Home » तुम्हालाही पोटाची चरबी कमी करायची असेल तर वापरा ‘या’ सोप्प्या टिप्स; चार नंबरची टीप तर आहे खूपच सोप्पी.

तुम्हालाही पोटाची चरबी कमी करायची असेल तर वापरा ‘या’ सोप्प्या टिप्स; चार नंबरची टीप तर आहे खूपच सोप्पी.

by Correspondent
0 comment
Belly Fat | K Facts
Share

प्रत्येकालाच आपल्या आरोग्याची काळजी असते. प्रत्येकालाच आपले व्यक्तिमत्त्व रुबाबदार दिसावे असे वाटत असते. त्यासाठी अनेकजण वेगवेगळे पर्याय निवडतात. कोण आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवते, तर कोण योगा करते. तर कित्येकजण जिमला जाऊन व्यायाम करण्याचा मार्ग अवलंबतात.

एकंदरीत काय तर प्रत्येकजण आपण रुबाबदार दिसण्यासाठी आणि आपले आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी धडपडत असतो. अनेकांना आरोग्य व्यवस्थित ठेवताना अनेक समस्या उद्भवतात. तर कित्येकांना आरोग्य सुदृढ ठेवत असताना पोटावर वाढलेली चरबी सतावत असते.

Premium for health insurance coverage will increase with age

गर्भवती महिला वगळता प्रत्येकालाच आपले पोट सपाट असावे किंवा आपल्यालाही इतरांसारखे सिक्स पॅक असावे, असे वाटत असते. आज आपण याच संबंधित बोलणार आहोत.

आजच्या लेखातून आज आपण पोटावर वाढलेल्या चरबीवर कसे नियंत्रण मिळवायचे हे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत बघणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात पोटावरची चरबी नियंत्रित करण्यासाठी केले जाणारे उपाय.

१) आहारात जास्त मीठ खाणे टाळा

वजन कमी करण्यासाठी किंवा पोटावरची चरबी कमी करण्यासाठी दररोजच्या आहारात वापरण्यात येणारे मिठाचे प्रमाण कमी करा. त्यासाठी पर्यायी उपाय म्हणून अन्नाची चव वाढवण्यासाठी तुम्ही औषधी वनस्पती किंवा मसाले वापरू शकता.

खाण्यातील मिठाचे प्रमाण कमी केल्याने, आहारातील सोडियमचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरातून अतिरिक्त पाणी काढून टाकण्यास मदत होऊ शकते. परिणामी पोटावरची चरबी आणि वजन घटते.

२) वर्कआउट बँड

जेव्हा तुम्ही जिमला व्यायाम करायला जाता तेव्हा वर्कआउट बँडच्या मदतीने तुम्ही दीर्घकाळापर्यंत तीव्र व्यायाम करू शकता. स्क्वॅट्स आणि सायकलिंग करताना तुम्ही बँड वापरू शकता. या व्यायामाच्या मदतीने, आपण शरीर मजबूत करू शकता. स्ट्रेचिंग, ट्रेनिंग आणि इतर व्यायामांसाठी तुम्ही रेझिस्टन्स बँड वापरू शकता. त्याच्या मदतीने तुम्ही पोटाची चरबी जलद कमी करू शकता.

३) सर्किट ट्रेनिंग

सर्किट ट्रेनिंगमध्ये पुश अप्स, पुश लंज्स, पुल अप्स समावेश आहे. ज्यामुळे चरबी जळण्यास मदत होते. व स्नायूंचे प्रमाण वाढवण्यासही मदत होते. एक आठवडा व्यायाम करून तुम्ही किमान ५०० ते ६०० कॅलरीज बर्न करू शकता. त्यामुळे चरबी कमी करण्यास हा व्यायाम महत्वाचा ठरतो.

४) दोर उड्या

दोर उड्या मारणे हा खूप साधा आणि कोणालाही जमणारा सोप्पा व्यायाम आहे. दोर उड्या मारल्याने त्याचे आरोग्यास फायदे होतात. तसेच दोर उडी आपण कधी आणि कुठेही मारून व्यायाम करू शकतो यामुळेही पोटावरची चरबी घटण्यास मदत होते.

५) अँपल सायडर व्हिनेगर

अँपल सायडर व्हिनेगर विषारी आणि हानिकारक बॅक्टेरिया बाहेर काढण्यास मदत करते. तसेच अँपल सायडर व्हिनेगरमध्ये पोटॅशियम, एमिनो ऍसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जे वजन कमी करण्यास मदत करतात. अँपल सायडर व्हिनेगर हे तुमचे पोट दीर्घकाळ भरून ठेवते आणि साखरेची पातळी राखते. त्यामुळे वजन व चरबी घटण्यास मदत होते.

– निवास उद्धव गायकवाड

======

टीप : या लेखातील माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.