देशात काही दिवसांपूर्वीच 5G सुविधेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. तर ५जी सुविधा ही रिलायन्स जिओ आणि एअरटेल कंपनीकडून देशातील काही निवडक शहरांमध्ये सुरु करण्यात आली आहे. अशातच आता सायबर क्रिमिनल्स या सुविधेच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करु पाहत आहेत. याच संदर्भात गुरुग्राम येथील पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, ५जी सिम फ्रॉड संदर्भात सतर्क रहावे. दोन दिवसांपूर्वी एक मार्गदर्शक तत्वे जारी करत त्यांनी असे म्हटले आहे की, लोकांनी सायबर क्रिमिनल्स पासून सावध राहण्याची गरज आहे. त्याचसोबत त्यांनी असे ही म्हटले की, ५जी फ्रॉड संदर्भात येणारे मेसेज कशा पद्धतीने काम करतात. (5G Fraud)
खरंतर साइबर पोलिसांना मार्गदर्शक सुचना जाहीर करत सांगितले आहे की, काही सायबर क्रिमिनल्स लोकांना ५जी सुविधेसाठी सिम कार्ड अपग्रेड करण्यासाठी मेसेज पाठवतात. त्यानंतर ओटीपी मागतात. अशातच युजर्सच्या खात्यावर सायबर हल्ला केला जातो. गुरुग्राम त्या ८ शहरांपैकी एक आहे जेथे ५जी सुविधा एयरटेलकडून सुरु करण्यात आली आहे.

कसे काम करतात ५जी फ्रॉडचे मेसेज
डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस उपसाना सिंह यांच्या मते, फ्रॉड करणारे युजर्सला एक लिंक पाठवतात. त्यामध्ये युजर्सने क्लिक केल्यानंतर तेथे सिम कार्ड अपग्रेड करण्यास सांगितलेले असते. एकदा लिंकवर क्लिक केल्यानंतर हॅकर्सकडून तुमची खासगी माहिती चोरी केली जाते. त्याचसोबत बँक खात्याशी संबंधित माहिती सुद्धा हॅक करण्याची ते तयारी करतात. त्यानंतर मोबाईलच हॅक केला जातो. काही युजर्सला अशा प्रकारच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर हॅकिंगचा सामना करावा लागत आहे. त्याचसोबत आपले पैसे ही गमवावे लागत आहेत.(5G Fraud)
हे देखील वाचा- 5G सुविधेचे फायदे-तोटे तुम्हाला माहितेयत का? जाणून घ्या अधिक
कंपनीचे अॅप आणि कस्टमर केअरचा वापर करा
५जी सिम फ्रॉड पासून बचाव करण्यासाठी तुम्ही कंपनीच्या अधिकृत कस्टमर केअरला फोन करा. अथवा एयरटेलने आपल्याच अॅपमध्ये डिवाइसची ५जी कनेक्टिव्हिटी तपासून पाहण्यासाठी एक प्रोसेस दिली आहे. जेणेकरुन तुम्ही सायबर हल्ल्याला बळी पडणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. रिलायन्स जिओ आणि एअरटेलने भारतात ५जी सेवा सुरु केल्यानतर देशातील काही शहरात सायबर क्रिमिनल्स याचा लोकांना फसवण्यासाठी फायदा घेत आहेत. याच कारणास्तव लोकांची बँक खात्यातील रक्कम ही रिकामी होत आहे.