Home » टर्ब्युलन्स म्हणजे नेमकं काय ?

टर्ब्युलन्स म्हणजे नेमकं काय ?

by Team Gajawaja
0 comment
Turbulence
Share

सिंगापूर एअर लाइन्सच्या फ्लाइटला लंडनहून सिंगापूरला जाताना टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. हे विमान ३० हजार फुटांवरून उड्डाण करत होते. उड्डाण दरम्यान, फ्लाइटला अचानक जोरदार वाऱ्याचा सामना करावा लागला. (Turbulence)

त्यामुळे विमानात प्रचंड टर्ब्युलन्सनिर्माण झाला. अशी बातमी जवळपास सर्वच ठिकाणी आली. यासोबत एका नव्या शब्दावरुन चर्चा सुरु झाली आहे. टर्ब्युलन्स म्हणजे नेमकं काय याचीही चर्चा सुरु झाली. जेव्हा विमान पर्वत किंवा डोंगराळ भागांवरून उड्डाण करते,  तेव्हा हवेचा प्रवाह अस्थिर होऊ शकतो, ज्यामुळे विमानात अशांतता निर्माण होते.  याच परिस्थितीला टर्ब्युलन्स म्हणतात. 

जमिनीपासून हजारो मिटर उंच असलेल्या विमानात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास ती परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विमानात तंत्रज्ञान उपलब्ध असते.  मात्र क्वचित प्रसंगी सिंगापूस एअरलाइन्समधील प्रवाशांनी जो अनुभव घेतला तशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. यावेळी प्रवाशांच्या नाक, कानातून रक्त येऊ शकते. टर्ब्युलन्स परिस्थिती वाढली तर हे रक्ताचे प्रमाण वाढून प्रवाशांचा वेदनामयी मृत्यू होतो. त्यामुळेच हे टर्ब्युलन्स म्हणजे काय, आणि अशी परिस्थिती आली तर काय काळजी घेता येईल हे जाणून घेऊया. (Turbulence) 

विमान प्रवास हा काही नवीन राहिला नाही. याच विमान प्रवासात जमिनीवरुन काही हजार किलोमीटर उंचीवर असताना एअर टर्ब्युलन्स येऊ शकते. सिंगापूर एअरलाइन्सचे विमान अशाच  एअर टर्ब्युलेन्समध्ये अडकले.  यात ७३ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला तर ३० प्रवासी जखमी झाले. तसेच विमानातील कर्मचा-यांनाही याचा मोठा फटका बसला आहे. 

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या बोइंग ७७७-३००ER फ्लाइटमध्ये ही घटना घडली. रात्री २.४५ वाजता या फ्लाईटने उड्डाण केले होते. त्यानंतर थोड्याच वेळात विमानात टर्ब्युलन्स तयार झाले. टर्ब्युलन्स म्हणजे, सोप्या भाषेत वेगवेगळ्या तापमानात, दाबांवर किंवा वेगाचे वारे एकमेकांशी जुळतात तेव्हा हवेचा गोंधळ होतो. म्हणजे वेगवेगळ्या दिशांकडून येणारे वारे आदळतात. (Turbulence)

सामान्यतः जेव्हा हवामान खराब असते किंवा वादळ येत असते तेव्हा हवेचा गोंधळ होतो. पण येथे हवामान स्वच्छ असतानाही हवेचा गोंधळ धोकादायक रूप धारण करतो.  याला क्लिअर एअर टर्ब्युलन्स म्हणतात. स्वच्छ हवामानात हवेच्या अशांततेचा अंदाज लावणे अधिक कठीण असते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार पॅसिफिक महासागर क्षेत्रात असे टर्ब्युलन्स येण्याचे धोके जास्त आहेत. (Turbulence) 

यासंदर्भात नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने २०२१ मध्ये केलेल्या संशोधनानुसार, २००९ ते २०१८ पर्यंत, अमेरिकन एजन्सीच्या संशोधनात असे आढळून आले की, एक तृतीयांश पेक्षा जास्त विमान क्रॅश एअर टर्ब्युलेन्समुळे झाले आहेत. यात प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. पण विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. यातील प्रवाशांना हाडे फ्रॅक्चर, डोक्याला जखमा आदी घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

एअर टर्ब्युलन्स दरम्यान प्रवाशांनी सीट बेल्ट न लावल्यानं त्यांना दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.  तसेच अशा प्रकरणांमध्ये प्रवाशांना उलट्याही होत असल्याचे निदर्शनास आले आहे.  वयोवृद्ध प्रवाशांना याचा अधिक त्रास होत असून त्यांना ह्दयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते. 

त्यामुळे अशा परिस्थितीत प्रवाशांनी प्रथम त्यांचे सीट बेल्ट घट्ट बांधवे अशी सूचना देण्यात येते.  विमानाची स्थिती काहीही असो. पण प्रवाशांनी अशी परिस्थिती बघताच सीट बेल्ट लावावा हिच या टर्ब्युलन्स मधून बाहेर पडण्याची पहिली स्थिती मानण्यात येते. यात बहुतांशी विमान कर्मचारी जखमी होत असल्याचेही आढळून आले आहे. कारण या सर्वात सीट बेल्ट लावण्याचीही काही वेळा परिस्थिती नसते. अशावेळी त्या प्रवाशांना मदत करण्यासाठी विमान कर्मचारी पुढे असतात.  त्यामुळे त्यांनाच जास्त दुखापत होण्ची शक्यता आहे. (Turbulence)  

सिंगापूर एअर लाइन्समधील टर्ब्युलन्सचे फोटो आता सोशल मिडियावर शेअर होत आहेत. अशी परिस्थिती जर आल्यास त्याला सामोरे जातांना प्रथम मन शांत ठेवा, कुठलिही घाई करु नका, घाबरु नका, विमान ठराविक अंतरावर गेल्यावर ही परिस्थिती कमी होते, अशाही सूचना असतात.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.