Home » हो शंतनू नायडूच आहे रतन टाटांचा खरा वारसदार !

हो शंतनू नायडूच आहे रतन टाटांचा खरा वारसदार !

by Team Gajawaja
0 comment
Shantanu Naidu
Share

भारतीय उद्योग जगाला एका नव्या सुवर्णकाळात नेणारे उद्योजक रतन टाटा वयाच्या ८६ व्या वर्षी अनंतात विलीन झाले. त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी राजकीय नेते, क्रीडा क्षेत्रातले आणि उद्योग जगातील अनेक मोठ्या हस्ती उपस्थित होत्या. सामान्य माणसांनी सुद्धा त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी मोठी रांग लावली होती. या सगळ्यात त्यांच्या अंतदर्शनाच्यावेळी आणि अंत यात्रेच्यावेळी एक तरुण त्यांच्या जवळ सारखा दिसत होता. हा कोण आहे, हा प्रश्न काहींना पडला असेल. हा आहे रतन टाटा यांचा सर्वात तरुण मित्र शंतनू नायडू. पण आपल्या वयापेक्षा एवढ्या लहान वयाच्या तरुणासोबत रतन टाटांची मैत्री कशी झाली? शंतनू नायडू कोण आहे? जाणून घेऊया. (Shantanu Naidu)

शंतनू नायडू आणि रतन टाटा यांच्यामध्ये जवळ जवळ ५६ वर्षांचा अंतर आहे, तरी सुद्धा ते एकमेकांचे बेस्ट फ्रेंड बनले ते त्या दोघांच्या प्राणी प्रेमामुळे. रतन टाटांचं प्राणी प्रेम जग जाहीर आहे. ताज हॉटेलमध्ये रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांंनाही सुद्धा राजेशाही थाट मिळतो. रतन टाटांच्या शेवटच्या क्षणांमध्ये सुद्धा त्यांचा जवळचा गोवा हा पाळीव कुत्रा त्यांच्या पार्थिवाच्या बाजूला बसून रडत होता. इतका लळा या माणसाने प्राण्यांना सुद्धा लावला होता. टाटांप्रमाणे तरुण शंतनू नायडूचं सुद्धा प्राणीप्रेम सुद्धा तितकंच उत्कट आहे. (Latest Updates)

२०१४ ला शंतनू पुण्यात काम करत होता. रात्रीचा प्रवास करताना त्याला रस्त्यावर अनेक भटक्या कुत्र्यांचे शव पडलेले दिसायचे, ज्यांचा गाडी खाली येऊन मृत्यू झाला असायचा. हे पाहून शंतनूला खूप त्रास व्हायचा, म्हणून त्याने या भटक्या कुत्र्यांना कसं वाचवता येईल याचा विचार करू लागला. तो स्वत: ऑटोमोबाईल डिझाइन इंजिनिअर होता. त्याला आयडिया सुचली आणि त्याने भटक्या कुत्र्यांसाठी रात्रीच्या अंधारात सुद्धा दिसतील असे कॉलर बेल्ट तयार केले. ज्यासाठी त्याच्या मित्रांनी मिळून पैसे काढले आणि ते बेल्ट बनवून भटक्या कुत्र्यांना घालण्यास सुरुवात केली या उपक्रमाला त्याने मोटोपॉज नाव दिलं होतं. शंतनूच्या या कामाबद्दल अनेक न्यूजपेपर्स मध्ये छापलं गेलं, जे रतन टाटांपर्यंत सुद्धा पोहचलं. तेव्हा शंतनूला बऱ्याच लोकांनी टाटांना पत्र लिहायला सांगितलं, जे त्याने लिहिलं ही. पण त्याचं उत्तर यायला बरेच दिवस लागले. (Shantanu Naidu)

रतन टाटांनी शंतनूला भेटण्यासाठी मुंबईला बोलावलं. तेव्हा रतन टाटांनी शंतनूला सोबत घेऊन भटक्या कुत्र्यांना सुद्धा अन्न, निवारा, प्रेम मिळावं या उद्देशाने एक उपक्रम राबवला. रतन टाटांची साथ मिळाल्यावर मोटोपॉज हा उपक्रम वेगाने वाढला. कामानिमित्त सुरू झालेला त्यांचा संपर्क हळूहळू वाढत गेला. या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. त्यानंतर कामाव्यतिरिक्तही शंतनू टाटांना भेटू लागला त्यांच्यात समवयस्क मित्रांमध्ये होतात तशा वैयक्तिक गोष्टींबाबत गप्पा सुद्धा होऊ लागल्या. (Latest Updates)

तेव्हा शंतनूने रतन टाटांना सांगितलं होतं की, “अमेरिकेला एमबीए करून पदवीनंतर टाटा ट्रस्टमध्ये योगदान देण्याची संधी शोधण्यासाठी मी भारतात परतणार आहे.” आता लांब गेल्यामुळे त्या दोघांच्या मैत्री संपेल असं शंतनू ला वाटलं होतं. पण ती मैत्री आणखी वाढली. एवढचं काय रतन टाटा स्वत: शंतनूच्या पदवीदान सोहळ्याला अमेरिकेला गेले होते. योगायोग म्हणजे शंतनू सुद्धा त्याच कॉलेजमध्ये शिकला ज्या कॉलेजमध्ये रतन टाटासुद्धा शिकले होते. (Shantanu Naidu)

======

हे देखील वाचा :  जाणून घ्या रतन टाटांची कारकीर्द

======

भारतात परतल्यानंतर शंतनू टाटा ट्रस्टच्या एका कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून काम करू लागले. मग एक दिवस टाटांनी शंतनूला फोन करून “माझा असिस्टंट बनणार का?”असा प्रश्न विचारला. भटक्या कुत्र्यांच्या मदती पासून सुरू झालेला हा प्रवास सोबत काम करण्यापर्यंत येऊन पोहचला. जेव्हा रतन टाटा गेले, तेव्हा शंतनू सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं की, “ रतन टाटांसोबतच्या मैत्रिने मला खूप काही दिलं. त्यांच्या जाण्याने या मैत्रीत आता पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्यासाठी मी माझं उर्वरित आयुष्य घालवीन. प्रेमाची किंमत दुख आहे. गुडबाय, माय लाइट हाऊस.” मैत्रीला वय नसतं, हे खरं आहे. अनेक बातम्यांमध्ये दाखवण्यात येतं होतं की, शंतनू आता टाटांचा वारसदार होणारं. प्रॉपर्टीच्या बाबतीत माहिती नाही, पण रतन टाटांचा प्राणीप्रेमाचा वारसा शंतनू पुढे नेणार, एवढं नक्की. (Latest Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.