संपूर्ण उत्तर भारत कडाक्याच्या थंडीमुळे गारठला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), बिहारच्या अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी आणि दाट धुके अशी स्थिती आहे. पुढील दोन ते तीन दिवसांसाठी या भागात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. या थंडीचा सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम होत आहे. हा परिणाम किती व्यापक आहे, याचे गंमतीशीर उदाहरण उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) घडले. उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये एका 9 वर्षाच्या मुलाने 112 वर कॉल करून पोलिसांना बोलावले. यामागचे कारण ऐकून पोलीसही चक्रावले. कारण या मुलानं पोलिसांना आईची तक्रार करण्यासाठी बोलवले होते आणि यात आईची चूक काय, तर ती तिच्या मुलाला आंघोळ करण्यासाठी आग्रह करत होती. जिथे पाण्याचाही बर्फ होतोय, अशा थंडीत आईनं आंघोळ करण्यासाठी आग्रह धरणा-या आईविरुद्ध 9 वर्षाच्या मुलानं थेट पोलीसांमध्ये तक्रार केल्यानं ही थंडीची तिव्रता किती असेल याचा अंदाज येतोय.

उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) एका लहान मुलानं आपल्या आईविरोधात तक्रार केल्याची बातमी सर्वत्र चर्चिली गेली. मात्र या सर्वात जिथे अशी कडाक्याची थंडी पडते, तिथे नियमीत आंघोळ केली जाते का आणि आंघोळ करतांना काय काळजी घ्यावी याची माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नियमीत आंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत. मुळात शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करावी. तसेच आंघोळ करतांना शरीराला मसाजही करता येतो. त्यातून शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. अशा पद्धतीनं आंघोळ केल्याने शरीराची रक्ताभिसरण क्रिया सुधारते आणि सांधे आणि स्नायूंचेही दुखणे कमी होते. आंघोळ केल्यानं युरिनरी इन्फेक्शन, प्रसूती वेदना, पीरियड क्रॅम्प्स, मूळव्याध आणि फिशर या वेदनांमध्येही आराम मिळतो, असे सांगण्यात आले आहे.
मात्र असे असले तरी आंघोळ करतांना काळजी घ्यावी लागते. विशेष करुन आत्ता जशी कडाक्याची थंडी पडली आहे, तिथे विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीच्या दिवसात थंड पाण्यानं आंघोळ करु नयेच. आंघोळ करतांना प्रथम एकदम शरीरावर पाणी टाकू नये. थोडंथोडंपाणी मानेवर टाकून आंघोळीची सुरुवात करावी, अशानं तणावाची पातळी कमी होते. थंडीच्या दिवसांमध्ये आंघोळ करताना कुठल्या साबणाचा वापर करावा हाही प्रश्न असतो. शक्यतो, अशा ठिकाणी आंघोळ करताना शरीरावर दूध आणि हळद यांचे मिश्रण लावून त्यानं शरीराला थोडा मसाज करत आंघोळ केली तर त्याचा फायदा होतो. यात थोडं खोब-याचं तेल टाकलं तर शरीराची त्वचाही मुलायम रहायला मदत होते. आंघोळीनंतर चांगल्या दर्जाचे मॉइश्चरायझर वापरले तरीही तुमची त्वचा मुलायम रहाण्यास मदत होईल. थंडी असेल तेव्हा शक्यतो आंघोळीपूर्वी शरीराला तेल लावून हलक्या हातानं मसाज करावा. यामुळे रक्ताभिसरण वाढेल, तणाव आणि नैराश्य दूर होते. थंडीच्या दिवसात बदाम तेल, खोबरेल तेल किंवा ऑलिवचे तेलही फायदेशीर पडते. असा मसाज केल्यावर शक्यतो कोमट पाण्यानं आंघोळ करावी. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना व्यायाम होतो. छातीवर वाफेचा दाब पडल्याने फुफ्फुसाची श्वास घेण्याची क्षमता वाढते.
=====
हे देखील वाचा : देशात घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ, उत्तर प्रदेश सर्वाधिक पुढे
=====
सध्या देशाच्या राजधानीत थंडीची मोठी लाट आली आहे. याआधी जानेवारी 2013 मध्ये अशी थंडी पडली होती. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अशीच परिस्थिती काही दिवस राहणार आहे. या सर्वांमध्ये शरीराची स्वच्छता आणि आंघोळ हे दोन मुद्दे चर्चेत आले आहेत. त्यातही उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) अवघ्या नऊ वर्षाच्या मुलानं थेट आपल्या आईविरोधात आंघोळीसाठी आग्रह धरल्याची तक्रार केली. ही बातमी गम्मतीचा भाग असली तरी जिथे कडाक्याची थंडी असते. पारा अगदी मायनस होऊ लागतो, तिथे रोजची आंघोळ म्हणजे एक चॅलेंजच असते. पण याच हिच आंघोळ योग्य प्रकारे केली तर शरीराची आणि त्यायोगे आरोग्याची काळजीही घेतली जाते.
सई बने