Home » Samaira Hullur कर्नाटकच्या समायरा हुल्लूरची गगनभरारी, वयाच्या १८ व्या वर्षी बनली व्यावसायिक पायलट

Samaira Hullur कर्नाटकच्या समायरा हुल्लूरची गगनभरारी, वयाच्या १८ व्या वर्षी बनली व्यावसायिक पायलट

by Jyotsna Kulkarni
0 comment
Samaira Hullur
Share

पूर्वीच्या काळी मुलगी झाली की, अनेकांचे चेहरे पडायचे, मुलींचा राग राग केला जायचा, त्यांना बोज समजले जायचे. मात्र आता काळ बदलला आणि लोकांचे विचारही बदलले. आता मुली घराची आण, बाण आणि शान झाल्या आहेत. अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मुली सर्वच क्षेत्रात यशाची शिखरं पादाक्रांत करताना दिसत आहे. (Samaira Hullur)

अगदी कमी वयात विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या मुली आज अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करत आहे. एखाद्या स्वप्नाने पछाडल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी वयालाही मागे टाकणाऱ्या एका मुलीबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कमी वयात एक ध्यास घेऊन तो पूर्ण करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवलेल्या समायरा हुल्लूरचे (Samaira Hullur) प्रेरणादायी कर्तृत्व आज सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे.

कर्नाटकातील (Karnataka) विजापूर (Vijaypur) येथील समायरा हुल्लूर नावाची मुलगी वयाच्या केवळ १८ व्या वर्षी (18 years old) पायलट (Pilot) बनली आहे. समायरा हुल्लूरने आकाशाला गवसणी घालत हे मोठे यश संपादन केले आणि इतिहास (Record) रचला आहे. समायरा भारतातील (India) सर्वात तरुण व्यावसायिक पायलट (Youngest Commercial Pilot)  ठरली आहे. समायरा ही उद्योगपती (Business) अमीन हुल्लूर (Amin Hullur) यांची मुलगी असून, तिने कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) (Commercial Pilot License) १८ व्या वर्षीच प्राप्त केले आहे. व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी ती भारतातील सर्वात तरुण पायलट ठरली.

समायराने विनोद यादव एव्हिएशन ॲकॅडमीमध्ये (Vinod Yadav Aviation Academy)  सहा महिन्यांचे विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. या अकादमीचे संस्थापक विनोद यादव आणि कॅप्टन तपेश कुमार (Vinod Yadav and Captain Tapesh Kumar) यांच्या मार्गदर्शनाखाली समायराने सीपीएलच्या सर्व परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्या आहेत. तिच्या या मोठ्या यशाची सध्या सगळीकडेच खूपच चर्चा रंगली आहे.

Samaira Hullur

दरम्यान समायराने तिच्या या आभाळाएवढ्या यशाचे श्रेय तिच्या अकादमीमधील सरांना विनोद यादव आणि कॅप्टन तपेश कुमार यांना दिले आहे. प्रशिक्षण (Training) कठीण असूनही या दोघांच्या मार्गदर्शनाखाली तिने ही एवढी मोठी कामगिरी केली आहे.

समायराने पायलटिंगसह सहा अनिवार्य कोर्समध्ये सुद्धा सहभाग घेतला होता. तिने लेखी परीक्षेतही तिने चांगली कामगिरी केली. यासोबतच समायराने महाराष्ट्रातील (Maharashtra) बारामती (Baramati) येथे असलेल्या कार्व्हर एव्हिएशन ॲकॅडमीमध्ये (Carver Aviation)  सात महिन्यांच्या उड्डणांचे प्रशिक्षण घेतले, जेथे समायराला विमान वाहतुकीत येणाऱ्या अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. कार्व्हर एव्हिएशन ॲकॅडमीमध्ये तांत्रिक कौशल्य (Technical Knowledge) मिळाले नसल्याचे तिने सांगितले. ‘कॅप्टन तपेश कुमार माझ्यासाठी प्रेरणास्थान होते. ते वयाच्या २५ व्या वर्षी पायलट झाले. आता मी १८ व्या वर्षी व्यावसायिक पायलट झाली’ असे समायरा म्हणाली.

=======

हे देखील वाचा : ड्रोन की युएफओ अमेरिकेत खळबळ !

शानदार नोएडा फिल्म सिटी

=======

कॅबिनेट मंत्री मल्लनगौडा बसनगौडा पाटील उर्फ ​​एमबी पाटील (Mallanagouda Basanagouda Patil) Mallanagouda Basanagouda Patilयांनीही समायराचे अभिनंदन केले आहे. समायराचा फोटो त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, “देशातील सर्वात तरुण पायलट समायरा हुल्लूर हिचे हार्दिक अभिनंदन, तिने राष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा आणि राज्याचा गौरव वाढवला आहे. वयाच्या १८ व्या वर्षी एवढे मोठे यश मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. मला आशा आहे की, विजयपूरच्या या युवा प्रतिभेचे भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल.”


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.