Home » जगातील लोकसंख्या वाढून ८ करोड झाली खरी पण मोजली कशी? जाणून घ्या अधिक

जगातील लोकसंख्या वाढून ८ करोड झाली खरी पण मोजली कशी? जाणून घ्या अधिक

by Team Gajawaja
0 comment
World Population
Share

जगातील लोकसंख्या वाढून आता ८ करोड झाली आहे. हा दावा संयुक्त राष्ट्राने नुकत्याच जाहीर केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. रिपोर्ट असे सांगतो की, २०३० पर्यंत लोकसंख्येचा आकडा वाढून ८५० कोटीवर पोहचेल आणि २०५० पर्यंत ९७० कोटी होईल. अशातच प्रश्न उपस्थितीत राहतो की, जगातील लोकसंख्या वाढून ८ अरबवर पोहचली आहे. मात्र ही लोकसंख्या कशी मोजली गेली? खरंतर जगातील लोकसंखेची आकडेवारी सांगण्याचे काम संयुक्त राष्ट्राची संस्था करते. ज्याचे नाव आहे युनाइटेड नेशंस पॉप्युलेशन फंड. तर जाणून घ्या ही संस्था कोणत्या आधारावर लोकसंख्येची आकडेवारी जाहीर करते. (World Population)

संयुक्त राष्ट्राची संस्था युनाइटेड नेशंस पॉप्युलेशन फंड जनसंख्येची आकडेवारी जाहीर केल्यानंतर जगभरातील देशांची आकडेवारी एकत्रित केली जाते. त्या आकडेवारीच्या माध्यमातून अंदाजे रिपोर्ट जाहीर केला जातो. मात्र या कॅल्युलेशनच्या मागे ३ गोष्टींचा समावेश होता. याच ३ गोष्टीवरुन ठरवले जाते की, जगभरातील लोकसंख्या किती आहे आणि एका वेळेपर्यंत वाढून किती होईल.

संस्था लोकसंख्येचा हिशोब ठेवण्यासाठी तीन गोष्टींवर लक्ष्य दिले जाते. जन्म दर, मृत्यू दर आणि स्थलांतर (म्हणजेच एका देशातून दुसऱ्या देशात जाणारी लोक). याच्या माध्यमातून कॅल्यूलेशन केले जाते की, जन्म दराच्या तुलनेत मृत्यूदर वाढला आहे की नाही. या व्यतिरिक्त एका देशाला सोडून जाणारी लोक कोणत्या दुसऱ्या देशात जात आहेत. याची आकडेवारी स्थलांतरितचा दर काढला जातो.

हे देखील वाचा- जगभरात प्रत्येक वर्षाला १५ लाख लोकांचा वेळेआधीच होतो मृत्यू, वायू प्रदुषण ठरतेय कारण

लोकसंख्या का वाढतेय?
रिपोर्ट्सनुसार, १९५० मध्ये एक महिला जवळजवळ ५ मुलांना जन्म देत होती. २०२२ मधील आकडेवारी सांगते की, हा दर कमी होऊन २.३ झाली आहे. जन्मदर भले की, कमी झाला असला तरीही व्यक्ती दीर्घकाळ जगण्याचा दर हा वाढला गेला आहे. फोर्ब्सचा रिपोर्ट असे सांगतो की, एक व्यक्ती जवळजवळ ७८.८ वर्षापर्यंत आयुष्य जगतो. गेल्या २०० वर्षात दीर्घकाळ जगण्याचा दर वाढला आहे.

आता स्थलांतरितांबद्दल बोलूयात. संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार, अधिक उत्पन्न असणाऱ्या देशात लोकसंख्या वाढण्याचे कारण स्थलांतर आहे. रिपोर्टनुसार, १९८० ते २००० दरम्यान १०.४ कोटी पर्यंत लोकसंख्या वाढण्याचे कारण स्थलांतर सांगण्यात आले आहे. गेल्या २० वर्षात या देशांमध्ये स्थलांतरणाच्या कारणास्तव लोकसंख्या ८ कोटीपर्यंत वाढली आहे.(World Population)

जगातील लोकसंख्या गेल्या १२ वर्षात ७ ते ८ अरबच्या आकडेवारीपर्यंत पोहचते. याच आधारावर अंदाज लावला जातो की, २०३७ पर्यंत म्हणजेच गेल्या १५ वर्षात लोकसंख्या ९ अरबच्या आकडेवारीवर पोहचू शकते. संयुक्त राष्ट्राचा रिपोर्ट सांगतो की, २०५० पर्यंत जगात आठ देशांमध्ये सर्वाधिक जागतिक लोसंख्या वाढेल. यामध्ये कॉन्गो, मिस्र, इथियोपिया, भारत, नाइजेरिया, पाकिस्तान, तांझानिया आणि फिलिपींसचा समावेश आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.