१८ फेब्रुवारी १९५२ ची ती भयंकर रात्र होती. समुद्रात एक नॉर’ईस्टर नावाचं एक भयंकर वादळ आलं होतं. समुद्राच्या लाटा ७० फुट उंच उडत होत्या. अशातच SS पेंडल्टन नावाचं ऑईल टँकर जहाज न्यू ऑर्लियन्सहून बोस्टनला जायला निघालं होतं. त्या उंच लाटा जहाजावर जोरजोरात आदळत होत्या. अचानक जहाजातून मोठा आवाज झाला. जहाज हादरलं, मधून मोठा तडा गेला आणि जहाजाचे दोन तुकडे झाले. मागच्या भागात ३३ माणसं अडकली होती आणि पुढच्या भागात कॅप्टन पकडून आठ माणसं होती. पण आता त्या ३३ माणसांचं नशीब बघा ना काय? जहाजाचे दोन तुकडे झाले म्हणजे साधी गोष्ट आहे की, जहाज बुडणार.. पण तसं झालं नाही. (Ship wreck Story)
पुढचा भाग त्या समुद्रात बुडाला ज्यात ८ लोकं होती आणि मागचा भाग ज्यात ३३ लोकं होती तो जहाजाचा भाग त्या समुद्राच्या पाण्यावर तरंगत होता आणि दुपारी चॅथम लाईफबोट स्टेशनला खबर लागली की, SS पेंडल्टन जहाजाचे दोन तुकडे झालेत आणि एक भाग अजूनही तरंगतोय. मग त्यानंतर सुरू झालं रेस्क्यू ऑपरेशन! ज्यात ३६ फूट लांबीची बोट त्या भयानक समुद्रात उतरली. त्यात हवामान खराब, ना रडार, ना जीपीएस, ना कोणतं नेव्हिगेशन…तरी ऑपरेशन सुरूच होतं आणि एक भली मोठी लाट आली या बोटीजवळ आली, त्या लाटेने रेसक्यु ऑपरेशनसाठी निघालेली ती बोट हवेत उडाली आणि मग पुढे काय झालं? जाणून घेऊ. (Top Stories)

चॅथम लाईफबोट स्टेशनच्या रडारवर पेंडल्टनचे दोन तुटलेले तुकडे दिसले. त्याचवेळी, दुसरं टँकर, फोर्ट मर्सर, याने SOS पाठवला होता. ही माहिती मिळाली आणि लगेच चॅथम लाईफबोट स्टेशनचे कमांडिंग ऑफिसर डॅनियल वेबर क्लफ यांंनी रेसक्यु ऑपरेशनसाठी लहान टीम पाठवली. जी बोट रेसक्युसाठी समुद्रात उतरली होती तिचं नाव होतं – CG-36500, जी ३६ फुट लांब होती आणि ४ जणं त्या बोटीतून निघाले होते. Bernard C. Webber, Andrew Fitzgerald, Ervin Maske, Richard P. Livesey.
एक तर हे ऑपरेशन खूप रिस्की होणार होतं, कारण बाहेर बर्फाचं वादळ, ६० ते ७० फूट उंच लाटा! पण तरीही ते चौघे डगमगले नाहीत. चॅथमच्या धोकादायक सँडबारवरून जाताना भीती घालवण्यासाठी ते “रॉक ऑफ एजेस” आणि “हार्बर लाईट्स” गात होते. SS पेंडल्टनचा तो भाग सँडबारच्या पलीकडे होता. पण बोट सँडबार ओलांडत असताना एक भलीमोठी लाट आली. CG-36500 बोट हवेत उडाली आणि एका बाजूला गेली. मग दुसरी लाट येण्याआधी ती सावरली, त्यातच त्यांचा कंपास बंद पडला, जो पेंडल्टन जहाजापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग होता. (Ship wreck Story)
आता मोठा प्रश्न की, त्या तुटलेल्या जहाजापर्यंत ते पोहोचणार कसे? पण Bernardने हार मानली नाही. सर्चलाइट लावून ते पुढे गेले. अचानक त्यांना लांब काहीतरी दिसलं, तो पेंडल्टनचा तुटलेला मागचा भाग होता! तो ६० फूट लाटांवर उडत होता. बोट जवळ नेल्यावर पेंडल्टनच्या डेकवरचे दिवे दिसले. आणि थोड्या वेळात एक माणूस डेकवरून वेड्यासारखा हात हलवत दिसला आणि लगेच गायब झाला. फायनली त्यांना SS पेंडल्टनचा तो भाग सापडला. पहिला टप्पा पूर्ण झाला. ते त्या SS पेंडल्टन जवळ गेले. त्यांना माहित नव्हतं की, पेंडल्टनच्या मागच्या भागात ३२ जण जिवंत होते. कारण प्रोब्ल्म असा होता की, CG-36500 वर फक्त १२ जणं प्रवास करू शकत होती आणि तिथे ३२ जण होते, पण Bernardने ठरवलं, एकतर सगळ्यांना वाचवणार किंवा सगळे एकत्र मरू.. (Top Stories)
पेंडल्टनच्या माणसांनी एक शिडी खाली सोडली. एक-एक करून जहाजवरचे लोक उतरायला लागले. काहीजण बोटीच्या डेकवर पडले, काही समुद्रात. मग कोस्ट गार्डच्या माणसांनी त्यांना बाहेर काढलं. त्यात वाऱ्याने शिडी इकडेतिकडे उडत होती, तरी सांभाळत ते बोटीवर उतरत होते. पण २० जण बोटीत चढल्यानंतर CG-36500 बोटीत जास्त जागा शिल्लक नव्हती. Bernard ला वाटलं, आता परत जाणं अशक्य आहे. पण त्याने ठरवलं, तो सगळ्यांना एकत्र घेऊनच जाणार. शेवटी ३१ जण बोटीत तर बसले. पण दुर्दैवाने, शेवटचा माणूस, जॉर्ज “टायनी” मायर्स समुद्रात बुडाला. टायनीने सगळ्यांना आधी उतरायला मदत केली होती. पण त्याने उडी मारली, तेव्हा एका भयंकर लाटेने CG-36500 पेंडल्टनवर आपटली आणि टायनी त्यामध्ये चिरडला गेला. हा प्रसंग त्या चौघांना आयुष्यभर त्रास देत राहिला.
==============
हे देखील वाचा : Garba : ‘या’ ठिकाणी चक्क पुरुष साड्या नेसून करतात गरबा
==============
मग कंपास नसताना, खराब झालेली आणि ओव्हरलोड बोट घेऊन ते निघाले. कसं बसं करत अंदाज लावत बरोबर मार्गावर पोहोचले. सगळे सुखरूप किनाऱ्यावर उतरले. पण यात टायनीचा आणि जहाजाचा पुढचा भाग आधीच बुडाला होता त्यातल्या पण आठ जणांचा मृत्यू झाला. पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या चौघांनी ३२ जणांचे जीव वाचवले. या धाडसासाठी त्या चौघांना गोल्ड लाईफसेव्हिंग मेडल मिळालं. २००५ साली ती CG-36500 बोट राष्ट्रीय ऐतिहासिक नोंदणीमध्ये सामील झाली. १९८१ मध्ये केप कॉड नॅशनल सीशोरने ही बोट ऑर्लियन्स हिस्टोरिकल सोसायटीच्या हवाली केली. मग चॅथम, ऑर्लियन्स आणि हार्विचच्या लोकांनी मेहनत घेतली आणि त्या बोटीला पुन्हा नव्यासारखं केलं. शेवटी, बर्नार्ड वेबर आणि त्याच्या बायकोच्या समोर, एका समारंभात ती बोट पुन्हा पाण्यावर उतरवली गेली. (Ship wreck Story)
पण एका प्रश्नाचं उत्तर अजून मिळालं नव्हतं की, बोटीचे दोन तुकडे होण्यामागचं कारण काय? तर नंतर तपासात असं कळलं, ही टँकर युद्धकाळात बनवली होती आणि त्यातलं स्टील सल्फरमुळे कमी तापमानात ठिसूळ झालं होतं. त्यामुळे ती पटकन तुटली. मग या घटनेची इतकी चर्चा झाली की, २००९ साली मायकेल जे. टौगियास आणि केसी शर्मन यांनी या घटनेवर ‘द फायनेस्ट अवर्स’ (The Finest Hours) हे पुस्तक लिहिलं आणि याच पुस्तकावर आधारित २०१६ साली सिनेमा सुद्धा बनला.
