सध्या सिनेमा, संगीत किंवा राजकारण असो, सर्वत्र नेपोटीजमच्या चर्चा आहेत. वडील अमुक अमुक होते, म्हणून मुलगासुद्धा अमुक अमुक होतो. त्यात तो सक्सेस झाला नाही, तर त्याला नेपोटीजमचा Tag लागतो. पण काही कलाकार याला अपवाद आहेत. आपले वडील तबला वाजवणारे दिग्गज मग आपणसुद्धा या क्षेत्रातच एक दिग्गज व्हायचं असं स्वप्न बाळगून प्रवास सुरु केलेल्या एका महान आणि जागतिक पातळीवर पोहोचलेल्या संगीतकाराचं निधन झालं, ते म्हणजे उस्ताद जाकीर हुसैन एक असा माणूस ज्याने आपल्या हातांनी तबल्यामध्ये जीव टाकला होता. रसिकांना असच वाटायचं, की तबला जिवंत आहे आणि त्यांच्यासोबत जुगलबंदी करतोय. (Zakir Hussain)
उस्ताद अल्ला रखा कुरेशी या दिग्गज तबलावादकाच्या घरी जन्म घेतल्यामुळे लहानपणापासूनच तबल्याचे ताल त्यांच्या कानावर पडले होते. असं सांगितलं जात की त्यांचा जन्म झाल्यावर वडिलांनी त्यांना हातात घेतल्यावर त्यांच्या कानात कुराणच्या आयत वाचल्या नाहीत, तर तबल्याचे बोल ऐकवले होते. झाकीर हुसैन यांना तबला वादन इतकं आवडत होतं की त्यांच्या हाती एखादं भांडं आलं तरीही त्यातून ते एखादा सूर काढून दाखवत होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा तबला वादन केलं आणि १२व्या वर्षापासून ते वडिलांसह कार्यक्रमांमध्ये तबला वादन करत होते. जेव्हा ते १२ वर्षांचे होते त्यावेळी पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान, उस्ताद बिस्मिल्लाह खान, पंडित शांता प्रसाद आणि पंडित किशन महाराज यांना भेटले. आई बीवी बेगम यांना मात्र त्यांचं हे तबलावादन आवडत नव्हतं. पण नंतर त्यांच्या आईंनी सर्व गोष्टी स्वीकारल्या. (Social News)
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या अनेक दिग्गजांची साथ लाभल्यामुळे कमी वयातच जाकीर हुसैन तबल्याचे मास्टर झाले. १९७३ साली त्यांनी पहिल्यांदाच ‘लिविंग इन द मटेरियल वर्ल्ड’ या जॉर्ज Harrison च्या अल्बमसाठी काम केलं, ज्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली आणि भारतीय संगीतविश्वात जाकीर हुसैन हे नवीन नाव जोडलं गेलं. यानंतर हार्ड वर्क, Into The Music, Powerlight अशा International अल्बम्ससाठी काम केलं. यासोबतच भारतातही त्यांनी विविध ठिकाणी कॉन्सर्ट सुरु केल्या. त्यांनी एक विशेषता म्हणजे तबल्यासोबत इतर वाद्यांची किंवा गायकांची जुगलबंदी ! अमेरिकन Jazz आणि भारतीय तबल्याचं फ्युजन करण्याचं श्रेय त्यांना जात. आणि या प्रयोगामुळेच त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली. १९७५ दरम्यान त्यांनी शक्ती या Brand सोबत संगीतातले आणखी प्रयोग करायला सुरुवात केली होती. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल १९८८ साली त्यांना सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी ते सर्वात तरुण पद्म पुरस्कार विजेते होते. यावेळी त्यांचे वडील इतके खुश झाले होते की, आपल्या हातांनी जाकीर हुसैन यांना हार घातला होता. त्याच वेळी पंडित रविशंकर यांनी जाकीर हुसैन यांना पहिल्यांदा उस्ताद म्हणून संबोधलं आणि ही उपाधी आयुष्याभरासाठी त्यांना लागली. (Zakir Hussain)
१९९२ साली मिकी हार्टसोबत Planet Drum हा अल्बम तयार केला होता. त्याला वर्ल्ड Best म्युझिक अल्बमचा Grammy Award मिळाला होता. त्यांच्या या अल्बमचे ८ लाख रेकॉर्ड्स विकले गेले होते. संगीत क्षेत्र वगळता जाकीर हुसैन यांनी कित्येक चित्रपटांमध्ये काम केलं होत. यामध्ये ‘हीट अँड डस्ट’ या ब्रिटिश चित्रपटाचा समावेश आहे. याशिवाय ‘साज’ या बॉलिवूड चित्रपटात त्यांनी शबाना आजमी यांच्यासोबत काम केलं होतं. काही मलयालम चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिलं होत. त्यांचा चित्रपटांशी निगडीत अजून एक किस्सा म्हणजे ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटात सलीमच्या धाकट्या भावाच्या भूमिकेची ऑफर झाकीर हुसेन यांना देण्यात आली होती. पण, त्यावेळी त्यांच्या वडिलांनी ते मान्य केलं नाही. आपल्या मुलाने फक्त संगीतावर लक्ष केंद्रित करावं, असं ते म्हणाले. संगीत, चित्रपट आणि बरच काही जाकीर हुसैन भारतीय म्युझिक इंडस्ट्रीचे एक Brand झाले होते. २००२ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवलं गेलं. त्यांच्या वडिलांच्या निधना नंतर ते आपल्या पंजाब संगीत घराण्याचे प्रमुख झाले. (Social News)
========
हे देखील वाचा : दिवसा बर्गर रात्री मर्डर बर्गर किल्लरची थरारक स्टोरी !
======
जाकीर हुसैन यांची ‘वाह ताज’ची Ad आणि त्या Ad मधलं तबलावादन तर नव्वदीच्या लोकांसाठी एक अविस्मरणीय आठवण अजून एक खास गोष्ट म्हणजे, ऑल-स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी झाकीर हुसेन यांना बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं होतं. व्हाईट हाऊसच्या कॉन्सर्टसाठी आमंत्रित केलेले ते पहिले भारतीय म्युजीशियन आहेत. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना ७ वेळा Grammy नॉमिनेशन मिळाले होते, ज्यामध्ये ४ वेळा त्यांनी हा Award जिंकला होता. २०२३ साली आपल्या शक्ती या Brand सोबत ते पुन्हा चर्चेत आले. त्यांनी तयार केलेल्या This Moment या अल्बमला ४ Grammy Award मिळाले. आणि एकसाथ तीन Grammy Award जिंकणारे ते एकमेव भारतीय ठरले. याच वर्षी त्यांचा आणखी एका पद्मपुरस्काराने सन्मान झाला आणि ते पद्मविभूषण उस्ताद जाकीर हुसैन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते फुफुसांच्या आजाराने त्रस्त होते आणि अखेर तबला नसांनसांमध्ये भिनलेला आणि रसिकांच्या हृदयात भिनवणारा कलावंत १६ डिसेंबर २०२४ रोजी काळाच्या पडद्याआड गेला. हिंदुस्तानी क्लासिकल म्युझिकमधली त्यांची ही लेगेसी अशीच कायम राहील. (Zakir Hussain)