Home » इराकच्या हुकूमशाही सरकारचे विधेयक

इराकच्या हुकूमशाही सरकारचे विधेयक

by Team Gajawaja
0 comment
Women's Organizations In Iraq
Share

महिलांच्या अधिकारांचे हरण करणा-या इराकमध्ये आता नवे विधायक आणण्यात आले आहे. या विधेयकानुसार महिलांच्या लग्नाचे वय कमी करण्यात येणार आहे. सध्या इराकमध्ये लग्नासाठी मुलीचे वय हे १८ वर्ष आहे. मात्र नवे विधायक मंजूर झाल्यासे हे वय अर्ध्यावर म्हणजे ९ वर्षावर येणार आहे. या नव्या विधेयकामुळे इराकमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. या विधेयकाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात महिला संघटनां पुढे आल्या आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरही या विधेयकाबद्दल नापसंती व्यक्त कऱण्यात येत आहे. (Women’s Organizations In Iraq)

इराकमध्ये गेल्या काही वर्षभरापासून महिलाविऱोधी वातावरण आहे. त्यात आता नव्या विधेयकाची भर पडली आहे. इराकच्या संसदेत मुलींचे लग्नाचे वय ९ वर्षांपर्यंत आणण्यासाठी विधेयक मांडण्यात आले आहे. यावरून संपूर्ण देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरातूनही या निर्णयाबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या इराकमध्ये मुलींचे लग्नाचे वय १८ वर्षे आहे. इराकच्या संसदेत नवीन विधेयक मंजूर झाल्यास ९ वर्षांच्या मुलींना १५ वर्षांच्या मुलांबरोबर लग्न होणार आहे. यामुळे देशभरात खुलेपणानं बालविवाहाचे प्रमाण वाढणार आहे. म्हणून या विधेयकाचा अनेक सामाजिक संघटनांनी विरोध केला आहे. हे विधेयक संसदेत मंजूर झाले तर महिलांचे अधिकार आणि लैंगिक समानता नष्ट  होईल. महिलांचे स्वातंत्र्य पूर्णपणे संपुष्ठात यईल, असे अनेक सामाजिक संघटनांचे मत आहे. (Women’s Organizations In Iraq)

याशिवाय मुलींच्या शिक्षणावर याचा फार मोठा परिणाम होणार आहे. आधीच इराकमध्ये मुलींच्या शिक्षण पद्धतीवर अनेक बंधने आहेत. त्यातच मुलींची लग्न जर ९ व्या वर्षात व्हायला लागली तर त्यांचे शिक्षण हे पूर्णपणे थांबणार आहे. तसेच त्यांचे लहानवयातच लैंगिक शोषण मोठ्या प्रमाणात होणार आहे. यामुळे या विधेयकाविरोधात इराकमधील मानवी हक्क संघटना, सामाजिक संघटना आणि महिला संघटना एकत्र आल्या आहेत. युनिसेफच्या अहवालानुसार, इराकमध्ये २८ % मुलींची लग्ने १८ वर्षांच्या आधी होत आहेत. त्यातच आता मुलींचे लग्नाचे वय ९ वर्ष केले तर इराकमधील मुलींची उघडपणे हत्याच होणार आहे. ह्युमन राइट्स वॉचच्या संशोधक साराह सनबर यांनीही या विधेयकावरुन इराक सरकारवर टिका केली आहे. हा निर्णय म्हणजे, इराकला आणखी खोलात नेण्याचा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (Women’s Organizations In Iraq)

इराक वुमेन्स नेटवर्कच्या अमल काबासी यांनी या विधेयकाला विरोध करत हा पुरुषी कायदा असल्याचे सांगितले आहे. यामुळे पुरुषांना सुट मिळणार आहे. जास्त वयाचे पुरुष कमी वयाच्या मुलीसोबत लग्न करु शकणार आहेत. यामुळे त्या मुलीच्या आयुष्यात कायमचा अंधकार होणार आहे. वय वर्ष ९ असलेल्या मुलींची जागा लग्नाच्या पोशाखात नसून खेळाच्या मैदानात आणि शाळेत असावी, असे इराकच्या महिला संघटनांनी सांगितले आहे. हे विधेयक मान्य झाल्यास त्याविरोधात लढा देण्यासाठी आपण तयार असल्याचेही या संघटनांनी सांगितले आहे. (Women’s Organizations In Iraq)

इराकमधील महिला संघटना आणि त्यांचे आंदोलन हा कायम वादाचा विषय ठरला आहे. २१ व्या शतकाच्या सुरुवातीस इराकमधील महिलांच्या स्थितीवर अनेक घटकांचा प्रभाव होता. कायम असलेले युद्धाचे वातावरण आणि अंतर्गत संघर्षांमुळे येथील हजारो महिला विधवा झाल्या. या महिलांचे जीवन संघर्षमय आहे. या युद्धाच्या झळा बसलेल्या अनेक महिलांना त्यांच्या मुलांनाही गमवावे लागले आहे. अनेक महिलांना रहाण्यासाठी घर नाही. उत्पादनाचे साधन नाही. अशा हजारो महिला छावण्यांमध्ये आपले आयुष्य जगत आहेत. या महिलांसाठी काही महिला संघटना कार्य करीत आहेत. इराकमध्ये महिला चळवळ १९२० मध्ये सुरु झाली. ब्रिटीश दडपशाहीच्या विरोधात इराकमधील महिला एकत्र आल्या. (Women’s Organizations In Iraq)

====================

हे देखील वाचा : मुंबई रेल्वे स्थानकांच्या नावामागची कथा

===================

यातून वुमेन्स अवेकनिंग क्लबची स्थापना झाली. १९४० च्या दशकात इराकमध्ये विद्यापिठांची निर्मिती झाली आणि त्यात मोठ्या प्रमाणात महिला शिक्षणासाठी येऊ लागल्या. या महिला बुरख्यामध्ये नव्हत्या, तर आधुनिक पाश्चात्य पेहरावात असायच्या. १९७० मध्ये, इराकच्या संविधानाने महिलांना समान हक्क प्रदान केले. ज्यात मतदानाचा अधिकार, राजकीय कार्यालयात काम करण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार आणि स्वतःची मालमत्ता जमा करण्याचा अधिकार मिळाला. मात्र हे सुख येथील महिलांना फार काळ मिळाले नाही. २००३ मध्ये सद्दाम हुसेनच्या पतनानंतर, इराकमध्ये हिजाबचा वापर सामान्य झाला. महिलांच्या अधिकाराचे पतन सुरु झाले, ते आजपर्यंत चालू आहे. आत्ता ९ वर्षाच्या मुलींचे विवाह हे त्यातील आणखी एक टोक आहे. (Women’s Organizations In Iraq)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.