Home » जागतिक जैवइंधन दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

जागतिक जैवइंधन दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

by Team Gajawaja
0 comment
World Biofuel Day
Share

पारंपारिक इंधनाला पर्याय म्हणून अजैविक इंधनाचे महत्व आणि जैवइंधन क्षेत्रात सरकारचे विविध प्रयत्न याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १० ऑगस्ट हा दिवस जागतिक जैवइंधन दिवस म्हणून साजरा केला जातो. तर भारतातील जैवइंधन सेक्टर बद्दल बोलायचे झाल्यास सरकारकडून काही योजना सुद्धा त्या संदर्भात राबवल्या जातात. तर जैव इंधन हे पर्यावरणाला हानिकारक नसते. ते भाजीपाला तेल, जनावरांची चरबी किंवा पुनर्नवीनीकरण स्वयंपाक ग्रीसह अल्कोहोल पासून तयार केले जाते. परंतु जागतिक जैवइंधन दिन साजरा करण्यामागील इतिहास नक्की काय आहे हे आज आपण जाणून घेऊयात.(World Biofuel Day)

जागतिक जैवइंधन दिन इतिहास
९ ऑगस्ट १९८३ मध्ये सर रुडोल्फ डिझेल ज्यांनी डिझेल इंजिनचा शोध लावला, त्यांनी जगात पहिल्यांदाच पीनट ऑइलसोबत यांत्रिक इंजिन चालवले. इतिहासावर नजर टाकल्यास रुडोल्फ डिझेल यांच्या विश्लेषणाच्या प्रयोगाने असे दाखवून दिले की, भाजीपाला तेलामुळे येणाऱ्या पुढील शतकांमध्ये जीवाश्म हे इंधन बदलून पूर्णपणे विविध यांत्रिक इंजिने चालतील. त्यांच्या या कामगिरीमुळे प्रत्येक वर्षी १० ऑगस्टला जागतिक जैवइंधन दिन साजरा केला जातो. तर ऑगस्ट २१०५ मध्ये पहिल्यांदाच पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाद्वारे हा दिवस साजरा करण्यात आला होता.

हे देखील वाचा- गॅस सिलिंडरच्या खाली लहान होल्स का असतात?

World Biofuel Day
World Biofuel Day

या दिवसाचे महत्व काय?
जैव इंधन हे कच्च्या तेलावरील निर्भरता कमी करण्यासह स्वच्छ वातावरणाला प्रोत्साहन देण्यास मदत करते. त्याचसोबत उर्जेच्या विविध स्रोतांचा अवलंब करण्यासह जिवाश्म इंधन नसलेल्या हरित इंधनाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 10 ऑगस्ट जागतिक जैव-इंधन दिन म्हणून साजरा केला जातो.

तर जून 2018 मध्ये केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय जैवइंधन धोरण 2018’ मंजूर केले. हे धोरण 2030 सालापर्यंत 20% इथेनॉल-ब्लेंडिंग आणि 5% बायोडीझेल-ब्लेंडिंग करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.(World Biofuel Day)

जैव इंधनाचे फायदे
-जैव इंधन हे एक अपारंपारिक स्रोत आहे. त्यामुळे ते कोणत्याही तेलापासून तयार करता येते.
-जैव इंधन तयार करण्यासाठी फारसा खर्च येत नाहीच पण ते घरगुती पद्धतीने सुद्धा तयार करता येते.
-जैव इंधनात १०-११ टक्के ऑक्सिजनचा समावेश असल्याने ते १०० टक्के ज्वलनशील आहे.
-जैव इंधन हे दुर्गंधीरहित असल्याने त्यामधून अत्यंत कमी आणि सफेद रंगाचा धुर निघतो.
-डिझेलला पर्याय म्हणून जैव इंधनाचा वापर करता येऊ शकतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.