रशियन युक्रेन युद्ध सुरु झाले आणि जगावर तिस-या महायुद्धाचे ढग गडद झाल्याची चर्चा सुरु झाली. यापाठोपाठ इस्रायल आणि हमास युद्ध सुरु झाले. सिरियासह संपूर्ण मिडलइस्टमध्ये असेच युद्धाचे वातावरण आहे. तिकडे उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करीत थेट अमेरिकेला धमकी देत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे, तिसरे महायुद्ध अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. पण या सर्वात अजून एक माहिती पुढे आली, ती म्हणजे, जगभर चालू असलेल्या या युद्धात त्या देशातील सैन्याची भूमिका महत्त्वाची आहे. पण त्यांना साथ दिली आहे ती, भाडोत्री सैन्यानं. अलिकडच्या काळात ही भाडोत्री सैन्याची संकल्पना चांगलीच फोफावली आहे. अनेक प्रगत देश या भाडोत्री सैन्याचा आधार घेत आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित करीत आहेत. अमेरिकेसारखे देशही या भाडोत्री सैन्याचा आधार घेत असल्याची माहिती आहे. रशिया युक्रेन युद्धादरम्यान वॅग्नर सैन्याचे नाव चांगलेच गाजले गेले. रशिया या वॅग्नर सैन्याला भाड्यानं वापरत होते. यानंतर भाडोत्री सैन्य आणि त्याच्या गटांची चर्चा सुरु झाली. (World War III)
रशिया युक्रेन युद्धानं जगासमोर अनेक रहस्य खुली केली. त्यातील एक रहस्य म्हणजे, भाडोत्री सैनिक. रशियन अध्यक्ष ब्लादेमिर पुतिन यांनी युक्रेनसोबत लढण्यासाठी वॅग्नर सैन्याचा आधार घेतला होता. या गटाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी ऐन युद्धकाळात थेट पुतिन यांच्यावरच अनेक आरोप करत वॅग्नर सैनिकांना त्यांच्यामुळे जीव गमवावा लागत असल्याचा आरोप केला. यामुळे भाडोत्री सैन्याची माहिती पुढे आली. अनेक प्रगत देश आपल्या सैन्याला सुरक्षित ठेवण्यासाठी अशा भाडोत्री सैन्य देणा-या गटांचा वापर करीत असल्याचे स्पष्ट झाले. यासाठी मोठी धनराशी लागते. पुतिन यांनी अशाच भाड्यावर घेतलेल्या सैन्यानं त्यांच्याविरुद्धच बंड केले आणि पुतिन यांचे एक गुपित उघड झाले. अर्थात पुढे वॅग्नरचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा एका विमान अपघातात मृत्यू झाला आणि त्यांच्या गटाचे बंड थंड झाले. पण यामुळे जगातील अनेक भाडोत्री सैन्य पुरवणा-या गटांची माहिती उघड होऊ लागली. (International News)
आता परिस्थिती अशी आहे की, तिसरे महायुद्ध सुरु झाले तर या भाडोत्री सैन्याशिवाय कुठल्याही देशाचे पान हलणार नाही. भाडोत्री सैन्य पुरवणारे असे अनेक गट अस्तित्वात आहेत. प्रामुख्यानं रशिया, अमेरिका, जर्मनी, आणि दक्षिण अफ्रिकन देशांमध्ये अशा भाडोत्री सैन्याचा पुरवठा करणा-या अनेक संघटना आहेत. जगभर जसे युद्धाचे स्वरूप बदलत चालले आहे, तसेच या नवीन सैन्याला तयार करण्यात येत आहे. फक्त हे सैन्य आपल्या देशाच्या स्वाभिमानासाठी लढत नाही, तर त्यांना मिळणा-या पैशाच्या बदल्यात लढत असते. असे सैन्य पुरवणा-या बहुतांश संघटना या माजी सैनिकांना काढलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष युद्धभूमीचा अनुभव असतो, आणि तिथे कुठल्या कौशल्याची गरज आहे, याचीही माहिती असते. (World War III)
ट्रिपल कॅनोपी सारख्या अमेरिकन मालकीच्या संघटनेतील सैनिक हे युगांडा आणि पेरूव्हियन सैन्यातील माजी सैनिक आहेत. इराक, आफ्रिका, पूर्व युरोप आणि लॅटिन अमेरिकेत ओलीस ठेवणाऱ्या ड्रग माफीयांबरोबर लढा देण्यासाठी या आर्मीची उपयोग होतो. रशिया ज्या सैन्याच्या जीवावर युक्रेनबरोबर लढत आहे, त्या वॅग्नर गटाचेही मोठे वर्चस्व आहे. या वॅग्नरचा माजी प्रमुख येवगेनी प्रिगोझिन या एक माजी सैनिक होता. या सैन्य गटात रशियातील माजी सैनिकांसह युक्रेनच्या माजी सैनिकांचाही समावेश आहे. हे सैन्य युक्रेनविरोधी युद्धात उतरल्यावर युक्रेनच्या माजी सैनिकांनी युक्रेनविरोधी लढा दिला. कारण या सैन्य संघटनांमध्ये एक नियम पळला जातो, तो म्हणजे, देशाशी काहीही देणंघेणं ठेवायचं नाही, जो पैसे देईल, त्याच्यासाठीच युद्ध करायचे. अब्जो रुपयांचा व्यवहार या सर्वात होतो. (International News)
=======
हे देखील वाचा : Salman Rushdie : पुन्हा ‘सॅटनिक व्हर्सेस’ चे वादळ !
Sriram Krishnan : डोनाल्ड ट्रम्पचा श्रीराम !
=======
वॅग्नर सैन्यासाठी रशियाचा मासिक खर्च $150 दशलक्ष असल्याची नोंद आहे. मादागास्कर, मोझांबिक, काँगो, अंगोला, सेनेगल, रवांडा, दक्षिण सुदान, गिनी, झांबिया, झिम्बाब्वे, केनिया, कॅमेरून, कोटे डी’आयव्होर, नायजेरिया, चाड अशा दक्षिण अफ्रिकेतील देशांच्या माजी सैन्याचा यात समावेश आहेच. सोबत अनेक बेरोजगार तरुणांनाही यात भरती करुन घेण्यात येते. यावेळी त्यांना प्रत्यक्ष लष्करात दिले जाते, असेच प्रशिक्षण दिले जाते. या भाडोत्री सैन्यावर अनेक जबबादा-या असतात, त्यामध्ये युद्धातील तंत्रज्ञानाची बाजू सांभाळणे ही असते. जगभर आता या भाडोत्री सैन्य पुरवणा-या संघटनांचे जाळेच तयार झाले आहे. एका अहवालानुसार 2022 मध्ये भाडोत्री सैन्यावर $258.11 अब्ज खर्च झाल्याची माहिती आहे. 2030 पर्यंत ही रक्कम $446.81 अब्ज पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यावरुनच भविष्यात या भाडोत्री सैन्याचे महत्त्व किती वाढणार याची कल्पना येते. (World War III)
सई बने