प्रेग्नेंसीच्या वेळी वजन वाढणे ही सामान्य बाब आहे. मात्र अधिक वजन वाढणे हे सुद्धा कधीकधी समस्येचे कारण ठरु शकते. कारण प्रेग्नेंसीवेळी वजन वाढणे हे काही कारणांवर अवलंबून असते. त्यामुळे प्रेग्नेंसीवेळी आईचे वजन कमी असून सुद्धा चालत नाही. त्याच प्रमाणे प्रेग्नेंसीमध्ये अधिक वजन वाढणे हे काही समस्यांना आमंत्रण देऊ शकते. खासकरुन महिलांचे प्रेग्नेंसीदरम्यान १०-१२ किलो वजन वाढते. अशातच प्रेग्नेंसीमुळे वजन का वाढते किंवा अधिक वजन अशावेळी कशा पद्धतीने नियंत्रणात ठेवले पाहिजे हे आपण जाणून घेऊयात. तर प्रथम पाहूयात प्रेग्नेंसीमध्ये वजन का वाढते.(Weight gain in pregnancy)
प्रेग्नेंसीमध्ये किती वजन वाढले पाहिजे?
प्रेग्नेसीमध्ये वजन वाढले पाहिजे म्हणजे प्रत्येक महिलेचे ते वेगवेगळे असू शकते. महिलेने आपल्या गर्भावस्थापूर्वी किती वजन होते, बीएमआय (BMI) किती होता या वर सर्वकाही अवलंबून असते. इंस्टीट्युट ऑफ मेडिसन अॅन्ड नॅशनल रिसर्च काउंसिलच्या मते गर्भावस्थेत वजनासंबंधित नेमके काय सांगण्यात आले आहे ते पाहूयात.
-जर एखाद्या महिलेचा गर्भावस्थेपूर्वी बीएमआय हा १८.५ पेक्षा कमी आहे तर ती Underweight आहे. तिचे वजन १४-१८ किलो पर्यंत वाढले पाहिजे.
-अशाच प्रकारे ज्या महिलांचा बीएमआय १८.५-२५.९ दरम्यान आहे म्हणजे त्यांचा Normal BMI आहे. या महिलांचे गर्भावस्थेत ११ ते १६ किलो वजन वाढणे सुरक्षित मानले जाऊ शकते.
-या व्यतिरिक्त ज्या महिलांचा बीएमआय २५-२९ दरम्यान आहे म्हणजे त्या Overweight आहेत. या महिलांचे वजन ७-११ किलो पेक्षा अधिक नसावे.
-ज्यांचा बीएमआय ३० किंवा त्यापेक्षा ही अधिक आहे त्यांचे ५-९ किलो वजन वाढणे योग्य आहे.
हे देखील वाचा- बाळाच्या जन्मानंतर आई करतेय प्रवास? तर ‘या’ गोष्टींची घ्यावी विशेष काळजी
प्रेग्नेंसीवेळी अधिक वजनामुळे निर्माण होणाऱ्या समस्या
-मॅक्रोसोमिया
-गर्भकालीन मधुमेह
-हायपरटेंशनची समस्या
-स्टिलबर्थ
-अधिक वजन असलेल्या महिलांची मुलं भविष्यात लठ्ठपणा किंवा आरोग्यासंबंधित काही समस्यांचा सामना करु शकतात.(Weight gain in pregnancy)
प्रेग्नेंसीवेळी वजन नियंत्रणात कसे ठेवाल?
-सर्वात प्रथम तुम्हाला डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच काही गोष्टी करायच्या आहेचय त्यामुळे तुमचे वजन किती वाढत आहे याकडे लक्ष देत रहा.
-प्रेग्नेंसीवेळी जेवढं होईल तेवढी शरिराची हालचाल करा. फक्त जर डॉक्टरांनी तुम्हाला आराम करण्यास सांगितले असेल तर अशावेळी अधिक धावपळ करण्यापासून दूर रहा
-एक्सपर्टच्या माध्यमातून व्यायाम किंवा प्रेग्नेंसी योग वर्गाला जा. यामुळे तुमचे मेटाबॉलिज्म वाढेल आणि वजन ही वाढणार नाही
-भरपूर प्रमाणात पाणी प्या आणि हे गरजेचे आहे. कारण या दरम्यान डिहाड्रेशनामुळे पाचन संबंधित समस्या उद्भवू शकते
-संपूर्ण नऊ महिने तेलकट, तळलेले, साखरयुक्त किंवा जंक फूड पासून दूर रहा. प्रोटीन. विटामिन आणि लोहयुक्त हेल्थी खाणं खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे वजन ही नियंत्रणात राहीलच पण तुमच्या बाळाला भरपूर पोषक तत्व ही मिळतील.
-संध्याकाळच्या किंवा सकाळच्या वेळेस चालण्यासाठी जा.
आई आणि मुलाच्या उत्तम आरोग्यासाठी गर्भावस्थेत असताना वजन वाढणे महत्वपूर्ण असते. मात्र अधिक वजन वाढल्यास काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळेच वजन नियंत्रणात राहील याकडे अधिक लक्ष द्या. आणखी म्हणजे वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासून घेण्यासह बाळासंबंधित किंवा प्रेग्नेंसी संदर्भात काही प्रश्न असतील ते सुद्धा विचारत जा.