Home » तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण पेरू खाण्याचे ‘एवढे’ आहेत फायदे!

तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण पेरू खाण्याचे ‘एवढे’ आहेत फायदे!

by Correspondent
0 comment
Guava | K Facts
Share

दैनंदिन जीवन जगत असताना आपण आपल्या आरोग्याला खूप महत्व देतो. यामध्ये नेहमीच आपण आपल्या आरोग्याला पचेल अशा पौष्टिक गोष्टी खाण्याचा प्रयत्न करत असतो. तर कित्येकदा आपण आवर्जून बाजारातून खाण्यासाठी फळे विकत घेतो.

मात्र या फळांचा आपल्या शरीराला नेमका काय फायदा होतो, हे कित्येकांना माहिती नसते. आज आपण याच फळातील अगदी सर्रासपणे सर्वत्र वापरले जाणारे फळ म्हणजे पेरू (Guava) या फळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. पेरूपासून आपल्या आरोग्याला नेमके काय फायदे होतात. याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत.

१) डोळ्यांना उपयुक्त

पेरूमध्ये व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात आढळते. ज्यामुळे दृष्टी चांगली राहण्यास मदत होते. कमकुवत डोळ्यांची समस्या पेरूच्या सेवनाने टाळता येते. त्यामुळे डोळे निरोगी ठेवण्यासाठी पेरू हे सर्वोत्तम फळ मानले जाते.

Guava -

२) मधुमेहासाठी उपयुक्त

पेरूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पेरूचे नियमित सेवन मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. तसेच पेरूत नैसर्गिक साखर असते, जी मधुमेहासाठी फायदेशीर ठरू शकते. म्हणून पेरू मधुमेहासाठी खूप फायदेशीर मानला जातो.

३) लठ्ठपणामध्ये उपयुक्त

पेरूला प्रथिने, जीवनसत्व आणि फायबर गुणधर्मांनी परिपूर्ण म्हणून ओळखले जाते. पेरू चयापचय नियंत्रित करण्यास मदत करू शकतो. त्यामुळे तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण पेरू तुमचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत करतो.

४) बद्धकोष्ठतेसाठी उपयुक्त

पेरूच्या बिया गॅस आणि पचनाच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. इतर फळांच्या तुलनेत पेरूमध्ये सर्वाधिक फायबर असते, जे बद्धकोष्ठतेची समस्या टाळण्यास मदत करू शकते.

५) रोग प्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त

पेरूमध्ये संत्र्यापेक्षा चार पट व्हिटॅमिन सी असते. परिणामी व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्तीसाठी सर्वोत्तम मानले जाते.  म्हणून रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि संसर्गापासून संरक्षण करण्यास पेरू मदत करतो.

याच सोबत पेरूच्या पानांपासून बनवलेली पेस्ट वापरल्याने त्वचेच्या अनेक समस्या टाळता येतात. पेरूची पाने तोंडाच्या अल्सरसाठी अतिशय फायदेशीर मानली जातात. अशा पद्धतीने पेरू हे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास वेगवेगळ्या पद्धतीने मदत करते.

– निवास उद्धव गायकवाड


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.