उत्तरप्रदेश मधील प्रयागराजची भूमी महाकुंभमेळ्यासाठी सज्ज झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या या धार्मिक मेळ्यासाठी करोडो भाविक येणार आहेत. या भाविकांना हिंदू धर्माच्या व्यापकतेचा अनुभव घेता येणार आहे. प्रयागराज संगम स्थानावर स्नान करण्याला महत्त्व आहे. यासाठी जगभरातून भाविक प्रयागराजमध्ये दाखल होणार आहेत. या भाविकांना बघण्यासाठी प्रयागराजमध्ये अनेक पुरातन मंदिरे आहेत. या पुरातन मंदिरांसोबतच प्रयागराजच्या घाटांवर आणखीही प्रेक्षणिय स्थळे आणि मंदिरांची उभारणी करण्यात येत आहे. या सर्व मंदिरांमध्ये भारतातील 12 ज्योतिलिंगांना एकाच वेळी भेट देण्याची संधी भाविकांना देणार आहे. भारताच्या नकाशाच्या आकाराच्या या मंदिरात ज्योतिर्लिंग असलेली पवित्र स्थाने जशीच्या तशी उभारण्यात आली आहे. या मंदिराचा परिसरही अतिशय मोठा असून भाविकांसाठी सर्व सुविधा येथे उभारण्यात आल्या आहेत. (Uttar Pradesh)
तिर्थराज प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यासाठी लाखोंच्या संख्येने साधू संत दाखल होत आहेत. 14 आखाड्यातील साधू मोठ्या संख्येनं महाकुंभ परिसरात आले आहेत. प्रयागराज येथे या सर्व साधूंचे आखाडे असून या आखाड्यांतर्फे त्यांचे महामंडप उभारण्यात येत आहेत. या सर्व कामांना आता गती आली असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही सर्व कामे पूर्णत्वास जाणार आहेत. यासोबत या आखाड्यांतर्फे महायज्ञही सुरु झाले आहेत. (Social News)
एकूण प्रयागराजे वातावरण अधिक धार्मिक झाले आहे. या सर्वात प्रयागराजमधील सर्वच मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी वाढली आहे. या सर्व भाविकांसाठी प्रशासनानं अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. प्रयागराजमधील सर्वच मंदिरांचा परिसर अधिक मोठा करण्यात आला असून मंदिरांची सजावट कऱण्यात आली आहे. प्रयागराजच्या प्रत्येक गल्लीबोळात मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांसोबतच प्रयागराज प्रशासनानंही अनेक नवीन मंदिरे उभारली आहेत. शिवाय काही प्रक्षणीय स्थळेही उभारली आहेत. यात निषादराज उद्यान हे भाविकांचे आवडते स्थळ झाले आहे. याबरोबरच 12 ज्योतिलिंग मंदिरही भाविकांचे श्रद्धास्थान झाले आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करण्याचे स्वप्न प्रत्येक शिवभक्ताचे असते. मात्र प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. (Uttar Pradesh)
पण प्रयागराजमध्ये येणा-या शिवभक्तांना एकाचवेळी 12 ज्योतिलिंगाचे दर्शन घडत आहे. प्रयागराजच्या द्वादश ज्योतिलिंग मंदिरांमध्ये यासाठी भाविक गर्दी करत आहेत. प्रयागराजच्या मिंटो पार्क मधील मंदिरात भगवान शंकराची 12 ज्योतिलिंगे एकत्र पाहण्याची संधी मिळत आहेत. प्रयागराजची द्वादश ज्योतिलिंग किंवा नक्षत्र वाटिका ही शिवभक्तांच्या आवडीचे स्थान झाली आहे. या भव्य उद्यानात 12 ज्योतिलिंगांचीच नव्हे, तर 27 नक्षत्रांचीही सविस्तर माहिती भाविकांना होत आहे. याशिवाय या उद्यानात ग्रहता-यांचीही माहिती भाविकांना घेता येणार आहे. 12 ज्योतिलिंगांना येथे भारताच्या नकाशात उभारण्यात येत आहे. या ज्योतिलिंगांच्या मंदिरांची हुबेहुब कलाकृती त्यांच्या स्थानावर उभारली जात आहे. यातून भाविकांना भारताच्या कुठल्या स्थानावर मंदिर आहे, याची कल्पना येते. (Social News)
हे सर्व काम 30 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. भारतात सोमनाथ, गुजरात , मल्लिकार्जुन, आंध्र प्रदेश, महाकालेश्वर, उज्जैन, मध्य प्रदेश, ओंकारेश्वर, मध्य प्रदेश, केदारनाथ, उत्तराखंड, भीमाशंकर, महाराष्ट्र, विश्वनाथ, उत्तर प्रदेश, त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, बैद्यनाथ, झारखंड, नागेश्वर, गुजरात, रामेश्वरम, तामिळनाडू, घुसमेश्वर महाराष्ट्रही 12 ज्योतिलिंग आहेत. या सर्वांना प्रयागराज येथे येणा-या भाविकांना एकाचवेळी पहाता येणार आहे. या व्यतिरिक्त प्रयागराज येथे आणखीही अनेक स्थळे आहेत, जिथे भाविक भेट देत आहेत. यामध्ये त्रिवेणी संगम, खुसरो बाग, आनंद भवन, ऑल सेंट्स कॅथेड्रल, प्लॅनेटेरियम आणि अल्फ्रेड पार्क या सर्वांचा समावेश आहे. प्रयागराजच्या सर्वच घाटांचे नुतनीकरण होत असून हे कामही 30 डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. (Uttar Pradesh)
======
हे देखील वाचा : महाकुंभमध्ये हॉटेल नाही, होम स्टे मध्ये रहा
=======
महाकुंभमेळ्यात येणा-या करोडो भाविकांना संगम स्थानावर जाण्यासाठी कुठलिही अडचण येऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरुपातील 30 पूल उभारण्यात येत आहेत. महाकुंभमेळयासाठी संगम घाटावर विजेचे अनेक खांब उभारण्यात आले असून यावर 48000 एलईडी पथदिवे आतापर्यंत बसविण्यात आले आहेत. येथून रात्रीच्यावेळी संगमस्थानाचा नजारा मोहक दिसत आहे. काही ठिकाणी महाकुंभमेळ्याचे सेल्फी पॉईंटही उभारण्यात आले असून भाविक त्या सेल्फी पॉईंटनाही भेट देत आहेत. (Social News)
सई बने