दिवंगत लता मंगेशकर, आजही त्यांच्या चाहत्यांमध्ये नाईटिंगेल ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जातात, त्यांनी ‘भारताचा आवाज’ म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या आवाजाला प्रत्येक भारतीयाच्या हृदयात एक विशेष स्थान आहे आणि प्रत्येकाच्या मनात अमिट छाप सोडली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
स्टारप्लसने या लोकप्रिय आवाजांना त्यांच्या ‘नाम रह जायेगा’ या खास मालिकेद्वारे संगीत उद्योगातील दिग्गज लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ एकत्र येत आहेत. भावना आणि नॉस्टॅल्जियाने भरलेल्या, या विशेष कार्यक्रमात, गायक त्यांच्या आठवणी आणि लताजींशी संबंधित किस्से शेअर करतील. या सांगीतिक वारशाला आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यासाठी, एक-दोन नव्हे तर तब्बल अठरा नामवंत गायक एकत्र येत आहेत.
====
हे देखील वाचा: ‘चंद्रमुखी’मध्ये रंगणार अमृता- प्राजक्ताची जुगलबंदी
====
या भव्य श्रद्धांजली कार्यक्रमात सोनू निगम, अरिजित सिंग, शंकर महादेवन, नितीन मुकेश, नीती मोहन, अलका याज्ञिक, साधना सरगम, प्यारेलाल जी, उदित नारायण, शान, कुमार सानू, अमित कुमार, जतिन पंडित, जावेद अली, ऐश्वर्या मजुमदार, स्नेहा पंत, पलक मुच्छल आणि अन्वेषा मंचावर एकत्र येत लता मंगेशकर यांची सर्वात प्रतिष्ठित गाणी गाऊन त्यांना श्रद्धांजली वाहतील. या कार्यक्रमात लता मंगेशकर यांचे कुटुंबीय देखील आपली विशेष उपस्थिती लावणार आहेत.
या कार्यक्रमाबद्दल बोलताना, भारतातील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक, शान म्हणतो,”या भव्य श्रद्धांजलीचा भाग बनणे हा मोठा सन्मान आहे. लताजी केवळ अशी व्यक्ती नाही ज्यांचा मी केवळ सन्मान करतो, परंतु त्यांचे प्रशंसा आणि प्रेम देखील करतो. ते असे व्यक्तीमत्व आहे ज्याच्याशी प्रत्येक भारतीय मनापासून जोडलेला आहे. मी याला माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक मानतो आणि अशा भव्य मंचावर देशातील या महान गायकाला श्रद्धांजली वाहण्याची संधी मला मिळाली हे मला अविश्वनीय वाटत आहे. मी स्वतःला खरोखर भाग्यवान समजतो.”
====
हे देखील वाचा: ‘गुल्हर’ चित्रपटाचा जबदस्त ट्रेलर रिलीज
====
साईबाबा स्टुडिओचे श्री गजेंद्र सिंग निर्मित, ‘नाम रह जायेगा’ त्या परम आवाजाला श्रद्धांजली वाहण्यासाठी सज्ज आहे, ज्याने आम्हाला महान लता मंगेशकर यांच्या प्रति भावना आणि आशेने भारले आहे. ही 8 भागांची मालिका 1 मे 2022 पासून केवळ स्टार प्लसवर प्रदर्शित होणार आहे.