Home » पृथ्वीच्या पोटात दडलंय तरी काय ?

पृथ्वीच्या पोटात दडलंय तरी काय ?

by Team Gajawaja
0 comment
Earth
Share

आइसलँडच्या दक्षिण भागात ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे.  गंभीर बाब म्हणजे,  गेल्या डिसेंबरपासून या भागात झालेला हा चौथा भयंकर उद्रेक आहे.  यानंतर संपूर्ण भागात आणीबाणी जाहीर झाली आहे.  युरोपीय देशाच्या रेकजेन्स द्वीपकल्पातील या चौथ्या ज्वालामुखीच्या उद्रेकानं चिंता व्यक्त करण्यात येत आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीच्या पोटात अग्नि नदी वाहत आहे.  ही अग्नि नदी आता बाहेर येऊ पाहत आहे.  हा उकळता लाव्हा बाहेर आला तर देशच्या देश अग्निच्या पोटात जाण्याची भीती आहे.  हजारो वर्षापूर्वी अशाच प्रकारच्या लाव्हानं शहरं पोटात घेतली होती आणि पृथ्वीवरुन मानव सभ्यता संपूष्ठात येण्याचा धोका निर्माण झाला होता. आता आइसलॅंडमध्ये असाच भयंकर ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  (Earth)

आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्फोट असे त्याचे वर्णन केले जात आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे की, लावा जवळच्या ग्रिन्डाविक शहराजवळ पोहोचला आहे. आइसलॅंड हे पर्यटकांच्या आवडीचे स्थळ आहे.  याच आइसलॅंडवर ज्वालामुखीचे संकट पसरले आहे. पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या ब्लू लगून जवळही लाव्हा मोठ्या प्रमाणात पसरला आहे. ज्वालामुखीतून लाव्हा आणि धुराचे प्रचंड लोटही बाहेर पडत आहेत.  आइसलँडच्या हवाई क्षेत्रावरुन या धुराचे लोट दिसत आहेत. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर रेकजाविक शहराच्या आकाशाचा रंग बदलला आहे.  आइसलँडच्या नागरी संरक्षण सेवेनुसार, रात्री 8 वाजता ग्रिन्डाविकच्या उत्तरेला ज्वालामुखीचा उद्रेक झाला. याच ठिकाणी 8 डिसेंबर रोजी ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. स्फोटानंतर जमिनीला मोठे भगदाड पडले आहे. त्यातून उकळणारा लाव्हा आणि धूर बाहेर पडत आहे. हे दृष्य अतिशय भीतीदायक असून हा लाव्हा कधी शांत होईल, याकडे आता संशोधकांचे लक्ष लागले आहे.(Earth)

भूगर्भशास्त्रज्ञ मॅग्नस टूम गुडमंडसन यांनी हेलिकॉप्टरद्वारे ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या जागेची पाहणी केली.  त्यानुसार हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्फोट असल्याचे त्यांनी सांगितले. ज्वालामुखीतून बाहेर पडणारा लाव्हा दोन प्रवाहांमध्ये वेगवेगळ्या दिशेने वाहत असून एक प्रवाह पश्चिमेकडे तर दुसरा दक्षिणेकडे वाहत आहे.  दक्षिणेकडे वाहणारा लाव्हा ग्रिन्डाविकच्या पूर्वेकडील संरक्षक भिंतींवर पोहोचला आहे.  त्यामुळेच चिंता वाढत आहे.  या लाव्हासंदर्भात संशोधन करणारे संशोधक गुडमंडसन यांनी सांगितले की, हा लाव्हा समुद्रात वाहून जाण्याचीही शक्यता आहेपरंतु ज्वालामुखीच्या आत सुरू असलेल्या घटना शांत झाल्या तर हा लाव्हा जिथे आहे, तिथेच राहील.  ही परिस्थिती अधिक चिंतानीय असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.  नॉर्वेच्या हवामान एजन्सीचे नैसर्गिक आपत्ती तज्ञ, आयनार बेस्सी गेस्टेसन हे सुद्धा या लाव्हाबाबत संशोधन करीत आहेत.

 त्यांच्या संशोधनानुसार ज्वालामुखीमधून बाहेर पडणारा लाव्हा समुद्राच्या पाण्याच्या संपर्कात आला तर अधिक चिंताजनक परिस्थिती निर्माण होणार आहे.  यामुळे हानिकारक वायू बाहेर पडू शकतात आणि लहान स्फोट होऊन जीवसृष्टीलाही हानीकरक ठरु शकतात.  यातच पश्चिमेकडे वाहणारा लाव्हा थेट ब्लू लॅगून आणि भू-औष्णिक ऊर्जा प्रकल्पाकडे वाहत आहे. येथून द्वीपकल्पातील बहुतेक भागांना गरम पाण्याचा पुरवठा होतो. त्यापर्यंत लाव्हा पोहचला तर हा सर्व प्रकल्पच धोक्यात येईल. (Earth)

============

हे देखील वाचा : वृंदावनच्या होळीची परदेशी पर्यटकांनाही भुरळ

============

शिवाय याचा परिणाम येथे रहात असलेल्या नागरिकांच्या जिवनावर भविष्यात होणार आहे.  आइसलँडची राजधानीच्या आसपास लावा थांबवण्यासाठी संरक्षक भिंती बांधण्यात आल्या आहेत.  लाव्हामधील निघणा-या ज्वालांमधून निघणा-या उष्णतेमुळे फायबर ऑप्टिकल केबल्स खराब होऊन फोन आणि इंटरनेट सेवा खंडित झाल्या आहेत.  त्यामुळे खबरदारी म्हणून पर्यटन स्थळ असलेले ब्लू लगून पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे.  ग्रिंडाविक शहरातील घरेही रिकामी करण्यात आली आहेत. जानेवारीमध्येही असाच स्फोट झाल्यानंतरही येथून नागरिकांना बाहेर काढण्यात आले होते.  आता हा लाव्हा शहरात पोहचला असून अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. (Earth)

आइसलँडमध्ये 33 सक्रिय ज्वालामुखी आहेत.  त्यातील सर्वात मोठ्या ज्वालामुखीचा हा उद्रेक झाल्यानं चिंता वाढली आहे.  आता हा सर्व भागच ज्वालामुखीप्रवण झाला आहे.  या भागात खाली अग्नीची नदी आहे, ही सर्व नदी बाहेर आली तर काय होईल ही चिंता संशोधकांना त्रस्त करीत आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.