दूध आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. केवळ लहान मुलेच नाही, तर मोठ्यांनाही दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दूध प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. दूधामुळे हाडे मजबूत होतात. तसेच हाडांशी संबंधित अनेक समस्याही दूर होतात. यासोबतच लठ्ठपणा, हृदयाशी संबंधित आजार, दातांची समस्या अशा अनेक समस्या दूर करण्यात दूध प्रभावी आहे. (Wrong Food Combinations)
अनेकांना दूध कोणत्या ना कोणत्या पदार्थांसह खाण्याची सवय असते. काहींना आंबा आणि केळीमध्ये दूध मिसळून मिल्क शेक प्यायला आवडते, तर काही लोक ब्रेड बटर किंवा बिस्किटांसोबत दूध पितात. पण तुम्हाला माहीत आहे का की, जर तुम्ही चुकीच्या फूड कॉम्बिनेशनसह दुधाचे सेवन केले, तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत कशासोबत दुधाचे सेवन हानिकारक ठरू शकते.
१. दूध आणि दही
दूध आणि दही दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पण दोन्ही एकत्र कधीच खाऊ नये नाहीतर पित्त, पोटात गॅस आणि उलट्या होण्याचा त्रास होऊ शकतो. यासोबतच सर्दी-खोकला आणि घसा खवखवण्याची समस्याही उद्भवू शकते. (Wrong Food Combinations)
२. दूध आणि केळं
जरी अनेकांना केळीचे मिल्क शेक खूप आवडते, परंतु आयुर्वेदानुसार, केळी आणि दूध एकत्र सेवन केल्याने शरीरात विषारी घटक तयार होतात, ज्यामुळे पचनशक्ती कमकुवत होते.
३. दूध आणि मासे
माशाचा प्रभाव उष्ण असतो आणि दुधाचा प्रभाव थंड असतो, त्यामुळे दोन गोष्टी विरुद्ध परिणामाने एकत्र खाल्ल्याने शरीराला अपाय होतो. मासे खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने पोटदुखी आणि अन्नातून विषबाधा होऊ शकते.
४. भाज्या, कडधान्य आणि दूध
कारले, फणस आणि भेंडी या भाज्या खाल्ल्यानंतर आणि मसूर आणि उडीद डाळ खाल्ल्यानंतरही दूध पिऊ नये. असे केल्याने शरीरात इन्फेक्शन, एक्जिमा आणि पचनाशी संबंधित समस्या होऊ शकतात. (Wrong Food Combinations)
५. ब्रेड-बटर आणि दूध
बरेच लोक न्याहारीमध्ये दुधासोबत ब्रेड-बटर घेतात, पण दूध हा एक पूर्ण आहार आहे. या सर्व गोष्टींचे एकत्र सेवन केल्याने पोटात जडपणा जाणवतो कारण आयुर्वेदानुसार प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स जास्त प्रमाणात एकत्र घेऊ नयेत. त्यामुळे एकट्याने दूध घेणे चांगले.
६. तळलेले, भाजलेले, खारट पदार्थ आणि दूध
दुधाला संपूर्ण आहार म्हणतात. जीवनसत्त्वे, प्रथिने, दुग्धशर्करा, साखर आणि खनिजे सर्व घटक त्यात आढळतात. दुधासोबत तळलेले-भाजलेले किंवा खारट पदार्थ खाल्ल्यास त्यांचे पचन सहजासहजी होत नाही. याच्या सततच्या सेवनाने त्वचेचे आजार देखील होऊ शकतात.