एक छोटसं विमान, दोन माणसं आणि एक असं मिशन जे केवळ जीवघेणं नव्हतं तर Impossible होतं. लास वेगासमधील एका हॉटेल मालकाचं विचित्र स्वप्न होतं की एका विमानाला जमिनीला स्पर्श न करता तास किंवा दिवस नाही तर काही महिने हवेत ठेवायचं. हे चॅलेंज पायलटसाठी वाईट एखाद्या वाईट स्वप्ना पेक्षा कमी नव्हतं. हे चॅलेंज पूर्ण झालं का? तेचं जाणून घेऊ. लास वेगास म्हणजे मोठमोठे कॅसिनो, ५ स्टार हॉटेलं आणि लक्सरीयस लाइफ स्टाइल. पण या सगळ्यात वेगळं होतं – हसिएंडा हॉटेल. हे हॉटेल साध्या लोकांसाठी होतं त्यामुळे गरीब–मध्यमवर्गीय लोक इथे यायचे. पण हॉटेल मालक वॉरन बेल एका संकटात अडकला होता. हॉटेल चालत होतं पण प्रॉफिट नव्हतं. मग हॉटेल चर्चेत यावं म्हणून त्याने काहीतरी भन्नाट करायचं ठरवलं. (64 Days in the Sky)
एक दिवस त्याचा पायलट मित्र बॉब टिमने त्याला सल्ला दिला की जर एखादा विश्वविक्रम मोडला तर हसिएंडाला चांगली प्रसिद्धी मिळू शकेल. त्याला आयडिया दिली की एका विमानाला जमिनीला स्पर्श न करता काही दिवस नाही तर काही महिने हवेत ठेवायचं. वॉरनला ही आयडिया खूप आवडली, पण खरंच यामुळे हॉटेलची प्रसिद्धी होईल की नाही? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे शक्य कसं होईल? जेव्हा विमानाचा शोध लागला, तेव्हा सुरुवातीला त्याच्या उड्डाणाचा वेळ मोजला जायचा. पायलट्स आणि मेकॅनिक्ससाठी सर्वात महत्त्वाचं होतं की ,विमान हवेत किती वेळ उडू शकतं. पण शेवटी सगळं काही इंधनाच्या टाकीवर येऊन थांबलं. म्हणजे, टाकी जितकी मोठी, तितका उड्डाणाचा वेळ जास्त. सोपं गणित! मग 1923 मध्ये अमेरिकन सैन्याने विमान जास्त वेळ हवेत ठेवण्यासाठी अजूनच भारी आयडिया शोधली विमान हवेत असताना दुसऱ्या विमानाकडून त्याला इंधन भरण्याची. तिथूनच एंड्युरन्स फ्लाइट सुरू झाली. तेव्हा लोकांनी सर्वात जास्त वेळ विमानं हवेत ठेवण्याच्या रेकॉर्ड बनवण्याची स्पर्धा सुरू झाली. (Top Stories)
पण जेव्हा बॉब टिम वॉरनला ही आयडिया देत होता, तेव्हा असे वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचा जोर बराच कमी झाला होता. कारण आता प्रश्न विमानाच्या इंजिन किंवा इंधन टाकीच्या मर्यादांचा नव्हता, तर मानवी शरीराच्या मर्यादांचा होता. बॉब टिम एक असा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची गोष्ट करत होता, तो रेकॉर्ड होता ४६ दिवस विमान हवेत उडवण्याचा. जो रेकॉर्ड दोन नेव्ही पायलट्सनी 1949 मध्ये बनवला होता. बॉब टिमने हे जाहीर केलं की तो हा रेकॉर्ड मोडेल त्यामुळे तेव्हा त्याची खूप चर्चा झाली होती. हसिएंडा हॉटेलचा मालक वॉरन बेल याला ही आयडिया खूप आवडली आणि त्याने लगेच यासाठी होकार दिला. बॉब टिम हा दुसऱ्या महायुद्धातील एक फेमस पायलट होता. या मिशनची तयारी करण्यासाठी बॉब टिम सरळ मॅककरन फील्ड विमानतळावर गेला आणि एक सेसना 172 विमान त्याने घेतलं, विमानाला जास्त काळ हवेत ठेवण्यासाठी एका चांगला मेकॅनिकही हायर केला. जास्तीत जास्त दिवस विमान हवेत ठेवण्यासाठी त्याने को पायलटची सीट काढून टाकली, पण एका महिन्यापेक्षा जास्त काळ हवेत राहायचं तर एका को पायलटची गरज लागणारच होती. म्हणजे दोन पायलट शिफ्ट्समध्ये विमान उडवणार – एकजण स्टिअरिंग सांभाळणार, तर दुसरा त्या सीटच्या जागी ठेवलेल्या फोम पॅडवर आराम करणार! (64 Days in the Sky)
मग त्यांनी मागच्या रांगेतली बेंचही काढली. त्या जागी फक्त आठ स्क्वेअर फूटचा एक छोटासा स्टोरेज बनवला, जिथे गरजेचं सामान ठेवता येईल. आणि हो, केबिनच्या एका कोपऱ्यात एक छोटंसं सिंक बसवलं, जेणेकरून त्या चार फूट उंचीच्या छोट्या केबिनमध्ये कधीतरी स्पंजनं अंघोळ करता यावी. त्यांनी विमानात एक वेगळी टाकीसुद्धा बसवली ज्यामुळे जास्तीत जास्त इंधन विमानात असेल. इंधन भरणं जरा कमी धोकादायक व्हावं म्हणून त्यांनी कॉ पायलटच्या दरवाज्याबाहेर एक छोटासा फोल्ड होणारा प्लॅटफॉर्म बनवला. यावर उभं राहून पाइप बेली टाकीच्या पोर्टला जोडता यायचं. आणि हा प्लॅटफॉर्मच विमानातली एकमेव जागा होती जिथे ताठ उभं राहता यायचं. नाहीतर सेसना 172 च्या आत फक्त बसायची किंवा झोपायची जागा होती.
विमानाच्या बाहेर मोठ्या अक्षरात “हसिएंडा” लिहिलं. कारण या हॉटेलसाठीच हे मिशन सुरू झालं होतं. (Top Stories)
1958 च्या उन्हाळ्यात पहिली चाचणी सुरू झाली, पण त्यांच्यासमोर अडचणींचा पाऊस पडायला लागला. टिमने ज्या कॉ पायलटला सुरुवातीला घेतलं, त्याच्याशी टीमचं अजिबात पटत नव्हतं. चाचणी उड्डाणादरम्यान दोघं कधी छोट्या गोष्टींवरून, कधी मोठ्या गोष्टींवरून भांडायचे. असं करत पहिली चाचणी, दुसरी चाचणीही ही भांडणांमुळे फसली. तिसऱ्या चाचणीत तर त्यांचं इतकं भांडण झालं की टिमने त्या को पायलटला मिशनमधून चालतं केलं. इथे यांचं मिशन सुरू होतं नव्हतं. दुसरीकडे डॅलसमध्ये जिम हीथ आणि बिल बर्कट नावाच्या दोन पायलटसने त्याच सेसना 172 विमानावर 50 दिवस हवेत राहून एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. टीम सुद्धा हार मानणारा नव्हता. त्याने डिसेंबरपर्यंत विमानातल्या सगळ्या समस्या सोडवल्या. शेवटी 4 डिसेंबर 1958 ला हसिएंडा विमान प्रयत्नासाठी मॅकएरन फील्डवरून उडालं. तिथे आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल फेडरेशन चे अधिकारीही होते, जे या मिशनवर बारीक नजर ठेवत होते. फसवणूक होऊ नये म्हणून टिम आणि त्याचा नवा को पायलट जॉन कूक यांनी विमान टेक ऑफ करून पुन्हा रनवेवर उतरवलं. तेव्हा विमानाच्या टायर्सवर खास पांढरा रंग लावला गेला. त्यामुळे जर त्यांनी कुठे गुपचूप लँडिंग केली, तर हा रंग निघून जाईल त्यांचा रेकॉर्ड कन्सिडर केला जाणार नाही. हे झाल्यानंतर मिशन सुरू झालं. 12 तासांनंतर जेव्हा पहिल्यांदा इंधन भरण्याची वेळ आली, तेव्हा ते एका ठरलेल्या रस्त्यावर आले, जिथे इंधनाचा ट्रक तयार होता. विमान रस्त्याच्या रेषेत आलं, तेव्हा ट्रक ड्रायव्हरने गाडीला फुल स्पीड दिला. विमानाला त्याच्या कमीत कमी गतीवर उडावं लागत होतं – 100 किमी प्रति तास, कारण ट्रक यापेक्षा जास्त वेगाने जाऊ शकत नव्हता. (64 Days in the Sky)
जेव्हा हसिएंडा ट्रकपासून फक्त 20 फूट वर आलं तेव्हा को पायलेटने विंच खाली फेकली. ट्रकमधल्या कामगारांनी त्या विंचवर पाइप लावला आणि विमानात इंधन भरायला सुरुवात झाली. पुढची तीन मिनिटं हसिएंडा आणि ट्रक एकदम एकत्र होते. या तीन मिनिटांत जर जरा जरी चूक झाली, किंवा कोणाचाही वेग कमी-जास्त झाला, तर थेट मृत्यूच होता. पहिली टाकी भरली, तेव्हा को पायलटने पाइप काढून खाली फेकला आणि विमान पुन्हा 12 तासांसाठी आकाशात निघून गेलं. जर त्यांना 50 दिवसांचा विक्रम मोडायचा असेल, तर ही प्रोसेस त्यांना कमीत कमी १०० वेळा तरी करावी लागणार होती. टिम आणि कूक काही दिवस लास वेगासवरच उडत राहिले, जेणेकरून काही बिघाड झाला तर लँडिंग स्ट्रिप जवळ असेल. पण जेव्हा सगळं ठीक वाटायला लागलं, तेव्हा ते कॅलिफोर्नियाच्या निर्जन मैदानांवर उडायला लागले.
जास्त उंचीवर इंधनाची बचत होते, पण तिथे थंडी गोठवणारी असते. आणि हसिएंडाच्या दरवाजांमध्ये बदल केल्यामुळे त्याची उष्णता टिकवण्याची क्षमता कमी झाली होती. म्हणून थंडीपासून वाचण्यासाठी त्यांनी जमिनीच्या जवळ उडायचं ठरवलं. कमी उंचीवर दृश्यं छान दिसतात, पण रात्री डोंगर आणि ढग जीवघेणे ठरू शकतात. आता टिम आणि कूक यांची चांगली दोस्ती झाली होती. मोकळ्या वेळेत ते पुस्तकं वाचायचे, व्यायाम करायचे, गप्पा मारायचे. दिवसातून दोनदा इंधन भरण्याच्या वेळी ते फक्त इंधनच नाही, तर पाण्याचे डबे, इंजिन ऑइल आणि हसिएंडाच्या शेफने बनवलेलं जेवणही वर खेचायचे.
सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा की त्यांना विमानात टॉयलेट होतं का ? तर हा विमानात एक फोल्डिंग कॅम्प टॉयलेट सीट ठेवली होती, ज्याखाली एक वेस्ट बॅग लावलेली असायची. ही बॅग भरली की ती कॅलिफोर्नियाच्या निर्जन मैदानांवर खाली फेकायचे. ही गोष्ट त्यांनी कधीच सांगितली नाही, पुढे कुकच्या मृत्यूनंतर ते उघड झालं. (Top Stories)
36 दिवस हवेत घालवल्यानंतर टिम आणि कूक थकायला लागले. नवीन वर्षाची संध्याकाळही त्यांनी विमानातच घालवली. पण थकवा आणि तणाव त्यांच्यावर हावी होत होता. त्या छोट्या केबिनमध्ये त्यांना खूप त्रास होत होता. विमानाच्या इंजिनच्या आवाजामुळे त्यांची झोपही नीट होत नव्हती. एका रात्री टीम विमान उडवत असताना झोपला आणि हे कूकच्या शिफ्ट सुरू होण्याच्या काही मिनिटांआधी घडलं. आश्चर्य म्हणजे, पुढचा एक तास टिमची डोळे उघडलीच नाहीत आणि विमान ऑटोपायलटच्या जोरावर सरळ उडत राहिलं. जेव्हा टिम जागा झाला, तेव्हा विमान एका अनोळखी जागी, खड्ड्यात कमी उंचीवर उडत होतं. आणखी काही मिनिटं डोळे उघडले नसते, तर विमान डोंगराला धडकून क्रॅश झालं असतं. (64 Days in the Sky)
=============
हे देखील वाचा : Nepal : जाणून घ्या नेपाळमधील एकमेव अब्जाधीश व्यक्तीबद्दल
=============
आता अडचणी वाढतच गेल्या. विमानाचा इंधन मोजण्याचं मापक खराब झाला, टॅकोमीटर बंद पडलं, इंजिनात कार्बन जमा होऊ लागलं. पण 23 जानेवारीला जेव्हा विक्रम मोडण्याची वेळ जवळ आली, तेव्हा हसिएंडाला ती popularity मिळायला लागली, जी वॉरन बेलला हवी होती. बेलने प्रत्येक मोठ्या शहरावरून विमान कधी जाणार आहे याचं टाइम टेबल छापलं, जेणेकरून लोक विमान पाहू शकतील आणि हा ऐतिहासिक क्षण कव्हर करू शकतील. एकदा त्याने फोटोग्राफरांनी भरलेलं एक वेगळं विमान पाठवलं, जे हसिएंडासोबत उडालं आणि काही फोटो सुद्धा काढले. 23 जानेवारीला संध्याकाळी 3:52 वाजता हसिएंडाने 50 दिवसांचा विक्रम मोडला. पण इतक्या मेहनतीने आणि त्रास सहन करून हा विक्रम मोडल्यानंतर टिम आणि कूक यांनी ठरवलं की जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत उडत राहायचं. आणि मग त्यांनी आणखी 14 दिवस हवेत घालवले. पण अखेरीस विमानाची अवस्था इतकी खराब झाली की ते यापुढे उडू शकत नव्हतं. (64 Days in the Sky)
7 फेब्रुवारी 1959 ला, तब्बल 64 दिवस, 22 तास, 19 मिनिटं आणि 5 सेकंद हवेत राहिल्यावर त्यांनी मॅकएरन फील्डच्या कंट्रोल टॉवरला लँडिंगची परवानगी मागितली आणि विमान जमिनीवर उतरवलं. टिम आणि कूक इतके थकले होते की ते स्वतःच्या बळावर विमानातून उतरू शकत नव्हते. अधिकाऱ्यांनी तपासलं आणि टायर्सवरील पांढरा रंग तसाच होता. म्हणजे विमान खरंच 64 दिवस हवेतच होतं. आजपर्यंत हा रेकॉर्ड कोणीच मोडू शकलं नाही आणि आता मोडूही शकणार नाही. कारण 2015 मध्ये एफएआयने असे चॅलेंज करण्याला बंदी घातली.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics