इजिप्त या देशामधील ममी हा एक चमत्कार मानला जातो. राजा, राणी किंवा प्रतिष्ठित व्यक्तिंच्या मृत्यनंतर त्यांच्या मृतदेहाला जतन करण्यासाठी विशिष्ट रसायनांमध्ये लपेटले जायचे. प्राचीन इजिप्तमध्ये मृतदेहांचे शवविच्छेदन करण्याची प्रथा सामान्य होती. या प्रक्रियेला ममीफिकेशन म्हटले जायचे. यातून मृतदेहाला सुगंधित द्रव्ये लावली जायची. यामुळे मृत व्यक्तीचा पुन्हा जन्म होईल, अशीही समजूत होती. या सर्व प्रक्रियेसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागायचा. यासाठी मृतदेहातील फुफ्फुसे, यकृत, आतडे आणि मेंदूही वेगळे करण्यात यायचे. (Mummy in Egypt)
ही सर्व प्रक्रिया पुजा-यांच्या उपस्थितीत प्रशिक्षीत मान्यवर करत असत. त्यामुळेच आजही हजारो वर्षापूर्वीच्या या ममी एक आश्चर्य आहेत. याच ममीमुळे सध्या संशोधकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. इजिप्तमधील राजानां फेरो अशी उपाधी दिली गेली होती. यापैकी अनेक राजांचा मृत्यू हा कमी वयात झाला आहे. त्यावेळी त्यांना घातक असे रोग झाले होते. प्लेग पासून कुष्ठरोगापर्यंत रोग या राजांना किंवा राजपुत्राला झाल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे. आता संशोधनाच्या नावावर त्यांच्या ममी उघडल्यास हे रोग पुन्हा मानवावर आक्रमण करण्याचा धोका काही संशोधकांना वाटत आहे. कारण यापैकी काही रोग हे संपूर्णपणे नष्ट झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे.
अशावेळी संशोधनासाठी नवीन एखादा रोग मानवावर हल्ला करण्याची शक्यता आहे. पण संशोधकांच्या दुस-या गटानुसार मानवाला झालेले रोग आणि त्यातील किटाणू हे मृतदेहावर फार कमी वर्ष रहातात. आता एवढ्या हजारो वर्षानंतर हे सर्व किटाणूही मृत झालेले असतील. त्याचा कुठलाही धोका नाही, त्यामुळे या ममी उघडून त्यावर संशोधन करण्याची गरज आहे. (Mummy in Egypt)
प्राचीन इजिप्तमधील ममी संदर्भात जागतिक संशोधकांमध्ये वाद सुरु झाला आहे. चीन इजिप्शियन ममीमध्ये लपलेले बॅक्टेरिया किंवा विषाणू आज प्लेगसारख्या रोगाचा पुन्हा प्रसार करु शकतात अशी भीती काहींनी व्यक्त केली आहे. इजिप्तच्या प्राचीन सभ्यतेमध्ये ममी हा महत्त्वाचा भाग होता. इजिप्तच्या राजवंशातील व्यक्तींचे मृतदेह हे विशिष्ट रसायनांच्या आवरणात लावून ठेवण्यात येत असत. या मृतदेहांचे जतन केल्यास मृत व्यक्तीचा आत्मा परत आल्यावर त्याला पुन्हा देह प्राप्त होईल, अशी त्यामागची समजूत होती. यामुळे इजिप्तच्या राजवंशातील अनेक ममी जतन करुन ठेवल्या आहेत. या ममी जेव्हा संशोधकांना मिळू लागल्या, तेव्हा हा मानवी सभ्यतेसाठी मोठा शोध मानला गेला. कारण या ममी नुसत्याच ठेवल्या नव्हत्या. तर त्यांच्यासोबत तत्कालीन अनेक वस्तूही ठेवण्यात आल्या होत्या.
हजारो वर्षापूर्वीची ही ममी करण्याची रासायनिक प्रक्रीयाही संशोधकांना आव्हान देणारी ठरली. त्यामुळेच या ममींवर संशोधन सुरु झाले. मात्र यावर आता आक्षेप घेण्यात येत आहे. कराण यातील अनेक राजांचा मृत्यू हा महामारीमध्ये झाला होता. त्यांच्यासोबत या रोगाचे विषाणूही असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात झालेल्या संशोधनानुसार इजिप्शियन लोकांना चेचक, क्षयरोग आणि काही कुष्ठरोग यासारख्या आजारांनी ग्रासले होते. त्यामुळे या ममींना आता पुन्हा हाताळल्यास हे रोग नव्यानं मानवावर आक्रमण करण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. इजिप्तच्या २० व्या राजवंशातील चौथा फारो, रामेसेस पाचवा, ज्याच्या ममी केलेल्या शरीरावर चेचकांची स्पष्ट चिन्हे दिसून आली आहेत. (Mummy in Egypt)
==================
हे देखील वाचा: इजिप्तमध्ये सापडले मृतांचे शहर
==================
जागतिक आरोग्य संघटनेनं १९८० मध्येच जगभरातून चेचक निर्मूलन झाल्याचे घोषित केले आहे. अशावेळी या ममीमधून पुन्हा रोगाला आमंत्रण कशाला द्यावे असे संशोधकांचे म्हणणे आहे. लाईव्ह सायन्समधील हा अहवाल केंब्रिज विद्यापीठातील प्रयोगशाळेचे संचालक पियर्स मिशेल यांनी मात्र फेटाळला आहे. त्यांच्यामते जिवंत शरीर नसेल तर परजीवींच्या बहुतेक प्रजाती एक किंवा दोन वर्षांत मरतात. जर 10 वर्षांहून अधिक काळ लोटला तर सर्व सर्वच प्रकारचे विषाणू नष्ट होतात. क्षयरोग आणि कुष्ठरोगास कारणीभूत असलेल्या जीवाणूंनाही जिवंत शरीराची आवश्यता असते.
त्यामुळे ममीपासून कुठलाही धोका नाही. पण हा दावा लाईव्ह सायन्समधून फेटाळण्यात आला आहे. जग आता कुठे करोना नावाच्या महामारीपासून सावरले आहे, अशावेळी नको त्या संशोधनाच्या आग्रहाखातर नव्या रोगांना आमंत्रण देऊ नये. या वादावर निकाल काहीही लागला तरी इजिप्तमधील ममींचे रहस्य हे कामय रहाणार आहे. (Mummy in Egypt)
सई बने