Home » राजा विक्रमादित्य यांचा हिंदू नववर्षांशी काय असेल संबंध?

राजा विक्रमादित्य यांचा हिंदू नववर्षांशी काय असेल संबंध?

by Team Gajawaja
0 comment
Hindu New Years
Share

राजा विक्रमादित्य याची आपल्याला ओळख आहे का…राजा विक्रम म्हटलं की, विक्रम आणि वेताळ एवढ्यापूरतीच या महान सम्राटाची ओळख मर्यादित राहिली आहे.  मात्र या महान सम्राटानं रोमन राजा ज्युलियस सीझरचा पराभव केला होता.  संपूर्ण आशियावर त्याचे राज्य होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजा विक्रमादित्याने इ.स.पूर्व 57 मध्ये विक्रम संवत सुरू केले. शकांचा पराभव केल्यावर, राजा विक्रमानं विक्रम संवत सुरु केले. आपण हिंदू नववर्ष (Hindu New Years) साजरे करतो, या हिंदू नववर्षाच्या दिनदर्शिकेची सुरुवात या महान राजानं केली होती. उज्जैनच्या या राजा विक्रमादित्यने विक्रम संवत सुरू केले. त्यामागची माहिती उत्सुकतापूर्ण आहे. आपल्या दरबारात असलेल्या विद्वानांना नवरत्न अशी पदवी देणारा हा राजा त्याच्या सिंहासनासाठीही प्रसिद्ध होता. त्यानं सुरु केलेले विक्रम संवत काय जाणून घेतले तरी महान राजा विक्रमादित्याच्या कामगिरीची कल्पना येते.(Hindu New Years)  

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा (Hindu New Years) पहिला दिवस. हिंदू नववर्षाच्या दिनदर्शिकेची सुरुवात मध्यप्रदेशच्या उज्जैन शहरातून झाली. या दिनदर्शिकेला विक्रम दिनदर्शिका असेही म्हणतात. उज्जैनच्या सम्राट विक्रमादित्यने विक्रम संवत सुरू केले, तेव्हापासून हिंदू नववर्ष या दिनदर्शिकेनुसार साजरे केले जाते. विक्रमादित्यचा जन्म इ.स.पूर्व 102 मध्ये झाला. त्याने इ.स.पूर्व 57 मध्ये शक साम्राज्याचा पराभव केला.  या शकांची सत्ता भारतातून खाली आणली.  शकांचा पराभव करून त्यांनी शक संवत या दिनदर्शिकेच्या जागी चैत्र महिन्यापासून विक्रम संवत सुरू केले. यालाच नंतर हिंदू दिनदर्शिका (Hindu New Years) म्हटले गेले.  विक्रम संवत 2080 वर्षांपूर्वी, जेव्हा राजा विक्रमादित्य उज्जैनचा राजा होता तेव्हा सुरू झाले. जगभरात 60 हून अधिक संवत्स होते, परंतु विक्रम संवत हा सर्वात जास्त प्रचलित आहे.

राजा विक्रमादित्यच्या काळात वराह मिहीर हा महान खगोलशास्त्रज्ञ होता. विक्रमादित्याच्या दरबारात नवरत्न होते.  वराह मिहीर ला त्यातीलच एक नवरत्न म्हणून राजानं गौरवलं होतं.  त्यांच्या मदतीमुळे या संवताचा प्रसार राजा विक्रमादित्यानं केला. विक्रम संवत हे इंग्रजी दिनदर्शिकेपेक्षा 57 वर्षे पुढे आहे.  इंग्रजी दिनदर्शिकेमध्ये 2023 हे वर्ष सुरू आहे,  तर 22 मार्चपासून विक्रम संवत 2080 सुरू झाले आहे. हिंदू दिनदर्शिकेचा पहिला महिना म्हणजे चैत्र आणि शेवटचा महिना फाल्गुन  असतो. विक्रमादित्य हा महान राजा होता.  विक्रमादित्यचे नाव दोन शब्दांपासून बनले होते. विक्रम आणि आदित्य. त्याच्या नावाप्रमाणे राजा पराक्रमी होता.  विक्रमादित्याने संपूर्ण आशिया जिंकला होता. त्या वेळी, त्याचे साम्राज्य आधुनिक चीन, मध्य आशिया आणि आग्नेय आशियाच्या काही भागांमध्ये पसरले होते.   इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य विक्रमादित्याचे होते.  यानंतर भारताचा कोणताही शासक एवढ्या मोठ्या साम्राज्याचा अधिपती झालेला नाही.

महाराज विक्रमादित्य यांनी आपल्या सभेत नवरत्न ठेवण्याची प्रथा सुरू केली होती. त्याला पाहून नंतर इतर राज्यकर्त्यांनीही नवरत्न ठेवले. ही प्रवृत्ती शतकानुशतके चालू राहिली. अकबराच्या दरबारातील नऊ रत्नेही सोळाव्या शतकात प्रसिद्ध झाली. मात्र याची सुरुवात सम्राट विक्रमादित्यानं केली होती, याची महिती अनेकांना नाही.  विक्रमादित्याचे नवरत्न म्हणजे, धन्वंतरी, क्षनपाक, अमरसिंह, कालिदास, बेताल भट्ट, शंकू, वररुची, घाटकरपार आणि वराह मिहीर हे होते.  हे सर्व नवरत्न आपापल्या क्षेत्रातील तज्ञ होते.  धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जाणकार होते, तर क्षनपाक हे जैन संत आणि धर्माचे जाणकार होते. अमर सिंह यांचा अमरकोश हा शब्दकोष वाचूनच एखादी व्यक्ती अत्यंत ज्ञानी मानली जात असे. शंकू हे नैतिकवादी होते आणि बेताल भट्ट हे धर्माचार्य होते. वररुची हा कवी होता आणि घटकपर हा संस्कृत तज्ञ होता. वराह मिहीर हे महान ज्योतिषी होते. कालिदासाची महाकाव्ये ही आजही अभ्यासाचा विषय आहेत. (Hindu New Years)

=======

हे देखील वाचा : पारसी नवं वर्षाचा पहिला दिवस नवरोज, जाणून घ्या अधिक

=======

कर्नाटकातील यक्षगानामध्ये विक्रमादित्य आणि शनी यांच्याशी संबंधित कथा मांडण्यात आली आहे. यामध्ये विक्रमादित्यावर रागावल्याने शनीदेवाने त्याची वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा घेतली. सर्व संकटांमध्येही राजानं हार मानला नाही. प्रत्येक परीक्षेत यश मिळवले तेव्हा शनीदेव राजावर प्रसन्न झाले. विक्रमादित्याने त्यांच्याकडून वरदान मिळवले जे मी भोगले आहे, परंतु सामान्य माणूस तुमचा इतका राग सहन करू शकणार नाही, म्हणून त्याच्यावर दया करा. शनीदेवानं तसे वरदान राजाला दिले.  कर्नाटक आणि दाक्षिणात्य भागात राजा विक्रमादित्याची ही कथा नाटक आणि नृत्यप्रकारात सादर केली जाते. याशिवाय राजा विक्रमादित्यानंच राजा रामाच्या अयोध्येचा शोध घेतल्याचीही माहिती आहे.  या महान पराक्रमी सम्राटाचा भव्य पुतळा आता उज्जैन येथे साकारण्यात आलेल्या महाकाल लोकमध्ये बसवण्यात आला आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.