Home » Ashok Saraf : पद्मश्री मिळाल्यानंतर अशोक सराफ यांना पायलट भाची कडून मिळाले सरप्राइज

Ashok Saraf : पद्मश्री मिळाल्यानंतर अशोक सराफ यांना पायलट भाची कडून मिळाले सरप्राइज

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ashok Saraf
Share

महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांना २७ मे रोजी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात संपन्न झालेल्या सोहळ्यात पद्मश्री हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशोक सराफ यांना भारत सरकारचा हा सर्वात मोठा पुरस्कार मिळाला ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली. नाटकं, चित्रपट, मालिका अशा मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांमधून अतुलनीय कामगिरी करत त्यांनी मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले. फक्त कॉमेडीच नाही तर खलनायकी, गंभीर, रोमॅंटिक आदी सर्वच प्रकारच्या भूमिका त्यांनी लीलया पेलल्या. आज या दिग्गज कलावंताचा पद्मश्री देऊन केला गेलेला गौरव म्हणजे त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर लावलेली सर्वात मोठी मोहर आहे. (Ashok Saraf)

अशोक मामांना पद्मश्री दिल्यानंतर त्यांचे फॅन असलेले सर्वच लोकं विविध मार्गाने आपला आनंद, आपले त्यांच्याबद्दल असलेले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. अशातच एक सुंदर योगायोग देखील घडून आला. अशोक सराफ यांना पद्मश्री मिळाल्यानंतर ते दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झाले. ते मुंबईला येत असलेल्या फ्लाईटमध्ये त्यांना एक गोड आणि भावनिक सरप्राइज मिळाले. झाले असे की, अशोक मामा यांची भाची अदिती ही पायलट आहे. अशोक मामा ज्या फ्लाईटने मुंबईला येत होते नेमकी त्याच फ्लाईटची पायलट अदिती होती. अशोक सराफ पद्मश्री घेऊन परतत असताना त्यांच्या भाचीने विमानाचे सारथ्य करावे हा दुग्ध शर्करा योग जुळून आला आणि या क्षण अदितीला हातचा जाऊ द्यायचा नव्हते. (Marathi News)

हा योग पाहून अदितीने देखील ही संधी हातची दवडू न देता विमानामध्ये एक खास उद्घोषणा केली. या उद्घोषणेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते अदिती तिच्या काकांसाठी अशोक सराफ यांच्यासाठी अतिशय खास मेसेज देत आहे. व्हिडिओमध्ये अदिती म्हणते की, “नमस्कार! मी तुमची फ्लाइट कॅप्टन अदिती परांजपे. दिल्ली ते मुंबई या विमानप्रवासात तुमचं हार्दिक स्वागत. आजचा हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आहे. कारण माझे काका अशोक सराफ माझ्यासोबत प्रवास करत आहेत. त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. मी सर्व प्रवाशांना विनंती करते की जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. हा क्षण माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे.” (Social News / Updates)

हा व्हिडिओ अदिती परांजपेने सोशल मीडियावर शेअर केला असून, एक सुंदर कॅप्शन देखील त्यासोबत लिहिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “एक अतिशय खास, भावनिक आणि आयुष्यात एकदाच येणारी फ्लाइट…अशोक काका तुमच्याबरोबर प्रवास करताना मला खूप अभिमान वाटतोय. पुन्हा एकदा तुमचे हार्दिक अभिनंदन!” दरम्यान अदितीची ही पोस्ट कमालीची व्हायरल होत असून, सगळेच तिच्या या पोस्टवर कमेंट्स करत मामांबद्दल आपले प्रेम व्यक्त करत आहे. (Top Marathi Headlines)

==========

हे देखील वाचा : Ashok Saraf : पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफ म्हणाले, “मला विसरले असते तर मी…”

==========

अदितीच्या या व्हिडिओवर निवेदिता सराफ यांनी कमेंट करत भाचीचं कौतुक केलं आहे. निवेदिता यांनी लिहिलंय की, ‘हा क्षण माझ्यासाठी आणि अशोकसाठीही खूप खास होता. आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो.’ अदिती ही निवेदिता सराफ यांच्या बहिणीची मुलगी आहे. अनेक मराठी कलाकारांनी आणि नेटकाऱ्यानी या व्हिडीओवर कमेंट करत तिचं कौतुक केलं सोबतच अशोक मामांचे देखील अभिनंदन केले आहे. (Latest Marathi News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.