आज ३० सप्टेंबर रोजी नवरात्राचा आठवा दिवस आहे. अर्थात आजची आठवी माळ असून आजचा रंग मोरपंखी आहे. नवरात्र सुरु होऊन आठ दिवस झाले आहे. आज अष्टमी असून, नवरात्रातील अष्टमी तिथीला सर्वात जास्त महत्व असते. आजच्या दिवशी देवीच्या महागौरी या रूपाची पूजा केली जाते. शिवाय अष्टमीला अनेक ठिकाणी अष्टमीला देवी समोर होम हवन केले जाते. तर महाराष्ट्रामध्ये बहुतेक लोकं अष्टमीचा उपवास करतात. ज्या लोकांना नवरात्राचे नऊ दिवस उपवास करणे शक्य नसते असे लोकं अष्टमीचा उपवास करतात. अष्टमीचा उपवास करणे देखील लाभदायक असते. (Ashtami)
काही ठिकाणी अष्टमीच्या दिवशी देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला किंवा देवीच्या पंडालच्या भोवती हळदी कुंकुवाचा सडा घालण्याची देखील पद्धत आहे. यामध्ये दोन मोठ्या तांब्यांमध्ये पाणी घ्यावे. एका तांब्यात हळद तर एकात कुंकू घालून मिक्स करावे आता देवीच्या भोवती आधी हळदीचे पाणी शिंपडत जावे आणि त्यानंतर कुंकवाचे पाणी शिंपडावे. असे केल्याने आपले सौभाग्य वाढते अशी मान्यता आहे. आजच्या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा कशी करावी? या देवीचे महत्व आदी सर्व गोष्टींबद्दल जाणून घेऊया. (Navratri 2025)
दुर्गा देवीचे आठवे स्वरुप महागौरीचे आहे. पौराणिक मान्यतेनुसार देवी महागौरी ही शिवाची अर्धांगिनी म्हणून ओळखली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. महागौरीला आदिशक्तीचेच एक रुप मानले जाते. पुराणातील काही उल्लेखांनुसार, आपल्या तेजाने संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करणारी महागौरी देवी आहे. देवीच्या या स्वरुपाला अन्नपूर्णा, ऐश्वर्य प्रदायिनी, चैतन्यमयी असेही संबोधले जाते. माता महागौरीचे रूप अत्यंत गोरे आणि दिव्य आहे. तिचा गोरा रंग शंख, चंद्र आणि कंदपुष्पासारखा मानला जातो. माता महागौरीचे वाहन बैल असून तिला चार हात आहेत. तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे आणि दुसऱ्या हातात अभय मुद्रे आहे. तिच्या डाव्या हातात डमरू आहे आणि दुसऱ्यावर वरद मुद्रा आहे. या स्वरूपात, माता महागौरी अत्यंत शांत दिसते. ती पूर्णपणे पांढरी वस्त्रे आणि दागिने घालते, म्हणूनच तिला श्वेतांबरधारा असेही म्हणतात. महागौरी ही करुणा आणि दयेची देवी मानली जाते. (Marathi News)
महागौरी पूजा विधी
अष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे आटोपल्यानंतर स्वच्छ कपडे घाला. देवी च्या मूर्तीला गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने स्नान घालावे. आईला पांढऱ्या रंगाचे कपडे अर्पण करावेत. धार्मिक मान्यतेनुसार आईला पांढरा रंग आवडतो. आंघोळीनंतर मातेला पांढरे फूल अर्पण करावे. आईला हळद कुंकू अक्षता वाहावी. नैवेद्य म्हणून मिठाई, काजू, फळे अर्पण करा. अष्टमीच्या दिवशी मुलींच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी कन्यापूजनही करावे. (Todays Marathi HEadline)
==========
Navratri : नवरात्रीमध्ये केल्या जाणाऱ्या कुंकुमार्जनाचे महत्व
==========
महागौरी मंत्र
मंत्र: या देवी सर्वभूतेषु मां गौरी रूपेण संस्था.
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
ध्यान मंत्र
वंदे वांछित कामर्थेचंद्रघकृतशेखरम् ।
सिंहरुडाचतुर्भुजामहागौरीशस्विनीम् ॥
पुणेंदुनिभंगोरी सोमवक्रस्थिथम अष्टम दुर्गा त्रिनेत्रम् ।
वराभितीकारंत्रीसुल
पातांबरपरिधानमृदुहास्यनालंकारभूषितम् ।
मंजिर, कार, केयूर, किंकिनीरत्न कुंडल मंडितम्
प्रफुल्ल वदनमपल्लवधारकांता कपोलंचैवोक्यमोहनिम ।
कमनीयनलावण्यमृणालचंदन गंध लिप्तम्| (Navratri)
स्तोत्र मंत्र
सर्वसंकट हंत्रीत्वंहिधन ऐश्वर्य प्रदायनीम्।
ज्ञानदाचतुर्वेदमयी,महागौरीप्रणमाम्यहम्॥
सुख शांति दात्री, धन धान्य प्रदायनीम्।
डमरूवाघप्रिया अघा महागौरीप्रणमाम्यहम्॥
त्रैलोक्यमंगलात्वंहितापत्रयप्रणमाम्यहम्।
वरदाचैतन्यमयीमहागौरीप्रणमाम्यहम्॥ (Latest Marathi HEadline)
कवच मंत्र
ओंकार: पातुशीर्षोमां, हीं बीजंमां हृदयो।
क्लींबीजंसदापातुनभोगृहोचपादयो॥
ललाट कर्णो,हूं, बीजंपात महागौरीमां नेत्र घ्राणों।
कपोल चिबुकोफट् पातुस्वाहा मां सर्ववदनो॥ (Marathi Top News)
महागौरी देवी आरती
जय महागौरी जगत की माया ।
जय उमा भवानी जय महामाया ॥
हरिद्वार कनखल के पासा ।
महागौरी तेरा वहा निवास ॥
चंदेर्काली और ममता अम्बे
जय शक्ति जय जय मां जगदम्बे ॥
भीमा देवी विमला माता
कोशकी देवी जग विखियाता ॥ (Top Trending Headline)
हिमाचल के घर गोरी रूप तेरा
महाकाली दुर्गा है स्वरूप तेरा ॥
सती ‘सत’ हवं कुंड मै था जलाया
उसी धुएं ने रूप काली बनाया ॥
बना धर्म सिंह जो सवारी मै आया
तो शंकर ने त्रिशूल अपना दिखाया ॥
तभी मां ने महागौरी नाम पाया
शरण आने वाले का संकट मिटाया ॥
शनिवार को तेरी पूजा जो करता
माँ बिगड़ा हुआ काम उसका सुधरता ॥
‘चमन’ बोलो तो सोच तुम क्या रहे हो
महागौरी माँ तेरी हरदम ही जय हो ॥ (Top Marathi Stories)
महागौरी कथा
पौराणिक कथेनुसार, देवी सतीने पार्वतीच्या रूपात महादेवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. एकदा महादेव पार्वती देवीला पाहून काही तरी म्हणाले, ज्यामुळे पार्वती दुखावली आणि पार्वती तपश्चर्येत तल्लीन झाल्या. अशा प्रकारे वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या करूनही पार्वती परत आली नाही, तेव्हा महादेव स्वतः देवीच्या शोधात निघाले आणि देवीपर्यंत पोहोचले. तेथे पोहोचल्यानंतर माता पार्वतीला पाहून भगवान शंकर आश्चर्यचकित झाले. देवी पार्वती अतिशय सुंदर होत्या, तिचा रंग चंद्रप्रकाशासारखा होता. देवीचे हे रुप, वस्त्र आणि दागिन्यांवर प्रसन्न होऊन महादेवाने देवी उमा यांना गौर वर्णचा आशीर्वाद दिला. (Top Marathi Headline)
तर दुसऱ्या कथेनुसार, एकदा एका सिंहाला खूप भूक लागली होती. तो सिंह अन्नाच्या शोधात देवी उमाजवळ पोहचला. देवीला पाहून सिंहाची भूक आणखी वाढली. पण देवी तपश्चर्या करत असलेल्या तो सिंह देवीच्या तपश्चर्येतून जागे होण्याची वाट पाहत तो तिथेच बसला. या प्रतिक्षेत तो खूपच अशक्त झाला. देवी आपल्या तपश्चर्येतून जागे झाली तेव्हा सिंहाची दुर्दशा पाहून देवीला त्याची दया आली आणि देवीने सिंहाला आपले वाहन बनवले. आणि देवीने आपली तपश्चर्या पूर्ण केली. तेव्हापासून देवी गौरीचे बैल आणि सिंह दोन्ही वाहन आहे. (Latest Marathi HEadline)
तर एक कथा अशीही प्रचलित आहे की, देवांचे देव महादेव म्हणजेच शिवला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवीने कठोर तपश्चर्या केली. या तपामुळे देवीचे शरीर काळे झाले. देवीच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन महादेवाने तिचा स्वीकार करत शिव गंगा जलाने देवीचे स्नान करण्यात आले. यामुळे देवी अतिशय गोरी झाली. तेव्हापासून देवीचे नाव गौरी पडले, असे म्हटले जाते. महागौरीचे हे रुप दयाळू, प्रेमळ, शांत आणि कोमल आहे. देवीची प्रार्थना करताना देव आणि ऋषी म्हणतात, “सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वाध्याय साधिके शरण्य अंबिके गौरी नारायणी नमोस्तुते.” (Top Trending News)
देवी महागौरीची पूजा केल्याचे लाभ
आई महागौरीची पूजा केल्याने लग्नात येणारे सर्व संकट दूर होतात. देवी आईच्या आशीर्वादाने उत्तम जोडीदार मिळतो. देवीची पूजा केल्याने येणारे सर्व संकट दूर होऊन सर्व पापांपासून मुक्ती मिळते. देवीच्या आशीर्वादाने सौख्य, ऐश्वर्याची प्राप्ती होते. महागौरी ही छाया ग्रह राहूची अधिपती आहे. म्हणून राहूच्या नकारात्मक प्रभावांनी ग्रस्त असलेल्या भक्तांनी देवीच्या या रूपाची पूजा करावी. यामुळे राहू दोषामुळे येणाऱ्या अडचणींपासून मुक्तता मिळते. (Top Stories)
========
Navratri : दुर्गा सप्तशतीचे पाठ कधी आणि कसे करावे?
Navratri : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केल्या जाणाऱ्या ललिता पंचमीच्या व्रताची माहिती
========
महाअष्टमीला अनेक घरांमध्ये कन्या पूजन देखील केले जाते. मुलींना दुर्गा देवीचे रूप मानले जाते, म्हणून या दिवशी मुलींना घरी बोलावून त्यांना हलवा-पुरी, खीर इत्यादी पदार्थ खाऊ घातल्याने दैवी शक्तीचे सर्व सुख प्राप्त होते. देवी महागौरीचे ध्यान केल्याने भक्तांमध्ये सद्गुणी विचार वाढतात आणि त्यांच्या चंचल मनांमध्ये एकाग्रता येते. मातेची पूजा केल्याने तिच्या भक्तांचे दुःख नष्ट होते आणि मातेच्या कृपेने ते त्यांचे जीवन समृद्धपणे जगतात. (Scoail News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics