Home » Mumbai : आजही अंगावर शहारा आणणारा मुंबईतील महाप्रलयाचा ‘तो’ दिवस

Mumbai : आजही अंगावर शहारा आणणारा मुंबईतील महाप्रलयाचा ‘तो’ दिवस

by Jyotsna Kulkarni
0 comment
Mumbai
Share

दोन दिवसापासून मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊसाची संततधार चालू आहे. एका क्षणाचीही उसंत न घेता पाऊस नुसता कोसळत आहे. यामुळे मुंबईच्या रस्ते वाहतुकीवर, लोकलवर मोठा परिणाम झाला असून, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, ऑफिसमध्ये देखील घरून काम करण्याची मुभा मिळाली आहे तर अनेक कार्यालयांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. एकूणच काय तर पाऊसाने कधीही न थांबणाऱ्या मुंबईला थांबवले आहे. या थैमान घालणाऱ्या पावसाला पाहून अनेकांना २० वर्षांपूर्वीचा ‘तो’ काळा दिवस देखील आठवला. (Todays Marathi Headline)

तब्बल २० वर्षांपूर्वी २६ जुलै २००५ साली आलेल्या पावसाने केवळ १२ तासातच मुंबईला असे काही झोडपले की या दिवसाच्या आठवणी आजी अनेकांच्या अंगावर शहारा आणल्याशिवाय राहत नाही. २६ जुलै २००५ साली पाऊस जणू काळ बनूनच मुंबईवर कोसळत होता. या काळ रुपी पावसाने १००० पेक्षा अधिक मुंबईकरांचा जीव घेतला आणि मागे ठेवल्या फक्त आठवणी. २६ जुलै २००५ रोजी पडलेल्या विक्रमी पावसाने मुंबईची तुंबई केली. २६ जुलै २००५ रोजी झालेल्या पावसामुळे मुंबई थांबली होती. त्यावेळी मुंबईकरांनी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी जीवितहानी करणारा पाऊस अनुभवला होता. (Marathi News)

आता जुलैचा महिना म्हणजे पाऊस असणारच त्यामुळे २६ जुलैचा दिवस देखील इतर दिवसांसारखास सामान्य पावसाचाच होता. आता मुंबई आणि पाऊसाचे नाते जरा वेगळे आणि जवळचेच आहे. त्यामुळे पावसाला आपला दोस्त समजणाऱ्या मुंबईकरांनी रोजच्या सारखे त्या दिवशी देखील आपले सर्व यावरून ऑफिस गाठले. ‘आज जरा पाऊस जास्तच पडतोय’ असा विचार देखील अनेकांच्या मनात येऊन गेला असावा. मात्र ऑफिसच्या कामात कोणीही त्याकडे नीट लक्ष दिले नाही. मात्र जसजसा दिवस पुढे सरकू लागला तसतसा पाऊसाचा जोर अधिकच वाढू लागला. थोडी मनात हुरहूर जाणवू लागली होती, मात्र जोरदार पाऊस हा मुंबईकरांसाठी नवा नाही. पण काही वेळाने याच हुरहुरची जागा भीती आणि टेन्शन घेण्यास सूर्यवंत केली कारण पाऊसाचा जोर कमी तर होतच नव्हता पण सतत वाढतच चालला होता. (Latest marathi Headline)

Mumbai

अनेकांनी पुढचा धोका ओळखला आणि घरी जाण्याची तयारी केली. ऑफिसमधून बाहेर पडल्यावर लोकांना जे चित्र दिसले ते भयावह होते. संपूर्ण रस्ते जलमय होत होते. लोकल देखील धीम्या गतीने पुढे सरकत होत्या. त्यामुळे मिळेल ते वाहन पकडत लोकांनी घर गाठायचे ठरवले. मात्र यादरम्यान अनेक लोकं रस्त्यातच अडकले. कोणी लोकलमध्ये, कोणी बसमध्ये तर कोणी रिक्षा टॅक्सीमध्ये. आतापर्यंत पावसाच्या रुद्रावताराची जाणीव सगळ्यांना झाली होती.त्यामुळे सर्वच निघाले होते. रस्त्ये पाण्याने आणि माणसांनी भरले होते. मात्र पुढे जायची वाट काही सापडत नव्हती. पायी जाण्याचा मार्ग अनेकांनी निवडला पण त्याचा देखील काही उपयोग नव्हता. (Marathi Latest News)

पावसाचा वाढलेला जोर आणि मुंबईची तुंबई झाल्यामुळे नागरिकांना कमरेच्यावर आलेल्या पाण्यातून वाट काढणे असह्य झाले. मुंबईत जागोजागी पाणी भरल्याने आसरा घ्यायलाही लोकांना जागा मिळत नव्हती. अनेकांनी जीवाची पर्वा न घरात आपल्या घरी असलेल्या लोकांसाठी, लेकरांसाठी त्याच पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला. पण मुंबईत वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह इतका होता की, काही जण काहीही कळण्याच्या आत पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली. ज्या नागरिकांच्या गाड्या पाण्यात अडकल्या होत्या त्यांनी वाहनात पाणी शिरू नये म्हणून काचा बंद करून घेतल्या. पण त्या दिवशी आलेल्या जलप्रलयामुळे वाहनांमध्ये बसलेल्या अनेकांचा गुदमरून जीव गेला. (Top Marathi News)

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत जितका पाऊस पडतो, तितका पाऊस २६ जुलैच्या या एका दिवसात मुंबईत पडला होता. त्या दिवशी हवामान खात्याने मुंबईत ९९४ मिमी पावसाची नोंद केली. त्यामुळे 20 वर्षांपूर्वी आलेला जलप्रलय किती भयंकर होता, याचा अंदाज आपण लावूच शकतो. वीज नाही, अन्न नाही, थंडी जरी वाजली तरी अंगावर घेण्यासाठी अंथरूण नाही. अशा परिस्थिती घराबाहेर असलेले लोकं घरी जाण्याचा प्रयत्न करत होते. बाहेर असलेल्या सदस्यांच्या काळजीने घरातील मंडळी देखील हवालदिल झाली होती. या जलप्रलयात अनेक मुंबईकरांचे संसार वाहून गेले होते. २६ जुलैच्या या पावसानंतर वेगात पळणाऱ्या मुंबईला २८ जुलैपर्यंत ब्रेक लागला होता. अनेक फूट साचलेल्या पाण्याला ओसरायला तर वेळ लागणारच होता. मात्र यातही मुंबईकरांनी शक्य ती मदत पुरात अडकलेल्या लोकांना केली. अनेकांनी लोकांना आपल्या घरामध्ये आसरा दिला. खायला दिले, पाणी दिले पुन्हा एकदा मुंबईचे स्पिरिट या पाऊसात दिसून आले. या अतिवृष्टीमुळे मुंबईतील मालमत्तेचे जवळपास ५०० कोटींच्या आसपास नुकसान झाले. (Marathi Trending News)

२६ जुलैच्या प्रलयात मालमत्तेसोबतच जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली. यामध्ये तब्बल एक हजारांपेक्षा अधिक लोकांचा जीव गेला. मुंबईतली जवळपास १४ हजार घरे उद्ध्वस्त झाली. मुंबईतील इमारती, वस्त्यांमध्ये पाणी घुसून अनेकांचे संसार वाहून गेले. लोकलमध्ये अडकलेल्या शेकडो लोकांनीही रूळांवरून वाट काढत स्टेशनवरच आसरा घेण्याचा प्रयत्न केला. ऑफिसमध्ये अडकलेले लोक अक्षरशः दोन दिवस तिथेच अडकून होते, तर बाहेर पडलेले लोक आठ- दहा तासांच्या पायपिटीनंतर घरी पोहोचले होते. (Top Stories)

========

Russia And Ukraine : क्रिमिया….रशिया-युक्रेन युद्धाचे मुळ !

=========

रेकॉर्डनुसार या दिवशी तब्बल ३७ हजार रिक्षा, ४ हजार टॅक्सी आणि ९०० बेस्ट बसेसचे नुकसान झाले. तर हजारो मोठी वाहने पाण्यात अडकली. यामुळे कोट्यवधीचे नुकसान झाले. मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल २६ जुलैच्या पावसानंतर तब्बल १० दिवसांसाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. कारण, कल्याण ते कसारा मार्गावरचा रेल्वे मार्ग खचला होता. त्यामुळे तो दुरुस्त करण्याचे काम दहा दिवस चालले होते. या पावसाचा विमानसेवेवरही परिणाम झाला होता. तब्बल ७०० हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली होती. ज्या लोकनी २६ जुलैचा दिसावं अनुभवला आहे, त्यांच्या मनावर तो कायमस्वरूपी कोरला गेला आहे. या दिवसाच्या कटू आठवणी आजी मुंबईकरांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करतात. आज २० वर्षानंतर सुद्धा मुंबईकरांच्या आठवणींमध्ये हा दिवस जणू कालच घडल्यासारखा स्पष्ट आहे. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.