सोशल मीडियात नेहमीच काही ना काही गोष्टी खुप व्हायरल होत असतात. अशा काही गोष्टी लोकांच्या मनाला भावतात आणि त्याचे कौतुक ही केले जाते. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांना विविध आजार हे वयाच्या ४० शी नंतर सुरु होतात. तर वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत व्यक्तीची हालचाल होणे फार कमी होते. अशातच आता एका ९० वर्षीय वृद्धाने तब्बल १५०० फूट उंचीवरुन उडी मारली. खरंतर त्यांनी ही उडी आपल्या पत्नीच्या रुग्णालयासाठी मारली होती.(90 year old men skydiving)
तर ब्रिटेनच्या नॉर्थ यॉर्कशायर मध्ये राहणाऱ्या ९० वर्षीय फ्रँन्क वार्ड यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात खुप व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी चक्क १५०० फूट उंचीवरुन खाली उडी मारली आहे. या व्हिडिओला लोकांनी खुप प्रतिसाद ही दिला असून त्यांचे कौतुक ही करण्यात येत आहे.
नर्सिंग होमसाठी एकत्रित करायचे होते पैसे
ऑनलाईन मीडिया रिपोर्ट्सनुसा, फ्रँन्क वार्ड यांची पत्नी एका नर्सिंग होमध्ये अॅडमिड आहे. तर एकेदिवशी ते आपल्या पत्नीला भेटण्यासाठी गेले असता तेथे त्यांनी पाहिले की, व्हिलचेअर कमी आहे. यामुळे तेथील रुग्णांना खुप त्रास सुद्धा होत आहे. अशातच फ्रँन्क यांनी आपल्या पत्नीसोबत याबद्दल बातचीत केली असता त्यांनी असे म्हटले की, फंडाच्या कमतरतेमुळे अशी स्थिती आहे. तेव्हाच त्यांनी ठरविले की, ते कसे ही करुन पैसे एकत्रित करती आणि रुग्णालयासाठी व्हिलचेअर खरेदी करतील.(90 year old men skydiving)
हे देखील वाचा- आई, वडील, मुलीसह जावयाने सर्वाधिक जिंकलेत Noble Prize
निवृत्त सैनिकासोबत त्यांनी केले स्कायडायव्हिंग
यासाठी त्यांनी स्कायडायव्हिंग करण्याकरिता एका निवृत्त सैनिकाची मदत घेतली. त्यांच्यासोबत फ्रँन्क यांनी १५०० फूटावरुन उडी मारली. व्हिडिओमध्ये ते अत्यंत खुश असल्याचे दिसून येत आहेत. त्याचसोबत चेहऱ्यावरील भीती सुद्धा दिसत आहे. मार्केटिंग मॅनेजरच्या पदावरुन निवृत्त झालेले माजी पैराट्रूपर फ्रँक वार्ड गेल्या आठवड्याच आणखी एका माजी सैन्य सैनिकाच्या सोबतीने स्कायडायव्हिंग केले होते. त्यांना मिळालेल्या दानातून २ हजार पाउंडपेक्षा अधिक रक्कम मिळाली. जी आता ते त्या नर्सिंग होमला दान करणार आहेत जेथे त्यांची ८१ वर्षीय पत्नी मार्गरेट गेल्या १८ महिन्यापांसून होती. फ्रँक यांनी म्हटले की, जेव्हा तुम्ही १५०० फूटावरुन खाली येता तेव्हा ५० सेकंदात जवजवळ १० हजार फूट खाली पडता आणि त्यानंतर तुम्ही पॅराशूटच्या आधाराने उत्तम प्रकारे तरंगता.