दक्षिण अफ्रिकेमधील गेंडे हे जगप्रसिद्ध आहेत. या देशातील एकशिंगा गेंडा हा आता दुर्मिळ प्रजाती होण्याचा बेतात आहे. कारण या देशात गेंड्यांना मारण्याचे प्रमाण वाढले आहे. गेंड्यांची ओळख असलेले शिंग, त्यांचे शत्रू झाले आहे. कारण जेवढे शिंग मोठे, तेवढी त्या गेंड्यांची शिकार लवकर होत आहे. यासाठी दक्षिण अफ्रिकेमधील अनेक संस्थांनी पुढाकार घेऊन शिका-यांविरोधात मोहीम सुरु केली. मात्र त्याला यश आले नाही.
गेंड्यांना मारण्यासाठी तस्कर कोणत्याही थराला जात असल्याचा अनुभव प्राणी मित्रांना आला आहे. तिथे दर २० तासांनी एक गेंडा मारला जातो. कारण या गेंड्यांच्या शिंगांची किंमत सोन्या, चांदीपेक्षा अधिक आहे. मात्र आता ही शिकार थांबवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी एक अनोखी योजना जाहीर केली आहे. हे शास्त्रज्ञ थेट गेंड्याच्या शिंगात किरणोत्सारी पदार्थ टाकत आहेत. किरणोत्सर्गी पदार्थ गेंड्याच्या शिंगात इंजेक्शनद्वारे टाकण्यात येत असून वन्यजीव राखीव भागात सुमारे २० गेंड्यांच्या शिंगांमध्ये किरणोत्सर्गी पदार्थ टाकण्यात यश आले आहे. आता या गेंड्यांच्या शिंगाला तस्करांनी हात लावला तर त्यांचा जागीच मृत्यू होणार आहे. या प्रकारामुळे दक्षिण अफ्रिकेतील गेंड्यांना जीवदान मिळेल अशी आशा आहे. (South Africa)
दक्षिण आफ्रिकेची ओळख असलेल्या गेंड्याच्या शिकारीत लक्षणीय वाढ झाली आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या आकडेवारीनुसार, २० व्या शतकाच्या सुरूवातीस दक्षिण अफ्रिकेत गेंड्यांची संख्या सुमारे ५००००० एवढी होती. पण त्यानंतर गेंड्याच्या शिंगांच्या तस्करीत वाढ झाली. यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय टोळ्या काम करु लागल्या. काळ्या बाजारात गेंड्याच्या शिंगांची मागणी वाढली. या सर्वांचा परिणाम म्हणजे, दक्षिण अफ्रिकेतील गेंड्यांची सातत्यानं शिकार होत आहे. त्यांची संख्या आता २७००० इतकी कमी झाली आहे. हे शिकारीचे प्रमाण एवढे चिंताजनक आहे की तिथे १६,००० ते ५०० हून अधिक गेंड्यांची दरवर्षी शिकार होत आहे. फक्त कोविड-१९ च्यावेळी असलेल्या लॉकडाऊनमध्ये गेंड्यांची शिकार पूर्णपणे थांबली होती. मात्र दोन वर्षानंतर पुन्हा शिकार सुरु झाली. आता ही शिकार एवढी वाढली आहे की दक्षिण आफ्रिकेत दर २० तासांनी एक गेंडा मारला जातो. गेंड्यांना मारल्यावर त्याचे शिंग लगेच काढून घेण्यात येते. ब-याचवेळा शिंग कापतांना गेंडे जखमी असतात.
अशावेळी त्यांच्यापासून कापून शिंग वेगळे केले जाते. हे त्या गेंड्यांसाठी वेदनामयी असते. याच वेदनांमुळे त्यांचा मृत्यू होतो. आणि यातून जे गेंडे वाचत आहेत. त्यांना शिंगाअभावी जगतांना खूप कष्ट पडत आहेत. यामुळे दक्षिण अफ्रिकेत प्राणी मित्रांनी एक होऊन गेंडे वाचवण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. या गेंड्यांवर अवलंबून येथील स्थानिकांचे जीवन आहे. कारण गेंड्यांना बघण्यासाठी जगभरातून पर्यंटक येथे येतात. त्यावरच स्थानिकांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. (South Africa)
============================
हे देखील वाचा : चक्क हत्तीणीनं दिला जुळ्या बाळांना जन्म
============================
गेंड्यांना वाचवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील पशुवैद्य आणि शास्त्रज्ञांनी गेंड्याची शिंगे किरणोत्सारी पदार्थाने भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तस्करीच्या वेळी शिंगे शोधणे सोपे होणार आहे. सध्या २० गेंड्यांवर हा प्रयोग करण्यात आला आहे. याची व्याप्ती वाढवून अन्य गेंड्याच्या शिंगामध्येही असेच किरमोत्सारी पदार्थ भरण्यात येणार आहेत. यासाठी शास्त्रज्ञ गेंड्यांना किरणोत्सारी पदार्थाचे इंजेक्शन देत आहेत. यामागील कल्पना अशी आहे की, राष्ट्रीय सीमेवर आधीपासून असलेले रेडिएशन डिटेक्टर एखादे शिंग आलेच तर ते शोधू शोधतील आणि शिकारी आणि तस्करांना अटक करण्यास मदत होईल. या संशोधनामध्ये पशुवैद्य आणि अणु तज्ज्ञांचा सहभाग करुन घेण्यात आला आहे. कारण हा प्रयोग करण्यापूर्वी गेंड्याला शांत करणे गरजेचे असते. त्यानंतर त्याच्या शिंगात छिद्र पाडून काळजीपूर्वक आण्विक पदार्थ आता सोडण्यात येते. दक्षिण आफ्रिकेतील विटवॉटरसँड विद्यापीठातील रेडिएशन आणि हेल्थ फिजिक्स युनिटमधील संशोधक या सर्व मोहीमेचे नेतृत्व करीत आहेत. (South Africa)
सध्या काळ्या बाजारात सोने, चांदी आणि हिऱ्यांपेक्षा गेंड्याची शिंगे महागात विकली जातात. अनेक औषधांसाठी या शिंगांचा वापर करण्यात येतो. या शिंगांना भेट म्हणूनही देण्यात येते. ही किंमत करोडोंमध्ये असते. यामुळे एका प्राण्याला वेदनामयी मृत्यू देण्यात येतो. हे थांबवण्यासाठी आता प्रयत्न सुरु झाले आहेत.
सई बने