दुसऱ्या महायुद्धाच्या (World War II) सुरुवातीला केवळ एक दिवस झाली होती पण त्यामागे खुप वर्षांपासूनची कथा आहे. १ सप्टेंबर १९३९ मध्ये या युद्धाला सुरुवात जर्मनीच्या पोलँन्डमध्ये झालेल्या हल्ल्यापासून झाली होती. ते होण्यामागे काही कारण होती ती एका दिवसाची नव्हती. असेच काहीसे रशिया आणि युक्रेन मध्ये सुरु असलेल्या युद्धासंदर्भात बोलले जात आहे. या दोन देशांमध्ये सुरु असलेले युद्ध हे तिसरे महायुद्ध असेल का? अशातच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि तशीच स्थिती आपण आता पाहतोय का? जाणून घेऊयात अधिक
दुसऱ्या महायुद्धामुळे झाले बदल
दुसरे महायुद्ध हे आधुनिक जगातील सर्वाघिक उद्भवस्त करणारे युद्ध होते. ज्यामध्ये सहा वर्षांच्या कालखंडात ८ कोटी लोकांचा बळी गेला. या युद्धात पहिल्यांदाच परमाणु हत्यारांचा वापर करण्यात आला. याच कारणास्तव संयुक्त राष्ट्र सारख्या संघटनांची निर्मिती झाली होती आणि दोन महासत्तांमधील लढाई सुरु झाली होती जी एका शीतयुद्धात रुपांतर झाली. आजची स्थिती अशी आहे की, या दोन महासत्तांमधील संघर्ष हा रशिया-युक्रेन युद्धाचे एक कारण आहे.
पहिले महायुद्ध की हिटलरचे चुकीचे विचार
बहुतांश इतिहासकार या गोष्टीशी सहमत आहेत की, १९३९ मध्ये झालेल्या दुसऱ्या महायुद्धादरम्यान पहल्या महायुद्धाचा अंत होऊ लागला होता. १९१९ मध्ये झालेल्या करारात जर्मनीला मुख्य रुपात पहिल्या महायुद्धाचे दोषी ठरवण्यात आले होते. त्यांच्यावर आर्थिक आणि सैन्याचे प्रतिबंद लावण्यात आले होते. काही विशेतज्ञांचे असे मानणे आहे की, या करारात अटी ऐवढ्या कठोर होत्या की त्यामुळे जर्मनीत रोष निर्माण होऊ लागला आणि तो पुढील दोन दशक राहिला. मात्र काहींचे असे सुद्धा म्हणणे होते की, या करारात दुसऱ्या महायुद्धाची (World War II) कारण हिटलरच्या नाझीवादी विचारांनना मान्यता देणे. तसेच करारात दुसऱ्या महायुद्धाचे थेट कारण हेच असल्याचे मानणे चुकीचे आहे.
पहिल्या महायुद्धात सैनिक होता हिटलर
हिटलर पहिल्या महायुद्धात जर्मनीचा एक सैनिक होता. मुळ रुपात तो सैन्याचा संदेशवाहक होता. त्याची दोन वेळा त्याच्या बहादुरीमुळे कौतुक करण्यात आले होते. या युद्धावेळी हिटलर जखमी झाले होते. युद्धानंतर हिटलर जर्मनीच्या सैन्यातील गुप्तचर एजंट बनला आणि जर्मन वर्कर पार्टीमध्ये काम करण्यासाठी त्याला तैनात करण्यात आले. तसेच कम्युनिस्ट विरोधी, ज्यूंच्या विरोधी विचारधारेने प्रेरित झाला आणि त्याने स्वत:ची ज्यूंच्या विरोधातील विचारधारा विकसिक केली.
ज्यूंचा द्वेष
१९१९ मध्येच हिटलरने ज्यूंच्या प्रश्नाचे पहिले विधान प्रकाशित करण्यास सुरुवात केली आणि असे म्हटले की, अंतिम ध्येय निश्चितपणे ज्यूंचा संपूर्ण संहार करणे असले पाहिजे. हळूहळू हिटरलला जर्मनी वर्कर्स पार्टीमध्ये लोकप्रियता मिळू लागली होती. मोठ्या प्रमाणात अनुदान मिळवल्यानंतर जर्मनीतील राजकरणात तो एका मोठ्या स्तरावर पोहचला. १९३३ मध्ये जर्मनीचा चांसलर झाला. लवकरच तो देशाच्या नाजी पार्लियामेंट ऑर्गेनाइजेशनमध्ये सुप्रीम कमांडर सुद्धा झाला.
हे देखील वाचा- इराक मध्ये सुद्धा श्रीलंकेसारखी स्थिती, नक्की काय झाले आहे जाणून घ्या
युरोपीय देश कमजोर होत होते
१९३० च्या दशकात युरोपात जर्मनीच्या आसपासचे देश कमोजर होत होते. तर जर्मनी हिटलरच्या नेतृत्वात एक होत होता. स्पेनचे स्वदेशी युद्ध, ऑस्ट्रियावर ताबा, चेकेस्लोवाकियावर हल्ला अशा घटनांमुळे युरोपाला युद्धात ढकलले. त्यानंतर १ सप्टेंबर १९३९ मध्ये जर्मनीच्या पोलंडवर करण्यात आलेला हल्ला महायुद्धाचे कारण ठरले. (World War II)
सध्याची परिस्थिती खुप वेगळी आहे
आजची परिस्थिती पाहिल्यास खुप वेगळी आहे. रशिया हिटलर प्रमाणे कोणत्याही दुसऱ्या देशांवर हल्ला करत नाही आहे. आता सुद्धा पश्चिम देश आणि रशिया केवळ आर्थिक युद्धाच्या स्थितीत आहे. युक्रेनला युरोप आणि पश्चिम देशांचा सक्रिय पाठिंबा आहे. परंतु तरीही युक्रेनचा आरोप आहे की, पश्चिम देश त्या मार्गाने जात आहेत जसे दुसऱ्या महायुद्धात त्यांनी हिटलरसाठी केले होते.
कोणीही परमाणु हत्यारांचा वापर करण्याचा विचार करत नाही आहे. याचा आर्थिक परिणाम जगावर होणार आहे. पश्चिम देश पुतिन हा हिटलरच्या मार्गाने चालत असल्याचा आरोप लावत आहे. तर रशिया आपल्या सार्वभौमत्वाच्या फायद्यासाठी नाटोला रोखण्यासाठी युक्रेनवर सैन्याकडून कारवाई करत आहे.