मनोरंजनक्षेत्रासाठी अतिशय मानाच्या आणि महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला आयुष्यात एकदा तरी हा पुरस्कार आपल्याला मिळावा अशी इच्छा आणि स्वप्न असते. प्रत्येक कलाकारासाठी हा पुरस्कार म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे. अशा या प्रतिष्ठित अशा ७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांची आज १६ ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून घोषणा करण्यात आली.
१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतील सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच CBFC द्वारे प्रमाणित फीचर आणि नॉन-फीचर चित्रपटांचा यात समावेश होता. या पुरस्कारांमध्ये देखील मराठी चित्रपटांनी आपली मोहर उमटवल्याचे दिसत आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे.
यावर्षी सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट म्हणून कांताराला पुरस्कार मिळाला असून, सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रिषभ शेट्टीला पुरस्कार देण्यात आला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नित्या मेनन आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘कच्छ एक्सप्रेस’ ठरला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुरज बडजात्या यांना गौरवण्यात आले आहे. चला जाऊन घेऊया संपूर्ण विजेत्यांची नावे.
70th National Film Awards: Manoj Bajpayee starrer ‘Gulmohar’ bags Best Hindi Film
Read @ANI Story | https://t.co/N03fPTgncQ#Nationalfilmawards #Bollwywood #Gulmohar pic.twitter.com/uekrfI9PGn
— ANI Digital (@ani_digital) August 16, 2024
सर्वोत्कृष्ट चित्रपट – अट्टम
सर्वोत्कृष्ट अभिनेता – ऋषभ शेट्टी, कांतारा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नित्या मेनन, तिरुचित्रबलम आणि मानसी पारेख, कच्छ एक्स्प्रेस
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सूरज बडजात्या, उंचाई
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – नीना गुप्ता, उंचाई
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पवन मल्होत्रा, फौजी
सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट – कांतारा
सर्वोत्कृष्ट पदार्पण – प्रमोद कुमार
सर्वोत्कृष्ट तेलुगु चित्रपट – कार्तिकेय २
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – पोन्नियिन सेल्वन – भाग १
सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट – Baaghi Di Dhee
सर्वोत्कृष्ट मल्ल्याळम चित्रपट – सौदी वेल्लाक्का CC.225/2009
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – वाळवी
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – केजीएफ चाप्टर २
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – गुलमोहर
सर्वोत्कृष्ट तिवा चित्रपट – सिक्यसाल
सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट – काबेरी अंतरधन
सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट – इमुथी पुथी
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शत – प्रितम, ए आर रहेमान
सर्वोत्कृष्ट गायक – ब्रह्मास्त्र अरिजितसिंह
सर्वोत्कृष्ट अॅक्शनपट – केजीएफ चाप्टर २
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट – द कोकोनट ट्री
सर्वोत्कृष्ट निवेदक – मुरमूर्स ऑफ द जंगल
बेस्ट डॉक्युमेंट्री – मुरमूर्स ऑफ द जंगल
विशेष उल्लेख:
मनोज बाजपेयी : गुलमोहर
संजय सलील चौधरी : कालीखान
======
हे देखील वाचा : विशाखा सुभेदार यांची ‘पॅडी’साठी भन्नाट पोस्ट
======
तांत्रिक पुरस्कार:
सर्वोत्कृष्ट कृती दिग्दर्शन: KGF: अध्याय 2
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: तिरुचित्रबलम
सर्वोत्कृष्ट गीत: फौजा
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक: प्रीतम (गाणी), एआर रहमान (पार्श्वभूमी स्कोअर)
सर्वोत्कृष्ट मेकअप: अपराजितो
सर्वोत्तम पोशाख: कच्छ एक्सप्रेस
सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन: अपराजितो
सर्वोत्कृष्ट संपादन: आत्तम
सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइन: पोनियिन सेल्वन – भाग १
सर्वोत्कृष्ट पटकथा : अत्तम
सर्वोत्कृष्ट संवाद: गुलमोहर
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी: पोनियिन सेल्वन – भाग १
सर्वोत्कृष्ट महिला प्लेबॅक: सौदी वेलाक्का
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायन: ब्रह्मास्त्र
दरम्यान, दिग्दर्शक परेश मोकाशी आणि अभिनेत्री, लेखिका असणाऱ्या मधुगंधा कुलकर्णी यांच्या आतापर्यंत ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’ आणि ‘वाळवी’ या तीन चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.