Home » रात्रीही मिळणार सूर्यप्रकाश ?

रात्रीही मिळणार सूर्यप्रकाश ?

by Team Gajawaja
0 comment
Reflect Orbital Company
Share

सूर्य सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो, अगदी पृथ्वी जेव्हा निर्माण झाली असेल, तेव्हा पासून सूर्याचा हाच दिनक्रम सुरू आहे. त्यामुळेच पृथ्वीच्या अर्ध्या भागात दिवस असतो आणि अर्ध्या भागात रात्र. आता हे तुम्हाला माहिती आहेच. पण जर तुम्हाला रात्रीचा सूर्यप्रकाश दिसला तर? तर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.  पण रिफ्लेक्ट ऑर्बिटल ही स्टार्टअप कंपनी तुम्हाला रात्रीचा सूर्यप्रकाश पुरवू शकते. आता तुमचा तुमच्या कानांवरही विश्वास बसत नसेल, पण ही कंपनी खरच असा दावा करते आहे. त्यांच्या दाव्यानुसार, तुम्ही त्यांच्याकडून रात्रीचा सूर्यप्रकाश विकत घेऊ शकता. या कंपनी ने रात्रीचा दिवस करण्याचं म्हणजे रात्री सूर्यप्रकाश पुरवण्याचं स्टार्टअप सुरू केलं आहे. काय आहे ही रिफ्लेक्ट ऑर्बिटल कंपनी? आणि ते रात्रीचा सूर्यप्रकाश कसा पुरवणार आहेत ? जाणून घेऊया. (Reflect Orbital Company)

Reflect Orbital Company

रात्रीचा सूर्यप्रकाश पुरवण्याची आयडिया बेन नोवाक यांच्या डोक्यात आली, आणि तेच रिफ्लेक्ट ऑर्बिटल या कंपनीचे सीईओ आहेत. त्यांनी ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन एनर्जी फ्रॉम स्पेस’ या परिषदेत ही आयडिया मांडली होती. ही परिषद अंतराळातून ऊर्जा प्राप्तीसाठी आणि त्या ऊर्जेच्या वापरासाठी तंत्रज्ञान आणि प्रकलपांवर काम करते. या परिषदेत विविध शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांना एकत्र आणून सोलर पावर ट्रान्समिशन, आणि अंतराळातील अन्य ऊर्जा स्रोतांचा वापर यावर विचारविनिमय केला जातो. (International News)

बेन नोवाक यांनी रात्री सूर्यप्रकाश मिळवून देण्याचा हा प्रकल्प यासाठी सुरू केला आहे की, पृथ्वीवर आपण सोलार पॅनल वापरून वीज निर्मिती करतो. पण रात्रीच्या अंधारात सूर्य नसल्यामुळे सोलार पॅनल रात्रीची वीज निर्माण करू शकत नाही. या प्रकल्पामुळे ते शक्य होईल. आता रिफ्लेक्ट ऑर्बिटल कंपनी रात्रीचा सूर्यप्रकाश कसा पृथ्वीवर आणणार आहे, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. रिफ्लेक्ट ऑर्बिटल अंतराळात ५७ उपग्रह सोडणार आहेत. या उपग्रहांमध्ये अल्ट्रा मायलर मिरर असतील, हे मिरर अशा टेक्नॉलोजीने बनवले जाणार आहेत. जे रात्री सूर्यप्रकाश पृथ्वीवर असणाऱ्या सोनार पॅनलवर रिफ्लेक्ट करू शकतील. हे उपग्रह पृथ्वीपासून जवळ जवळ ६०० किलो मीटर अंतरावर असतील. या प्रक्रियेला त्यांनी  Sunlight On Demand असं नाव दिलं आहे. (Reflect Orbital Company)  

बेन नोवाक यांनी रात्री सूर्यप्रकाश मिळवण्याचा Experiment एका हॉट एअर बलूनमध्ये अल्ट्रा मायलर मिरर लावून करून बघितला आहे. जसं आपण एखाद्या फूड डीलेवरी App वरुन जेवण मागवतो, तेवढ्याच सोप्या पद्धतीने लोकांणा रात्रीचा सूर्यप्रकाश मिळवून द्यायचं उदिष्ट बेन नोवाक यांच आहे. त्यांच्या वेबसाइटवर लॉगिन करून आपल्याला जिथे सूर्यप्रकाश हवा आहे त्या जागेचा योग्य पत्ता टाकायचा आणि मग तुम्हाला सूर्यप्रकाश मिळेल. उपग्रहातून रिफ्लेक्ट होणारा सूर्यप्रकाश ५ किलोमीटर भागात दिला जाऊ शकेल आणि तोही ३० मींनिटांपर्यंत. (International News)

या कंपनीची वेबसाइट सध्या दोन भागांमध्ये विभागली आहे. लाइटिंग आणि एनर्जी, पहिला भाग पृथ्वीवरील विशिष्ट ठिकाणी रात्री सूर्यप्रकाश मिळवून देण्यासाठी अर्ज स्वीकारत आहे, तर एनर्जी भाग सूर्यप्रकाशा सोलार पॅनलवर रिफलेक्ट करुन रात्रीसुद्धा सोलारएनर्जी निर्माण करू इच्छूनायऱ्यांसाठी आहे. कंपनीचा ऑर्बिटल मिरर 2025 मध्ये लाँच होणार आहे आणि पुढील काही महिन्यांपर्यंतच तुम्ही  “सूर्यप्रकाशासाठी अर्ज” करू शकता. ही कंपनी सुरवातीला लिमिटेड अर्ज स्वीकारणार आहे. Sunlight On Demand हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच या कंपनीकडे 30,000 पेक्षा जास्त अर्ज आले आहेत. (Reflect Orbital Company)

===============

हे देखील वाचा :  मंगळग्रहाच्या पोटात पाणी !

===============

आता ही टेक्नॉलॉजी ऐकायला भारी वाटते आणि ती आहे सुद्धा, पण भविष्यात त्याचे काय साइड इफेक्ट होतील? आता प्रकाश प्रदूषणामुळे आपल्याला रात्रीच्या चांदण्या दिसत नाहीत. या प्रकल्पामुळे ते प्रकाश प्रदूषण आणखी वाढेलं. रात्री आणि दिवस या निसर्गचक्रात अशाप्रकारच्या मानवी हस्तक्षेपामुळे, वनस्पती व प्राण्यांच्या जीवनचक्रात बदल होऊ शकतात. त्याशिवाय इतक्या उपग्रहांमुळे अंतराळप्रदूषण सुद्धा होऊ शकतं. रात्री सूर्यप्रकाश आणणाऱ्या या  टेक्नॉलॉजीचा वापर मर्यादित ठेवला तर या समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवणार नाहीत. पण एक मात्र खरं आहे की, जर रिफ्लेक्ट ऑर्बिटल  यांचा हा प्रकल्प यशस्वी झाला तर माणसांना जास्त प्रमाणात सौरऊर्जा  मिळवून देण्यासाठी ही टेक्नॉलॉजी मैलाचा दगड ठरेल. (International News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.