या होत्या हेच आपण आज जाणून घेऊयात.(India’s big rumors)
-देशात जानेवारी २०१७ पासून ६९ वेळा मुलं चोरी झाल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत ३३ जणांपेक्षा अधिकांची हत्या झाली आहे. या सर्व हत्या व्हॉट्सअॅपवर पसरल्या गेलेल्या बनावट मेसेजमुळे झाल्या. लोकांनी अशा मेसेजवर विश्वास ठेवत निर्दोषी व्यक्तींचा सुद्धा जीव घेतला आहे. नंतर यामागील सत्य अशावेळी समोर आले जेव्हा व्हॉट्सअॅपवर मुद्दाम अशा प्रकारचे मेसेज पसरवले जात आहेत.
-दुसरी अफवा अशी पसरली होती की, २०१७ मध्ये देशातील काही राज्यांमध्ये वेणी बांधलेले भूत. कश्मीर ते राजस्थान, युपी, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात अशा घटना झाल्या जेथे मुलींचे आणि महिलांची केस कापण्यात आली. परंतु हे कोण करत होते आणि कोण होते हे कधीच समोर आले नाही.
-हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात पाटा-वरवंट्याने ठेचून मारणाऱ्या वृद्ध महिलेची अफवा तुफान पसरली होती. २०१५ मध्ये देशाच्या उत्तर भागात अधिकच पसरल्याने लोक खुप घाबरली होती. मात्र नंतर ही अफवा फक्त एक गैरसमज असल्याचे समोर आले.(India’s big rumors)
हे देखील वाचा- काबा मधील काळ्या दडगाचे रहस्य, ‘या’ कारणास्तव हज यात्रेकरु घेतात चुंबन
-लोकांची मुंडकं कापणाऱ्याची अफवा ही २००२ मध्ये पूर्व उत्तर भारतात खुप पसरली होती. या अफवेमुळे काही लोक जखमी सुद्धा झाले होते. खुप प्रयत्न केल्यानंर ही खरं समोर आले नाही. लोकांची मुंडकं कापणाऱ्याची दहशत ही एकाच नव्हे तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये आणि गावांमध्ये पसरली होती. यामध्ये काही घटना सुद्धा समोर आल्या होत्या. त्याच्याबद्दल ऐवढी भीती निर्माण झाली होती की, लोकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर जाणे बंद केले होते. मात्र अशा प्रकारचा व्यक्ती कधीच कोणाच्या हाती लागला नाही.
-२००१ मध्ये दिल्ली आणि एनसीआर मध्ये काळ्या माकडाची अफवा पसरली होती. त्याला मंकी मॅन असे बोलले जात होते. या ठिकाणी मंकी मॅन कडून हल्ला केला जात असल्याच्या घटना समोर येत होत्या. नंतर मंकी मॅनची अफवा ही देशातील काही ठिकाणी खुप पसरली गेली. मात्र मंकी मॅन हा नक्की कोण आहे हे कोणालाच कळले नाही आणि कोणाच्या हाती सुद्धा लागला नाही. पण लोकांचा विश्वास होता की, कोणतरी यामागे असून तो हे सर्व करत आहे.