Home » Afghanistan To India : विमानाच्या चाकाला लटकून तो अफघाणवरून भारतात आला पण…

Afghanistan To India : विमानाच्या चाकाला लटकून तो अफघाणवरून भारतात आला पण…

by Team Gajawaja
0 comment
Afghanistan To India
Share

दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्टवर ग्राउंड स्टाफचा CISF च्या जवानांना एक कॉल येतो की, “एक अनोळखी मुलगा अर्धा तास विमानाच्या रनवे वर एकटाच फिरताना दिसतोय..” लगेचच CISF ची टीम त्या ठिकाणी जाऊन त्या अनोळखी मुलाला पकडते. हा मुलगा थंडीने कुडकुडत होता. त्या मुलाची जेव्हा चौकशी झाली तेव्हा काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. हा 13 वर्षांचा मुलगा अफगानिस्तानहून आलाय. त्याच्याकडे पासपोर्ट मागितलं तर त्याच्याकडे ना पासपोर्ट, ना तिकीट, ना कोणतीच कागदपत्र. मग हा मुलगा अफगानिस्तानहून दिल्लीला आलाच कसा? तर यावर त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. (Afghanistan To India)

सकाळी 11.10 च्या आसपास काबूलहून निघालेलं KAM Air Flight RQ-4401 दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँड झालं. तो त्या विमानातच होता पण तो पॅसेंजर सीट वर बसून नाही तर विमानाच्या चाकाला लटकून आला होता कारण त्याला इराणला पळून जायचं होतं, तो चुकून भारतात आला. पण आता प्रश्न असा की, इतक्या धोकादायक प्रवासात तो जिवंत कसा पोहोचला? आणि त्याचं अशापद्धतीने पळून यायचं कारण काय? त्यात तो अफगानिस्तानच्या कुंदुझ शहरातून आलेला.. जे बरीच वर्ष युद्ध आणि अस्थिरतेचा सामना करणारं ठिकाण आहे.. तर त्याचा इराणला पळून जाण्यामागे कोणता राजकीय हेतु होता का? हे सगळं जाणून घेऊ. (Top Stories)

Afghanistan To India

21 सप्टेंबर 2025 च्या सकाळी अफगानिस्तानच्या काबूलहून काम एअरची फ्लाइट RQ-4401 दिल्लीला 11.10 च्या सुमारास लँड झाली. तसं अफगानिस्तान ते दिल्ली हे जेमतेम दीड-दोन तासांचं अंतर. हा 13 वर्षांचा मुलगा काबूल एअरपोर्टमध्ये शिरला. मग काबूल एअरपोर्ट वर एका पॅसेंजर कारच्या मागून गेला आणि काम एअर फ्लाइट जवळ पोहोचला. त्याला वाटलं की, हे विमान इराणला जातंय. मग कोणाचं लक्ष नसताना विमानच्या चाकाच्या खालच्या भागात जाऊन बसला. विमान टेक ऑफ झालं. तेव्हा हा विमानाच्या मागच्या लँडिंग गिअरच्या बॉक्समध्ये लपला होता. आता लँडिंग गिअर बॉक्स म्हणजे विमानाच्या चाकांचा तो भाग, जो प्रेशराइज्ड नसतो. काबूल ते दिल्लीचं विमान ३०,००० फुटांवरून उडतं. तेव्हा तिथलं तापमान असतं -५० ते -६० डिग्री सेल्सियस असतं. म्हणजे काही वेळातच गोठून मरायची पाळी येऊ शकते आणि त्याहून भयंकर म्हणजे त्या भागात ऑक्सिजनची कमतरता म्हणजे सफोगेशन होऊन मृत्यू होऊ शकतो. त्यात २०,००० फुटांच्या वर हवा इतकी पातळ असते की, काही मिनिटांतच मेंदूला नुकसान होऊन मृत्यू येतो. तरीही हा मुलगा जिवंत कसा राहिला. (Afghanistan To India)

काही तज्ज्ञ सांगतात, असं क्वचित घडतं तेव्हा थंडीमुळे शरीराचं मेटाबॉलिझम खूपच मंदावतं, जसं काही हायबरनेशनसारखं. यामुळे ऑक्सिजनची गरज कमी होते आणि हायपोक्सियाचा म्हणजे ऑक्सिजन कमतरतेचा परिणाम कमी होतो. पण तरीही, अशा प्रवासात जिवंत राहण्याची शक्यता २०% पेक्षाही कमी असते. तरी हा मुलगा चालत होता, याचा अर्थ तो या सगळ्या अशक्य परिस्थितीतून जिवंत राहिला – जे खरंच एक मेडिकल मिरॅकल आहे! पुढे मग आणखी चौकशी झाली तेव्हा लँडिंग गिअरच्या बॉक्समध्ये एक स्पीकर सापडला, जो या लहान मुलानेच आणला होता. मग तो कशासाठी आणला होता? प्रवासात फक्त गाणी ऐकायला? याचाही कोणताच पुरावा नाही. पण टेक्निकली, अशी कोणतीही वस्तू तिथे असणं म्हणजे मोठा धोका. ते स्पीकर हायड्रॉलिक सिस्टीममध्ये अडकलं असतं तर विमानाचं लँडिंग किंवा टेकऑफ धोक्यात आलं असतं. म्हणूनच एअरलाइनने तपासणी केली आणि सुदैवाने ती सापडली. (Top Stories)

===============

हे देखील वाचा :China : जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांना चीनची साद ! 

================

मग त्याची आणखी खोलवर चौकशी करण्यात आली. तेव्हा कळलं की, हा मुलगा १३ वर्षांचा, अफगाणिस्तानच्या कुंदुझ शहरातला आहे. आता कुंदुझ म्हणजे गेल्या काही वर्षांत खूप युद्ध आणि अस्थिरतेचा सामना करणारं ठिकाण 2021 मध्ये तालिबानने कुंदुझ शहर आणि प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवलं. मानवाधिकारांचं उल्लंघन, विशेषतः महिलांवरील निर्बंध आणि पत्रकार, कार्यकर्त्यांवर दबाव, याबाबत सतत तक्रारी अफगानिस्तानहून येतच असतात. 2022 मध्ये कुंदुझ शहरावर हल्ले झाले होते. यामुळे अनेक लोकांचा जीव गेला. 2021 मध्ये हिंसेमुळे 24,752 लोकांना कुंदुझमधून स्थलांतर करावं लागलं. त्यामुळे काही माध्यमांमध्ये अशी चर्चा झाली की, कदाचित कुंदुझमधल्या गरीबी आणि अस्थिरतेच्या परिस्थितीमुळे तो पळून आला असेल, पण CISF आणि इतर अधिकाऱ्यांनी त्याची कसून चौकशी केली, तेव्हा त्या मुलाकडून कोणतंच उत्तर मिळालं नाही. (Afghanistan To India)

शेवटी कोणताच पुरावा मिळाला नाही आणि त्यात तो अल्पवयीन असल्याने त्याच्यावर कोणतच गुन्हा दाखल झाला नाही आणि कदाचित ही गोष्ट मोठी होऊन आंतरराष्ट्रीय वाद निर्माण होऊ नये म्हणून त्याला त्याच दिवशी, रविवारी दुपारी त्याला परत काबूलला पाठवलं गेलं. म्हणजे सकाळी ११:१० वाजता सापडला, चौकशी झाली, डिप्लोमॅटिक क्लिअरन्स मिळालं आणि दुपारीच त्याला परत पाठवलं. इतकी पटापट कारवाई झाली. पण सध्या काबूल एअरपोर्टवर झालेला हा सर्वात मोठा सिक्युरिटी ग्लिच असल्याचं म्हटलं जातंय. म्हणजे जर का एखादा लहान मुलगा असा एअरपोर्टच्या आत आणि विमानपर्यंत पोहोचू शकतो तर काबूल एअरपोर्टवर हायजॅकर्ससाठी सिक्युरिटी तोडून आत शिरणं जास्त कठीण नाही अशी चर्चा सुरू आहे. (Top Stories)

हा मुलगा इतक्या भयानक परिस्थितीतही जिवंत राहिला, ही खरच आश्चर्याची गोष्ट आहे. पण त्याने असं करण्यामागे कारण काय असेल? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.