शाहरुख खान, प्रीती झिंटा आणि सैफ अली खान यांचा ‘लव्ह ट्रँगल’ असलेला ‘कल हो ना हो (Kal Ho Naa Ho)’ हा चित्रपट आजही अनेकांचा आवडता चित्रपट आहे. प्रत्येक चित्रपट बनवताना अनेक कहाण्या घडत असतात. परंतु, पडद्यावर दिसणाऱ्या उत्तम कलाकृती मागे घडलेल्या म्हणजेच ऑफस्क्रीन घटनांची माहिती मात्र सर्वसामान्य प्रेक्षकांना नसते. ‘कल हो ना हो’ या चित्रपटासंबंधित अशाच काही ऑफस्क्रीन घटनांबद्दल जाणून घेऊया –
१. चित्रपटाचं नाव –
सुरवातीला या चित्रपटाला ‘कभी अलविदा ना कहना ‘ असं नाव देण्यात आलं होतं. पण नंतर जेव्हा करण जोहरने हमेशा या चित्रपटातलं ‘ऐसा मिलन कल हो ना हो’ हे गाणं ऐकलं तेव्हा त्याने त्याचा विचार बदलला.
२. नैनाची भूमिका –
नैनाच्या भूमिकेसाठी आधी करीना कपूरला विचारण्यात आले होते. परंतु, करीनाला या भूमिकेसाठी ऑफर करण्यात आलेली रक्कम तिला मान्य न झाल्याने प्रीती झिंटाची निवड करण्यात आली.
३. रोहितची भूमिका –
सैफ अली खानने साकारलेल्या रोहितच्या भूमिकेसाठी देखील आधी अनेक कलाकारांचा विचार केला गेला होता. सलमान खान, अभिषेक बच्चन आणि विवेक ओबरॉय यांनी ही भूमिका नाकारल्यानंतर ही संधी सैफ कडे आली.
४. शूटिंग लोकेशन –
या चित्रपटाचं शूटिंग न्यू यॉर्क मध्ये झालं आहे, पण त्यासाठीची पहिली निवड मात्र ‘टोरोंटो’ होती.
५. शीर्षक गीत
या चित्रपटाचे म्युझिक कंपोजर लॉय मेंडोसा यांनी निखिल अडवाणी यांच्या सोबत ‘जर्मन बेकरी’ मध्ये बसलेले असताना या चित्रपटाच्या शीर्षक गीताची रचना केली.
६. प्रिटी वूमन –
रॉय ऑर्बिसन याचं ‘प्रिटी वूमन’ हे गाणं करण जोहरला आपल्या सिनेमात हवंच होतं. म्हणून त्याने आंतरराष्ट्रीय कॉपीराइट कायद्यानुसार रीतसर या गाण्याचे लायसन्स मिळवले.
७. जेनिफर –
जेनिफरच्या भूमिकेसाठी करण जोहरने पहिल्यांदा नीतू कपूर यांचा विचार केला होता, पण काही कारणांमुळे ते शक्य झालं नाही आणि जया बच्चन यांनी ही भूमिका साकारली.
८. जियाचं डॉल हाऊस –
या चित्रपटामुळे घराघरात प्रसिद्ध झालेलं डॉल हाऊस प्रीती झिंटाने खास शूटिंगच्या आदल्या दिवशी डिझाईन करून घेतलं होतं.
९. प्रिती झिंटाची फिल्ममधील एन्ट्री –
चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला जॉगिंग करणारी प्रीती झिंटा दिसते ती प्रीती झिंटा नसून तिची डमी मॉडेल होती. कारण या शूटचा आधी प्रीती झिंटाला थोडीशी दुखापत झाली होती.
१०. शाहरुख खान हा चित्रपट सोडणार होता –
‘कल हो ना हो’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शाहरुख खान आजारी पडला होता आणि त्याची सर्जरी झाली होती. त्यामुळे तो हा चित्रपट सोडणार होता. परंतु, करण जोहरने शाहरुखसाठी थांबायची तयारी दर्शवली आणि शाहरुखला आपला निर्णय बदलावा लागला.
११. यश जोहर यांचा शेवटचा चित्रपट –
‘कल हो ना हो (Kal Ho Naa Ho)’ हा यश जोहर यांनी निर्मिती केलेला शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा: माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या भेटीचा हा किस्सा तुम्हाला माहिती आहे का?
१२. अर्जुन कपूरच्या करिअरची सुरुवात –
अभिनेता अर्जुन कपूरचा सिनेसृष्टीतील करिअरची सुरुवात ‘कल हो ना हो’ या चित्रपटापासून झाली. त्याने या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
हे देखील वाचा: कहाणी संगीतकार रामभाऊ कदम यांच्या एका गाण्याची!
१३. तेलगू रिमेक –
तेलगू डायरेक्टर कृष्णा वामसी यांनी अभिनेता प्रभासला घेऊन या चित्रपटाचा रिमेक बनवला. त्याचं नाव ‘चक्रम’ असं होतं.
कल हो ना हो हा चित्रपट आज १८ वर्षांनंतरही सिनेरसिकांच्या मनावर राज्य करत आहे. यातच या चित्रपटाचे यश सामावलेलं आहे.