वाईटावर चांगल्या शक्तीचे प्रतीक मानल्या जाणारा दसरा म्हणजेच नवरात्रौत्सवाचा दहावा दिवस त्यालाच आपण दशमी असे सुद्धा म्हणतो. या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता. सोन्याच्या लंकेचा सम्राट आणि शक्तिशाली रावणाला दशानन नावाने ही ओळखळे जाते. तर धार्मिक मान्यतांनुसार रावणाला १० मस्तक होती. मात्र काही लोकांचे असे मानणे आहे की, रावणाला १० मस्तक नव्हती. तो त्याला १० डोकं असल्याचा भ्रम निर्माण करायचा. परंतु काही लोक म्हणतात रावण परम विद्वान होता. तर ४ वेद आणि ६ दर्शनचा ज्ञाता होता, त्यामुळेच त्याला दशानन असे म्हटले जाते. अशातच आम्ही तुम्हाला रावणाच्या १० मस्तकांबद्दलची कथा सांगणार आहोत. (10 Heads Of Ravana)
दशाननाचे प्रत्येक मस्तक हे वाईटाचे प्रतीक
सनातन धर्मात रावणाची १० डोकं असल्याने त्याच्या प्रत्येक मस्तकाला वाईटाचे प्रतीक मानले जाते. ज्याचा अर्थ वेगवेगळा आहे. शास्रांनुसार रावणाकडे ९ मण्यांची माळ होती, जी त्याला आई कैकसी हिने भेट दिली होती. याच कारणामुळे तो १० मस्तकं असल्याचा भ्रम निर्माण करतो. काम, क्रोध, लोभ, मोह, द्वेष, घृणा, पक्षपात, अहंकार, व्यभिचार आणि फसवणूक अशी सर्व रावणाची दहा मस्तक आहेत.
दरम्यान, रावणाची दहा मस्तकं असल्याचा उल्लेख रामचतरितमानस मध्ये आहे. तर कृष्णपक्षातील अमावस्येला तो युद्धासाठी गेला होता. तेव्हा एक-एक दिवस असे क्रमश: त्याचे एक-एक मस्तक कापले जात होते. अशा प्रकारे दहाव्या दिवशी अर्थात शुल्कपक्षाच्या दशमीला रावणाचा वध झाला. त्यामुळेच दशमीच्या दिवशी रावणाला दहन केले जाते.
परंतु रामचरितमानसमध्ये असे वर्णन करण्यात आले आहे की, ज्या मस्तकाला राम आपल्या बाणाने उडवण्याचा प्रयत्न करायचे ते पुन्हा त्याच ठिकाणी दुसरे मस्तक निर्माण व्हायचे.येथे विचार करण्याची गोष्ट अशी की, एक अंग कापल्यानंतर पुन्हा कसे निर्माण व्हायचे? वस्तुत: रावणाची ही मस्तक कृ्त्रिम होती- आसुरी मायापासून निर्माण झाली होती.
अशातच दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा दहन करण्यामागी उद्देश असा की, वाईट गोष्टींचा नाश होवो. असे म्हटले जाते की, रावणाची १० डोकं ही १० वाईटांचे प्रतीक असल्याने व्यक्तीने त्या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. (10 Heads Of Ravana)
हे देखील वाचा- २६४ वर्षांपूर्वी प्लासी युद्धानंतर ‘अशा’ पद्धतीने सुरु झाली होती बंगाल मध्ये पहिल्यांदा दुर्गा पूजा
रावणाने आपले मस्तक भगवान शंकराला भेट दिले होते
रावण भगवान शंकराचा फार मोठा भक्त होता. पौराणिक कथांनुसार शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्याने काही वर्ष घोर तपस्या केली होती. मात्र त्यानंतरही भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले नाहीत. अशातच त्याने शंकराला प्रसन्न करण्यासाठी आपले शीर कापून त्यांना दिले होते.