Home » 21 वर्षीय बंगाली मॉडेल-अभिनेत्रीची आत्महत्या, भाड्याच्या फ्लॅटमध्ये सापडला मृतदेह

21 वर्षीय बंगाली मॉडेल-अभिनेत्रीची आत्महत्या, भाड्याच्या फ्लॅटमध्ये सापडला मृतदेह

by Team Gajawaja
0 comment
Bidisha De Majumdar
Share

सिनेसृष्टीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय बंगाली अभिनेत्री आणि मॉडेल बिदिशा दे मजुमदार (Bidisha De Majumdar) हिने आत्महत्या केली आहे. ही बातमी समोर आल्यापासून बंगाली चित्रपटसृष्टीला धक्का बसला असुन या अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली जात आहे.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, 21 वर्षीय अभिनेत्री बिदिशाचा मृतदेह बुधवारी तिच्या फ्लॅटवर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. बिदिशा डमडमच्या नगरबाजारमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती आणि तिथे तिने आत्महत्या केली.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले जेथे दरवाजा तोडून अभिनेत्रीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

Image
Photo Credit – Twitter

====

हे देखील वाचा: आयुष्मान म्हणतोय ‘जागतिक सिनेमांआधी आपल्या चित्रपटांना जाणून घेणं गरजेचं’

====

पोलिसांनी घटनास्थळावरून बिदिशा दे मजुमदारची सुसाईड नोटही जप्त केली आहे ज्यामध्ये तिने स्वतःला कॅन्सरने पीडित असल्याचे सांगितले आहे. बिदिशा काही महिन्यांपूर्वी नगरबाजारमध्ये राहू लागली.

अभिनेत्रीच्या मित्रांनुसार, बिदिशाने 2019 मध्ये फ्रीलान्स मॉडेलिंग सुरू केले आणि ती नगरबाजार अपार्टमेंटमध्ये एकटीच राहायची. मात्र, काही लोक म्हणतात की बिदिशा खूप दिवसांपासून त्रस्त होती आणि तिच्या मैत्रिणींनाही सांगायची की जर काही बदललं नाही तर ती आपलं आयुष्य संपवेल. 

मित्रांनी हे देखील उघड केले आहे की अभिनेत्री एका जिम ट्रेनरसोबत रिलेशनशिपमध्ये होती जो तिची फसवणूक करत होता. प्रियकर एकाच वेळी तीन मुलींना डेट करत होता, ज्याची माहिती बिदिशाला आली.

Image
Photo Credit – Twitter

====

हे देखील वाचा: तारक मेहता का उलटा चश्मा मालिकेच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी, दया भाभी पुन्हा झाली आई 

====

बिदिशाला तिचा बॉयफ्रेंड कोणाशीही शेअर करायचा नव्हता, त्यामुळे ती खूप नाराज होती. सुसाईड नोटमधील ती कॅन्सरने ग्रस्त असल्याचे वक्तव्य पूर्णपणे खोटे असल्याचे अभिनेत्रीच्या मित्रांचे म्हणणे आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.