Home » 9 Minute Parenting Rule : म्हणजे नेमकं काय? तज्ज्ञ सांगतात मुलांशी भावनिक नातं मजबूत करण्याचा सोपा मार्ग

9 Minute Parenting Rule : म्हणजे नेमकं काय? तज्ज्ञ सांगतात मुलांशी भावनिक नातं मजबूत करण्याचा सोपा मार्ग

by Team Gajawaja
0 comment
9 Minute Parenting Rule
Share

9 Minute Parenting Rule : आजच्या जलदगतीच्या जीवनात पालकांकडे मुलांसाठी वेळ कमी पडतो. कामाचा ताण, घरातील जबाबदाऱ्या आणि दैनंदिन धावपळीत मुलांशी संवाद साधण्याची संधी अनेकदा दुरावते. अशा वेळी तज्ज्ञांनी सुचवलेला 9 Minute Parenting Rule हे तुटलेलं नातं जोडण्याचं प्रभावी साधन ठरत आहे. या नियमाने केवळ पालक मुलांमधील भावनिक नातं घट्ट होत नाही तर मुलांचं वर्तन, आत्मविश्वास आणि मानसिक आरोग्य देखील सुधारते.

9 मिनिट रूल’ म्हणजे काय? 9 Minute Parenting Rule हा एक सोपा पण प्रभावी पद्धत आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते, दिवसातील तीन विशिष्ट वेळा मुलं उठतात तेव्हा, शाळा/बाहेरून घरी येतात तेव्हा आणि झोपण्यापूर्वी ही तीन वेळ अत्यंत महत्त्वाची असतात. या तीन क्षणांमध्ये मिळून फक्त 9 मिनिटं मुलांना पूर्ण लक्ष दिल्यास त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. हे 9 मिनिट मुलांच्या मेंदूला ‘इमोशनल सिक्युरिटी’ देतात. या वेळेत मुलांशी जवळीक, माया आणि संवाद यांना अधिक महत्त्व दिलं जातं.

9 Minute Parenting Rule

9 Minute Parenting Rule

हे का आहे इतकं महत्त्वाचं? मुलं दिवसभर विविध भावनिक परिस्थितीतून जातात शाळा, मित्र, अभ्यास, ताण आणि नवीन अनुभव. जेव्हा ते सकाळी उठतात किंवा संध्याकाळी घरी येतात, तेव्हा त्यांना पालकांकडून मिळणारा प्रतिसाद त्यांच्या भावनिक जगावर थेट परिणाम करतो. सकाळी पालकांकडून मिळणारी सकारात्मक ऊर्जा त्यांचा दिवस चांगला बनवते, तर घरी परतल्यावर मिळणारा प्रेमळ संवाद मुलांना ताणमुक्त करतो. झोपण्यापूर्वी मिळणारे काही मिनिटांचे जवळीक क्षण मुलांच्या मेंदूतील भावनिक स्थैर्य वाढवतात. तज्ज्ञ सांगतात की, हे 9 मिनिट मुलांच्या आत्मविश्वास, संवाद कौशल्ये, वर्तन आणि शिकण्याच्या क्षमतेवर सकारात्मक परिणाम घडवतात.

9 मिनिट कसे द्यावे? सोपे उपाय या 9 मिनिटांचा अर्थ मोठा वेळ किंवा विशेष तयारी असा अजिबात नाही. सकाळी मुलांना प्रेमाने उठवणे, मिठी मारणे आणि काही प्रोत्साहनपर शब्द सांगणे हेच पुरेसे आहे. शाळेतून आल्यावर त्यांचं ऐकून घेणं, दिवस कसा गेला ते विचारणं, त्यांचा ताण हलका करणं ही छोटी पण महत्त्वाची पावलं ठरतात. रात्री झोपण्यापूर्वी दोन मिनिटांचा संवाद, गोष्ट सांगणे किंवा त्यांच्या मनातील गोष्टी ऐकून घेणे मुलांना अत्यंत सुरक्षित वाटते. पालकांनी या वेळेत मोबाईल, टीव्ही किंवा इतर विचलित करणाऱ्या गोष्टी बाजूला ठेवणे गरजेचे आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे भावनिक अटॅचमेंटचं पायभूत तत्त्व चाइल्ड सायकॉलॉजी तज्ज्ञ सांगतात की, मुलांना नेहमी मोठ्या गोष्टींची अपेक्षा नसते; त्यांना हवी असते काळजी, लक्ष आणि जवळीक. अनेकदा पालक दिवसात तासन्‌तास मुलांसोबत असतात, पण भावनिक जवळीक नसल्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. त्यामुळे 9मिनिट नियम मुलांच्या भावनिक गरजा योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या प्रभावी मानला जातो. हे 9 मिनिटं नियमित दिल्यास मुलांमध्ये सुरक्षितता, विश्वास, आत्मविश्वास आणि प्रेम या भावना नैसर्गिकपणे विकसित होतात.

=========================

हे देखिल वाचा :

Dating Trend: झिप कोडिंग म्हणजे नेमकं काय? कपल्ससाठी कसा ठरतोय फायदेशीर?                                    

Men’s Day : आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा रंजक इतिहास                                    

SBI १ डिसेंबर २०२५ पासून बंद करणार ही सर्विस खातेदारांना होईल मोठा परिणाम

===========================

मुले जितकी लहान, तितकी त्यांची भावनिक गरज अधिक. त्यामुळे 9 Minute Parenting Rule हा आजच्या व्यस्त जीवनशैलीत एक सोपा, व्यवहार्य आणि परिणामकारक मार्ग आहे. हा नियम पाळल्यास मुलांशी असलेलं भावनिक नातं बळकट होतं, संवाद सुधारतो आणि संपूर्ण कुटुंबात सकारात्मक वातावरण तयार होतं. पालकांनी केवळ 9 मिनिटांचं गुंतवणूक केल्यास मुलांचा मानसिक विकास आणि भावनिक स्वास्थ्य नक्कीच सुधारेल.

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.