अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये सध्या संयुक्त राष्ट्र महासभेचे ७७ वे सत्र सुरु आहे. जगातील काही प्रमुख देशांचे नेते न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत. तर आज परराष्ट्र मंत्री जयशंकर संयुक्त राष्ट्रात भारताची बाजू मांडणार आहेत. संयुक्त राष्ट्रात अमेरिका ते भारतासह जगातील अन्य काही विकसित देशांचे भाषण होते. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, येथे पहिले भाषण ब्राझीलचेच का होते? जाणून घ्या यामागील खास कारण नक्की काय आहे. (77th UNGA)
५ दिवस चालते सभा
दुसऱ्या महासभेनंतर २४ ऑक्टोंबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्राची स्थापनेनंतर प्रत्येक वर्षी या बैठकीचे आयोजन केले जाते. या दरम्यान ग्लोबल लीडर्स विविध मुद्द्यांवर आपले मतं मांडतात. युएनेचे स्थायी सदस्य अमेरिका, फ्रांन्स, ब्रिटेन, चीन आणि रशिया व्यतिरिक्त भारत आणि पाकिस्तान सारख्या देशांचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा येथे येतातयही सभा ५ दिवस चालते.

ब्राझीलच्या भाषणापासून होते सुरुवात
महासभेत खरंतर काही देशाचे भाषण होते. मात्र याच्या सुरुवातीलाच ब्राझीलचे राष्ट्रपती संबोधन करतात.अखेर ब्राझीललाच का प्रथम संबोधन करण्याचा मान दिला जातो? खरंतर २०१० मध्ये एनपीआरला दिलेल्या एका मुलाखतीत युएनच्या प्रोटोकॉल चीफ डेसमेंट पार्कर यांनी याचे कारण सांगितले होते. या मुलाखतीत त्यांनी असे म्हटवे की, ज्यावेळी उंगाची सुरुवात झाली तेव्हा कोणताही राष्ट्राध्यक्ष असे नव्हते की, ज्यांना प्रथम भाषण द्यायचे होते. परंतु ब्राझीलच नेहमी तयार असायचा. त्यांच्याकडून नेहमीच पहिले भाषण दिले जायचे. त्यांनी पुढे असे म्हटले की, याच कारणामुळे १९५५ पासून आतापर्यंत ही परंपरा चालत आली आहे. तेव्हापासूनच ब्राझीलला नेहमीच प्रथम बोलण्याची संधी मिळते.
ब्राझीलनंतर अमेरिकेचा क्रमांक
संयुक्त राष्ट्रात ब्राझीलच्या भाषणानंतर अमेरिकेचा क्रमांक येते. त्यानंतर कोण बोलणार याचा निर्णय सदस्य देशांकडून आलेल्या प्रतिनिधीमंडळ, पसंद किंवा दुसऱ्या ऑप्शनसारख्या भौगोलिक संतुलन पाहून घेतला जातो. (77th UNGA)
हे देखील वाचा- PFI काय आहे? नक्की का त्यांच्याबद्दल नेहमीच बदनामी केली जाते जाणून घ्या अधिक
अटल बिहारी वाजपेयी यांनी हिंदीत दिले होते भाषण
१९७७ मध्ये आपत्कालानंतर झालेल्या निवडणूकीत मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वात जनता पार्टीचे सरकार स्थापन झाले होते. या सरकारमध्ये भारतीय जनसंघाचा सुद्धा समावेश होता. अटल बिहारी वाजपेयी जनसंघाच्या तिकिटावर निवडणूक जिंकले होते. या सरकारने अटल बिहारी वाजपेयी यांना परराष्ट्र मंत्री बनवले. याच दरम्यान, १९७७ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेचे आयोजन केल्याने त्यात ते सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी जे काही केले ते त्या काळात कोणीही केले नव्हते. या बैठकीदरम्यान त्यांनी हिंदीत आपले भाषण दिले होते. त्यांच्या द्वारे हिंदीत दिलेले हे भाषण पहिलेच होते. संयुक्त राष्ट्र महासभेत अटल बिहारी वाजपेयी यांचे भाषण इंग्रजीत लिहिण्यात आले होते. परंतु त्यांनी त्याचे हिंदीतील ट्रांन्सलेशन वाचले होते.