भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. आपल्या देशात कितीही समस्या, संकटं असले तरी आपला देश हा कायमच संपूर्ण जगामध्ये एकमेव अनोखा देश म्हणून भारताचा उल्लेख केला जातो. मात्र भारताने मोठ्या संघर्षाने हे स्वातंत्र्य मिळाले आहे. तब्बल १५० वर्ष ब्रिटिशांच्या जुलमातीत काढून भारताला स्वातंत्र्य मिळाले. या १५० वर्षांच्या काळात भारतातील नागरिकांनी हरप्रकारे ब्रिटिशांसोबत संघर्ष केला. विविध मार्गांचा अवलंब करून त्यांनी ब्रिटिशांच्या गुलामगिरीला खोडून काढले. (Vande Mataram)
त्या काळात थोर कादंबरीकार, संपादक, कवी आणि तत्त्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली ‘वंदे मातरम्’ हे गीत लिहिले. या गीताला आपल्या देशात खूप महत्त्व आहे. या गीतांमधून चटोपाध्याय यांनी भारतमातेची अतिशय सुंदर पद्धतीने स्तुती केली आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या या भारतमातेच्या स्तुती गीताला आज ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्ष पूर्ण होत आहेत. वंदे मातरम या गीताला ऐकून प्रत्येक भारतीयाच्या मानत देश प्रेमाची भावना जागृत झाली नाही तरच नवल. अतिशय समर्पक शब्दात चटोपाध्याय यांनी या गीताचे लेखन केले आहे. जेव्हा देश पारतंत्र्यात होता तेव्हा या गीताच्या माध्यमातून भारतीयांच्या मनात राष्ट्रभावना जागृत करण्यात आली होती. अशा या गीताचा वर्धापन दिन सोहळा संपूर्ण देशात धूमधडाक्यात साजरा होत आहे. (bankim chandra chatterjee )
भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंद मठ’ या कादंबरीला आणि त्यातील ‘वंदे मातरम्’ या गीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. १८८२ मध्ये प्रकाशित झालेली ही बंगाली कादंबरी आणि त्यातील ‘वंदे मातरम्’ हे गीत आजही देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक समजले जाते. या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. ‘आनंद मठ’ ही कादंबरी १८ व्या शतकातील बंगालमधील संन्यासी बंडखोरीवर आधारित आहे. (India)
बंकीमचंद्र यांचा जन्म १६ जून १८३८ ला बंगालमधील नैहाटीच्या काठालपाडा येथे झाला. त्यांच्या वडीलांचे नाव देवचंद्र चटोपाध्याय असे होते. बंकीम यांना तीन भाऊ होते. त्यांच्या दोन मोठ्या भावांची नावे श्यामचरण आणि संजीवचंद्र आणि एक लहान भाऊ पूर्ण चंद्र असे होते. मात्र या चारीही भावांमध्ये बंकीमचंद्र हे साहित्यात अतिशय हुशार होते. लहानपणापासूनच कुशाग्र बुध्दी असलेले बंकीमचंद्र न्याय, खऱ्याची बाजू घेणारे होते. त्यांची हुशारी पाहूनच कायद्याचे शिक्षण घेत असताना त्यांना डेप्यूटी मॅजिस्ट्रेट आणि डेप्यूटी कलेक्टरची नोकरी लागली. ‘राजमोहन्स वाइफ’ (१८६४) ही त्यांची पहिली इंग्रजी कादंबरी, तर ‘दुर्गेशनंदिनी’, ‘कपालकुंडला’, ‘मृणालिनी’, ‘विषवृक्ष’, ‘इंदिरा’, ‘चंद्रशेखर’, ‘राजसिंह’ आणि ‘आनंदमठ’ (१८८२) या बंगाली कादंबऱ्यांनी त्यांना ख्याती मिळवून दिली. ‘बंगदर्शन’ नियतकालिकाचे संपादन करत त्यांनी वैचारिक लेखनाला चालना दिली. बंकीम चंद्र यांचा मृत्यू ८ एप्रिल १८९४ ला झाला. (Marathi)

बंकिमचंद्र यांनी तीस वर्षांपर्यंत नियमित डेप्यूटी कलेक्टरच्या पदावर नोकरी केली. इंग्रज सरकारशी कायम ते करत असलेल्या अन्यायाविरोधात त्यांचे मतभेद होते. याच मतभेदांमुळे त्यांना योग्यता असूनही पदोन्नती मिळत नव्हती त्यामुळे त्यांनी स्वेच्छेने नोकरी सोडली. बंकिम चंद्र हे डेप्यूटी कलेक्टर असताना १८५७ मध्ये इंग्रज सरकार ‘गॉड सेव्ह दी क्वीन’ हे ब्रिटिशांचे राष्ट्रगीत भारताचे राष्ट्रगीत म्हणून रुजू करण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी हे गीत सैन्यात आणि शाळांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न सुरू केला. यामुळे इतर सामान्य भारतीयांसोबतच बंकिमचंद्रही खूप संतापले. (Todays Marathi Headline)
बंकिमचंद्र यांनी यावर विचार केला. त्यांच्या लक्षात आले की भारताचे कोणतेही राष्ट्रगीत नव्हते. म्हणून ७ नोव्हेंबर १८७५ रोजी त्यांनी देशभक्तीच्या भावनांनी ओथंबलेले आणि भारत देशाला मातृभूमी असे संबोधित करून तिची स्तुती आणि तिला नमन करणारे ‘वंदे मातरम्’ हे सहा कडव्यांचे गीत लिहिले. बंकिमचंद्रांनी मागील शतकातील ‘संन्याशांचे बंड’ या ऐतिहासिक घटनेवर आधारित १५ डिसेंबर १८८२ साली ‘आनंद मठ’ ही कादंबरी लिहिली. त्यांनी या कादंबरीत ‘वंदे मातरम्’ हे गीत समाविष्ट केले होते. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या या तेजस्वी काव्याचा इतिहास, स्वातंत्र्यलढ्यात त्याचे असलेले स्थान आणि त्याला मिळालेला ‘राष्ट्रीय गीताचा’ दर्जा आज या गीताला १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Marathi News)
वंदे मातरम हे गीत सर्वप्रथम ७ नोव्हेंबर १८७५ रोजी बंकिमचंद्र यांच्या ‘बंगदर्शन’ या साहित्यिक मासिकात प्रकाशित झाले. त्या नंतर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८८२ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या गाजलेल्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत या गीताचा समावेश केला. तर ‘वंदे मातरम्’ हे गीत पहिल्यांदा १८९६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी गायले होते. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या लोकांना ब्रिटिशांविरोधात लढण्याचे बळ या गीताने सतत दिले. (Marathi Trending Headline)
‘वंदे मातरम्’ हे गीत केवळ शब्द नव्हते, तर ते मातृभूमीवरील निस्सीम प्रेमाची आणि देशभक्तीची भावना जागृत करणारे एक शस्त्र बनले. १९०५ मध्ये झालेल्या बंगालच्या फाळणी विरोधातील ‘स्वदेशी’ आंदोलनात हे गीत क्रांतीकारक आणि सामान्य जनतेचा युद्धघोष बनले. देशभरात “वंदे मातरम्” च्या जयघोषाने ब्रिटीश सत्तेला हादरे दिले. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हाच शब्द मुखात ठेवला, ज्यामुळे या गीताला अमरत्व प्राप्त झाले. २४ जानेवारी १९५० रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेत ‘वंदे मातरम्’ या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला. (Top Marathi News)
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लाखो भारतीयांना प्रेरित करण्यात या गीताचा अमूल्य वाटा होता. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी निवेदन करताना स्पष्ट केले की, ‘वंदे मातरम्’ने स्वातंत्र्यलढ्यात बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे, त्याला राष्ट्रगान ‘जन गण मन’ प्रमाणेच समान दर्जा आणि सन्मान दिला जाईल. हे गीत आजही देशाप्रती अभिमान, प्रेम आणि समर्पण याची भावना कायम ठेवते. (Marathi Latest Headline)
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ७ नोव्हेंबर शुक्रवारी रोजी “वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त वर्षभर चालणाऱ्या एका कार्यक्रमाची सुरुवात करणार असल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी एक स्मारक टपाल तिकीट आणि एक स्मारक नाणं देखील प्रकाशित केले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देणारं गीत ‘वंदे मातरम्’चं महत्त्व नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं हे या देशव्यापी स्मरणोत्सवाचं उद्दिष्ट आहे. (Top Trending News)
=========
Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!
=========
हा स्मरणोत्सव कार्यक्रम ७ नोव्हेंबर २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत चालेल. देशभरात विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक सहभागाचे कार्यक्रम आयोजित केले जातील. मुख्य समारंभात, देशभरातील लोक एकत्रितपणे सकाळी ९:५० वाजता ‘वंदे मातरम्’चं संपूर्ण रूप गातील. २०२५ मध्ये वंदे मातरम रचनेची १५० वर्षे पूर्ण होत आहेत. हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ७ नोव्हेंबर 1875 रोजी अक्षय नवमीच्या दिवशी लिहिले होते. नंतर ते त्यांच्या प्रसिद्ध कादंबरी ‘आनंदमठ’च्या एका भागाच्या रूपात साहित्यिक मासिक ‘बंगदर्शन’मध्ये प्रकाशित झाले. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
