तिने इतक्या माणसांना मारलं की तिचं नाव Guinness Book of world Record नोंदवलं गेलं. तिची इतकी दहशत होती की तिच्या भीतीने गजबजलेली गावं ओसाड पडली होती. लोक दिवसाढवळ्या सुद्धा घराच्या बाहेर पडत नव्हते. तिला लोक राक्षस म्हणायचे पण ती एक वाघीण होती! जिची दहशत नेपाळ पासून भारतापर्यंत पसरली होती. पण एक दिवस असं काही घडलं की तिची दहशत पूर्ण संपली. कोण होती ही नरभक्षक वाघीण ? आणि तिला कसं शांत करण्यात आलं ? जाणून घेऊ. (Champawat Tiger)
तर गोष्टीची सुरुवात होते नेपाळच्या रूपल गावातून, या गावातील बायका आजूबाजूच्या जंगलात चारा, लाकूड आणि जनावरांसाठी खाद्य गोळा करायला जायच्या. पण हळू हळू जंगलात जाणाऱ्या बायका गायब होऊ लागल्या त्यांना शोधायला गेलेल्या लोकांना जंगलात फक्त रक्ताचे डाग दिसायचे. आता हे कशामुळे होत होतं हे आधी कोणालाच कळत नव्हतं. ही खबर नेपाळच्या राजघराण्यापर्यंत पोहचली तेव्हा त्यांनी शोध घेतला मग हळू हळू कळालं की एक वाघीण आहे जिने या बायाकांना गायब केलंय. मग त्यांनी प्राण्यांची शिकार करणाऱ्या शिकारींना जंगलात पाठवलं. पण त्यातून काहीच साध्य झालं नाही. जेव्हा या वाघीणीने २०० च्या वर लोकांना स्वत:च अन्न बनवलं, तेव्हा १९०३ साली एक मोठी शिकार मोहीम राबवली गेली हत्तीवर बसलेले शिकारी, आणि सैनिकांनी जंगलात घेरा टाकला. बकऱ्या टांगून सापळे रचले, पण ही वाघीण कोणाच्याच हाती आली नाही. या शिकार मोहिमेत ते तिला मारू शकले नाहीत. पण ते तिला नेपाळ मधून भारतात हकलण्यात यशस्वी ठरले. शारदा नदी ओलांडून त्या वाघीणीने भारतात प्रवेश केला. आता भारताच्या कुमाऊँ प्रदेशात, चंपावत परिसरात तिचं नवं साम्राज्य सुरू झालं. (Top Stories)
तेव्हा भारतात ब्रिटिशांची सत्ता होती. आधी जिथे ही वाघीण रात्रीच्या अंधारात किंवा संध्याकाळच्या वेळेला शिकार करायची, आता तिने आपली शिकार पद्धत बदलली होती, शिकार करून करून तिची भीती नाहीशी झाली होती आणि ती आता रात्रीच्या ऐवजी दिवसा शिकार करायला लागली होती. ती ३२ किलोमीटरपर्यंत रात्रभर फिरून गावं बदलायची, नवीन शिकार शोधायची. चंपावत परिसरात सुद्धा नेपाळ प्रमाणेच जनावरांसाठी चारा गोळा करायला जाणाऱ्या महिला आणि लहान मुलं गायब होऊ लागली. त्यांना शोधायला गेलेल्या लोकांना कधी त्यांच अर्ध शरीर मिळायचं तर कधी फक्त रक्ताचे डाग. त्यामुळे संपूर्ण चंपावतमध्ये हाहाकार उडाला होता. जेव्हा ही गोष्ट ब्रिटिशांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनीही या वाघीणीला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि तिला मारणाऱ्याला बक्षीस सुद्धा जाहीर केलं. अनेक शिकारी आले, पण जो त्या वाघिणी समोर जायचा तो पुन्हा कधी दिसायचाच नाही. (Champawat Tiger)

जेव्हा सगळे प्रयत्न फसले, तेव्हा ब्रिटिशांनी नरभक्षक प्राण्यांची शिकार करण्यासाठी प्रसिद्ध असलेले शिकारी जिम कॉर्बेट यांना बोलावलं. कॉर्बेट हे कुमाऊँच्या नैनीतालमध्ये जन्मलेले, ब्रिटिश रेल्वे कर्मचारी आणि कुशल शिकारी होते. वेळेप्रसंगी प्राण्यांची शिकार ते करायचे, पण ते स्वत: प्राणी प्रेमी होते. त्यांनी याआधी अनेक नरभक्षक प्राण्यांची शिकार केली होती, पण या आधी त्यांनी सुद्धा एकाही वाघाची शिकार केली नव्हती, ब्रिटिशांनी त्यांना बोलावलं पण त्यांनी काही अटी ठेवल्या त्या अटी म्हणजे सरकारने वाघिणीला मारण्यासाठी ठेवलेलं बक्षीस रद्द करावं आणि शिकारी आणि सैनिकांना परत बोलवून घ्यावं. ब्रिटिशांनी हे मान्य केलं आणि सुरू झालं या नरभक्षक वाघिणीला मारण्याचं मिशन. (Top Stories)
तो पर्यंत या वाघिणीने ४३५ जणांचा बळी घेतला होता. चंपावत गावातले लोकं तिला राक्षस म्हणू लागले होते. कॉर्बेट यांनी पाली गावात तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण अनेक रात्र तिचा शोध घेतल्यानंतरही ती वाघिण दिसली नाही. मग वाघीणीने नवं नवे डावपेच आखायला सुरुवात केली. वाघिणीच्या जुन्या रेकॉर्ड नुसार ती फक्त महिला आणि लहान मुलांवरच हल्ला करायची, त्यामुळे कॉर्बेट यांनी महिलेचा पुतळा उभा करून तिची वाट पाहिली.
एकीकडे कॉर्बेट तिचा शोध घेत होते आणि दुसरीकडे तिने चुलीसाठी जंगलात लाकडं गोळा करायला गेलेल्या महिलेला आपलं शिकार बनवलं. कॉर्बेट लगेच त्या ठिकाणी पोहचले आणि त्यांनी रक्ताच्या डागांचा पाठलाग केला ते पाठलाग करत करत जंगलात भरपूर आत शिरले होते दोन दिवस पाठलाग केल्यानंतर पाहतात तर काय, समोर वाघिण. एका क्षणाचाही विलंब न करता कॉर्बेट यांनी तिच्यावर बंदुक ताणली आणि गोळी चालवली… (Champawat Tiger)
पण तो निशाणा चुकला आणि वाघिण पळून गेली. तिथे त्या महिलेचा मृतदेह तसाच पडलेला होता. ते नेण्यासाठी वाघिण पुन्हा येईल या आशेवर कॉर्बेट यांनी एक प्लॅन बनवला. चंपावतच्या तहसीलदारच्या मदतीने ३०० गावकऱ्यांना त्यांनी कुऱ्हाडी चाकू सारखे हत्यार घेऊन एकत्र बोलावलं आणि त्या सोबत ढोल सुद्धा आणले गेले.
कॉर्बेट यांचा प्लॅन असा होता की एकाबाजूने मोठा आवाज करायचा म्हणजे ती वाघीण दुसऱ्या दिशेत धावले. जिथे कॉर्बेट स्वत: बंदूक घेऊन उभे असतील. सर्व तयार झाले ढोल बडवत ते गोंगाट करू लागले. कॉर्बेट यांचा प्लॅन successful झाला मोठ्या आवाजाला घाबरून वाघीण कॉर्बेट यांच्या दिशेने धावली. त्यांना पाहून ती त्यांच्या अंगावर झडप घेत होती. इतक्यात त्यांनी निशाणा साधला आणि पहिली गोळी मारली छातीत त्यानंतर लगेच दुसरी गोळी खांद्यावर मारली. री त्या गोळ्या वाघिणीला मारण्यासाठी पुरेशा नव्हत्या. वाघीणीला गोळ्या लागल्या मुळे ती प्रचंड चिडली आणि कॉर्बेट यांच्यावर तिने हल्ला केला कॉर्बेट यांच्या गोळ्या संपल्या त्यांनी तहसीलदारची रायफल घेऊन शेवटची गोळी तिच्या पायात मारली. वाघीण खाली कोसळली गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. (Champawat Tiger)
===============
हे देखील वाचा : Chocolate Market : भारतातील चॉकलेट व्यवसाय किती मोठा? वाढ, ट्रेंड आणि भविष्याची दिशा जाणून घ्या
===============
कॉर्बेट यांची इतक्या दिवसांची मेहनत फळाली आली होती ते आनंदात होते पण जसे ते त्या वाघिणी जवळ पोहचले, तसा त्यांचा चेहराच उतरला. त्या वाघिणीचा जबडा तुटलेला होता. तिच्या उजव्या बाजूचे वरचे आणि खालचे कॅनाइन दात तुटलेले होते, कोणत्या तरी शिकाऱ्यानेच हे केलं होतं.
यामुळे तिला सामान्य शिकार करता येत नव्हती, म्हणून तिने माणसांकडे वळलं. ती अन्यथा निरोगी होती, वय १०-१२ वर्षं.त्यामुळे तिला जंगली प्राण्यांची शिकार करता येतं नव्हती आणि म्हणून तिने माणसांना खायला सुरवात केली होती. कोणताच वाघ माणसं खात नाही. पण या वाघीणीच्या शारीरिक कमजोर परिस्थितीमुळे तिला माणसं खाण्याशिवाय पर्याय नव्हता.हे जिम कॉर्बेट यांना तिला पाहताच क्षणी समजलं आणि त्यांना अतिशय दुख झालं. पण गावातल्या लोकांनी निश्वास सोडला होता. गावावर असलेलं मोठं संकट टळल होतं. गावातल्यांनी जिम कॉर्बेट यांना उचलून त्यांची मिरवणूक काढली.(Champawat Tiger)
पण या घटनेने कॉर्बेट बदलले. त्यांनी शिकार करणं हळू हळू बंद केलं. जंगली प्राण्यांमुळे कोणाचं नुकसान व्हायचं तर ते जिम कॉर्बेट यांच्याकडे मदत मागायला यायचे पण कॉर्बेट बंदूक उचलून शिकारी ला न जाता, त्यांना स्वत: पैशांची मदत करत. पुढे त्यांनी ‘मॅन-ईटर्स ऑफ कुमाऊँ’ सारखी पुस्तकं लिहिली आणि भारताच्या पहिल्या नॅशनल पार्कची स्थापनेत सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा होता ज्याचं पुढे नाव त्यांच्याच नावावरून जिम कॉर्बेट नॅशनल पार्क ठेवलं गेलं. तसं बघायला गेलं तर चंपावतची वाघीण व्हिलन नव्हती, तर एक माणसामुळे तिला व्हिलन व्हावं लागलं.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
