Home » जाणून घ्या ‘या’ आठवड्यात कोणत्या राशींना होणार लाभ

जाणून घ्या ‘या’ आठवड्यात कोणत्या राशींना होणार लाभ

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

दिवाळीच्या वातावरणाची काही दिवसातच सुरुवात होणार आहे. या उत्साही वातावरणात तुमच्या राशींसाठी ग्रहमान कसं असेल, याबद्दल जाणून घेऊया (Weekly Horoscope 10 Oct to 16 Oct)

मेष – आपल्या राशीच्या व्ययस्थानातून गुरु वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग येतील. आपल्या अडचणींवर योग्य मार्ग मिळाल्यामुळे आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभेल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. सामाजिक पत प्रतिष्ठा उंचावेल. लोकहितार्थ अर्थ कामे केली जातील. कुटुंबातील व्यक्तीकुटुंबातील व्यक्तीबाबत सुवार्ता कानी येतील. स्वतंत्र व्यावसायिकांना व्यवसायातील खरेदी विक्रीतून मोठ्या प्रमाणावर लाभ होतील परंतु व्यवसायात स्वतः लक्ष घालणे गरजेचे आहे. जुनी आणि वसूल होतील. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. आठवड्याच्या उत्तरार्धात पराक्रम स्थानातील मंगळावरून चंद्राचे होणारे भ्रमण आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी देणारे राहील. भावंड सौख्य लाभेल. नवीन ओळखीतून विविध फायदे होतील. व्यवसाय वृद्धिंगत होण्यास मदत होईल. आपल्या हातून दानधर्म होईल. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील.

शुभ दिनांक : 15, 16

वृषभ – लाभस्थानातील गुरुवरून होणारे चंद्राचे भ्रमण मित्र परिवाराच्या सहाय्याने रेंगाळलेली कामे मार्गी लावण्यात सहकार्य करेल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. आपला सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने ग्रहमान अतिशय अनुकूल आहे. या आठवड्यात आयुष्यातील काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. सरकारी कामांना गती येईल. धार्मिक विषयावर लेखन केले जाईल. नोकरी व्यवसायात नवीन संधी चालून येतील. बढती बदलीतून लाभ होतील. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. महत्त्वाचे निर्णय घेताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. आठवड्याच्या उत्तरार्धात अनपेक्षितपणे खर्च उद्भवण्याची शक्यता राहते. कुटुंबात आपल्या मतांना प्राधान्य राहील. परंतु आपले मत प्रकट करताना डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर ठेवून बोलावे लागेल. कुटुंबातील सदस्यांचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी.

शुभ दिनांक : 13, 14

मिथुन – राशीतील मंगळामुळे स्वकर्तृत्वाला चांगली झळाळी येईल. दशमस्थानातील गुरुवरून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे नोकरी व्यवसायात चांगल्या संधी उपलब्ध होतील.नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना मनाजोगे काम मिळेल. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल, तसेच त्यांचा एखादा सल्ला अतिशय उपयोगी ठरणारा राहील. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. सामाजिक कार्यात विशेष सहभाग घ्याल. एखाद्या महत्त्वाचे काम अनिच्छेने करावे लागेल. कोणत्याही विचारांची अतिशयोक्ती टाळावी. अति तेथे माती ही युक्ती लक्षात ठेवा. उत्तरार्धात राशीतील मंगळावरून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे प्रकृतीच्या तक्रारी डोके वर काढतील. उष्णतेचे विकार, पित्त विकार, नेत्र विकार यांचा त्रास जाणवू शकतो.

शुभ दिनांक : 15, 16

कर्क – राशीच्या भाग्यस्थानातील गुरुवरून होणारे चंद्राचे भ्रमण अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करणारे राहील. तीर्थस्थळांना भेटी द्याल. संत सज्जनांचा सहवास लाभेल. नोकरी व्यवसायातील कामानिमित्त प्रदेश प्रवास संभवतो. दशमस्थानातील राहू व हर्षल वरून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे एखादी फसवी संधी येऊ शकते. आलेली संधी स्वीकारताना पूर्ण चौकशी करून मगच स्वीकारावी. कोणत्याही मोहाला बळी पडू नका. स्वतंत्र व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने ग्रहमान अतिशय अनुकूल आहे. कठोर परिश्रमांची जोड असेल तर व्यवसायातील महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे गाठता येईल. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. प्रवासातून झालेल्या ओळखीतून लाभ होतील. मनोरंजनाच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. गुंतवणुकीतून लाभ होतील.

शुभ दिनांक :13, 14.

सिंह – अष्टमातील गुरुवरून होणारे चंद्राचेे भ्रमण काहीसे त्रासदायक राहण्याची शक्यता आहे. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. अति खाण्याने आजार बळावण्याची शक्यता राहते. आपले खिसा पाकिट सांभाळावे. अंधश्रद्धेला बळी पडू नका. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. कामानिमित्त अनपेक्षितपणे प्रवास करावे लागतील. आपण हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता राहते. अनोळखी‌ व्यक्तीने दिलेल्या नोकरीच्या अमिषाला बळी पडू नका. सदसदविवेकबुद्धी जागृत ठेवून कोणताही निर्णय घ्या. कुटुंबातील व्यक्तींचे आपणास सतत सहकार्य लाभेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आठवड्याच्या उत्तरार्धात हाती पैसा येईल. जुन्या मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. दिनांक 15 आणि 16 रोजी महत्त्वाचे निर्णय घेतले जातील.

शुभ दिनांक : 15, 16

कन्या – आपल्या राशीच्या सप्तम स्थानातील गुरुवरून आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण होत आहे. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. भागीदारी व्यवसायातून नवीन उपक्रम राबवले जातील. व्यावसायिक कामानिमित्त परपदेश प्रवास घडतील. प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. प्रकृतीच्या जुन्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता राहते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल. ओळखीतून मध्यस्थीतून आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखून काम केलेत तर आपल्याला हवी असलेली सवलत निश्चितच लागू होईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. कोर्ट कचेरीच्या कामातून विलंब होईल.

शुभ दिनांक – 15, 16

तुळ – आपल्या राशीतून रवी शुक्र केतू तर षष्ठस्थानातील षष्ठेश गुरुवरून चंद्राचे भ्रमणण होत आहे. नोकरी व्यवसाय अनेक चांगल्या संधी चालून येणार आहेत. स्वकष्टाच्या बळावर मोठी कामे कराल. त्यामुळे नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन केली जाईल. परंतु आपल्या कार्यक्षेत्रात सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार नाही. भागीदारी व्यवसायातून इतरांवर काम सोपवले तरी देखील आपणास लक्ष घालावे लागेल. तेव्हा आत्मसंयम महत्त्वाचा राहील. व्यवसायात मोठ्या उलाढाली‌ तूर्त् टाळाव्यात. जोडीदारावर आपली मते लादू नका. अनपेक्षित प्रवास आणि अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. अतिविचाराने मानसिक अस्वस्थता जाणवण्याची शक्यता राहते. लहान चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. अष्टमातील मंगळावरून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आठवड्याच्या उत्तरार्धात भाग्यकारक घटना घडतील.

शुभ दिनांक – 15, 16

वृश्चिक – पंचमस्थान गुरुवरून चंद्राचे होणारे भ्रमण आपणास अनेक संधी उपलब्ध करून देणारे राहील. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून विशेष यशप्राप्ती लाभेल. तीर्थस्थळांना भेटी द्याल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. नवपरिणींतांना गोड बातमीची चाहूल लागेल. जुन्या मैत्रिणीला उजाळा मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होतील. आपली इच्छापूर्ती झाल्याने मनस्वास्थ्य लाभेल. नोकरीत बढती बदलीचे योग येतील. आठवड्याच्या उत्तरार्धात सप्तमातील मंगळावरून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे जोडीदाराचे वर्चस्व वाढेल. जोडीदाराच्या मताप्रमाणे वागावे लागेल. आपल्या मतांचा आग्रह धरू नका नाहीतर वादंग होतील. भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ केले जातील. उत्तरार्धात मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. उंची वस्त्रालंकारांची खरेदी होईल. प्रिय जनांचासहवास लागेल

शुभ दिनांक – 13, 14

धनु – आपल्या राशीच्या सुखस्थानातील चतुर्थेश गुरुवरून चंद्राचे होणारे भ्रमण कुटुंबात शुभकार्य घडवण्यास अनुकूल राहील. कुटुंबातील व्यक्तींसंबंधी सतत सुवार्ता कानी येतील. कुटुंबात पाहुण्यांची वर्दळ राहील. मातृसौख्य लाभेल. घरातील वातावरण अतिशय आनंदी राहील. गृह उद्योगातून लाभ होतील. संततीच्या प्रकृती संबंधी काळजी वाटेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. अतिशय मेहनतीने, श्रमाने आपल्याला आपले ध्येय गाठावे लागेल. कोणतीही गोष्ट सहज साध्य नसल्याचा अनुभव येईल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. समाजात आपल्याला मानसन्मान लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. षष्ठातील मंगळामुळे धाडसी निर्णय घेतले जातील. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. मातुल घराण्याची सलोख्याचे संबंध राहतील. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. 10 ते 12 ऑक्टोबर या काळातील ग्रहमान आपणास अनुकूल फलदायी राहील.

शुभ दिनांक :10, 12

मकर – आपल्या राशीतील शनि व पराक्रम स्थानातील गुरु आणि चंद्र यांचा लाभ योग होत आहे.मेहनतीने आणि कष्टाने आपण आपले ध्येय साध्य करू शकाल. रेंगाळली कामे मार्गी लागण्यात यश येईल. तीर्थस्थळांना भेटी द्याल. अध्यात्मिक प्रगती होईल.साडेसातीची प्रखरता कमी झाल्यामुळे नवीन संधी चालून येतील. मनाजोगी कामे सुरू झाल्यामुळे आवक वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी वाटेल. कुटुंबासाठी वेळ द्याल. गृहसजावटीसाठी आकर्षक शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. एखादे रेंगाळलेले काम ओळखीच्या व्यक्तीकडून अथवा तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शओळखीच्या व्यक्तीकडून अथवा तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे आपणास यशस्वीपणे पूर्ण करता येईल. आपल्या कामाचे कौतुक केले जाईल. आठवड्याच्या उत्तरार्धात संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल.

शुभ दिनांक :12, 13

कुंभ – आपल्या राशीतील नेपच्यून आणि धनस्थानातील धनेश गुरु यांच्यामुळे आपली अध्यात्मिक उन्नती होणार आहे. आपल्या हातून धार्मिक विषयावर लिखाण होईल. कुटुंबात शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीचा एखादा सल्ला लाख मोलाचा ठरेल. घरातील वातावरण आनंदी उत्साही राहील. व्यवसाय उद्योगातून आपली आवक वाढणार आहे. नवनवीन उपक्रम यशस्वीपणे राबविले जातील. नवीन भूमी भवन खरेदीचे योग येतील. कामानिमित्त प्रवास कराल. व्यवसायात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. परदेशस्थ भावंडांशी सुसंवाद साधाल. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. आठवड्याच्या उत्तरार्धात घरातील सुख सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी कराल.

शुभ दिनांक : 14 ते 16

मीन – राशी स्वामी गुरुवरून चंद्राचेे होणारे भ्रमण आपला उत्कर्ष करणारे राहील. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल. संत सज्जनांचा सहवास लाभेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली करणे टाळावे नाहीतर फसवणूक होण्याची शक्यता राहते. अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात. आपली मते कुटुंबीयांवर लादू नका. बोलताना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून बोलावे. भावंडांना मदत करावी लागेल. कामानिमित्त घडणाऱ्या प्रवासातून लाभ होतील. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. योग्य मार्गदर्शनाखाली केलेली गुंतवणूक भविष्यकाळात फायदेशीर ठरेल. व्यवसाय उद्योगात मोठे प्रकल्प हाती घ्याल. उत्तरार्धात कुटुंबासाठी वेळ देता येईल गृहसुशोभी करणासाठी आकर्षक शोभेच्या, इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू खरेदी केल्या जातील. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी वाटेल.

शुभ दिनांक :10 ते 12

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.