Home » जपानमध्ये 3-डी होलोग्राम नोटा….

जपानमध्ये 3-डी होलोग्राम नोटा….

by Team Gajawaja
0 comment
3-D Hologram Note
Share

८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० वाजता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली. त्यानंतर ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या गेल्या. या निर्णयामुळे मोठा गोंधळ उडाला होता. सरकारच्या या निर्णयावर टिका करण्यात आली. पण चलनात आलेल्या बनावट नोटांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय गरजेचा असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. पुढच्या काही वर्षातच या नोटबंदीचे चांगले परिणाम स्पष्ट झाले. तशीच काहीशी नोटबंदी आणखी एका देशात जाहीर करण्यात आली आहे. हा देश म्हणजे, जपान. पण जपाननं या नोटबंदीची घोषणा करतांनाही, आपल्या तांत्रित प्रगतीची झलक जगाला दाखवून दिली आहे. जपानमध्ये आता व्यवहार 3 -डी होलोग्राम नोट्स मध्ये करण्यात येणार आहे. चलनात करण्यात येणारी बनावटगिरी थांबण्यासाठी जपाननं हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. (3-D Hologram Note)

चलनात असलेल्या बनावट नोटा रोखण्यासाठी जपानने १०००० येन, ५००० येन आणि १००० येनच्या नवीन नोटा बाजारात आणल्या आहेत. ज्यामध्ये ‘3-डी होलोग्राम’ तंत्रज्ञानाचा वापर बनावटगिरीला तोंड देण्यासाठी करण्यात आला आहे. ‘3-डी होलोग्राम’ तंत्रज्ञानाचा नोटांमध्ये वापर करणारा जपान हा पहिला देश झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दशकांत प्रथमच नवीन बँक नोट जारी केल्या आहेत. यात ‘3-डी होलोग्राम’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी नवीन १०००० येन, ५००० येन आणि १००० येनच्या बनावट नोटा रोखण्यासाठी हा प्रभावी उपाय असल्याचे सांगितले आहे. या ‘3-डी होलोग्राम’ च्या नोटा हे जपानच्या इतिसाहातील ऐतिहासीक पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘3-डी होलोग्राम’ नोटा चलनात आल्या तरी तिथे काही काळ आधीपासून चलनात असलेल्या नोटाही चलनात रहाणार आहेत. सध्या जपानमधील १०००० येनच्या नोटेचे मूल्य अंदाजे $६२ डॉलरच्या आसपास आहे. त्याचप्रमाणे, ५००० येनचे मूल्य सुमारे ३० डॉलर आहे आणि १००० येनचे मूल्य ६.२ डॉलर एवढे आहे. (3-D Hologram Note)

जपाननं गेल्या वर्षापासून या ‘3-डी होलोग्राम’ नोटांची घोषणा केली होती, आणि त्याची तयारीही सुरु होती. जपानच्या नॅशनल प्रिंटिंग ब्युरोने पेपर नोट्ससाठी हे एक अनोखे तंत्रज्ञान वापरले आहे. यात प्रतिमांचे होलोग्राम तयार करण्यासाठी प्रिंट पॅटर्नचा वापर केला जातो. जपानची अर्थव्यवस्था डिजिटल करण्याच्या प्रयत्नात सरकार रोख रकमेचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे, जपानच्या अनेक सार्वजनिक स्थळांवर संबंधित तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध आहेत. जपानची रेल्वे स्थानके, पार्किंग लॉट आणि खरेदीची दुकाने आता या ‘थ्री-डी होलोग्राम’ तंत्रज्ञान असलेल्या नवीन नोटांशी जुळवून घेण्यासाठी पेमेंट मशीन अपग्रेड करत आहेत.

जपानचे चलन हे वैशिष्यपूर्ण आहे. १०००० येनच्या नोटेवर जपानी भांडवलशाहीचे जनक मानले जाणारे इची शिबुसावा यांचा चेहरा आहे. ५००० येनच्या नोटेवर उमेको त्सुदा या स्त्रीवादी आणि शिक्षिकेची प्रतिमा आहे. त्याचप्रमाणे, १००० येनच्या नोटेवर टिटॅनस आणि बुबोनिक प्लेगच्या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉक्टर शिबासाबुरो किटासाटो यांचे चित्र आहे. या नोटा आता नव्या स्वरुपात येणार असल्यामुळे जपानी नागरिकांमध्येही उत्सुकता आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस सुमारे ७.५ अब्ज नव्या डिझाईन केलेल्या नोटा छापण्याची जपान सरकारची योजना आहे. या नोटा छापतांना तंत्रज्ञानाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना नवीन नोटा मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो, असे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे. प्रथम ‘3-डी होलोग्राम’ च्या या नोटा बँका आणि इतर वित्तीय संस्थांना दिल्या जाणार आहेत. त्यानंतर, हे एटीएम आणि दुकानांमध्ये त्यांचे वितरण होईल. या सर्व प्रक्रियेला महिना भराचा अवकाश लागेल, असेही जपान सरकारनं जाहीर केले आहे. (3-D Hologram Note)

============================

हे देखील वाचा : जपान करणार ऑटोमॅटिक रस्ता ?

============================

भारतात ‘3-डी होलोग्राम’ या तंत्रज्ञानाची चर्चा झाली ती इंडिया गेटवर नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याच्यावेळी. ‘3-डी होलोग्राम’ तंत्रज्ञान भारतात सर्रास वापरले जात नाही. त्यामुळे स्वातंत्र्यसेनानी आणि आझाद हिंद फौजेचे संस्थापक नेताजींचा हा ‘3-डी होलोग्राम’ तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं उभारलेला पुतळा लक्षवेधक ठरत आहे.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.