Home » ६० वर्षांपूर्वी e-पेमेंट सेवा सुरु करणाऱ्या VISA च्या यशाची कथा

६० वर्षांपूर्वी e-पेमेंट सेवा सुरु करणाऱ्या VISA च्या यशाची कथा

by Team Gajawaja
0 comment
VISA success story
Share

सध्या युजर्स डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून अवघ्या काही वेळातच पेमेंट करतात. मात्र अमेरिकेतील कंपनी वीजाने हिच प्रक्रिया ६० वर्षांपूर्वी घेऊन येत जगात आपले पाऊल टाकले होते. अमेरिकन कंपनी वीजा आज जगाती २०० पेक्षा अधिक देशांमध्ये पोहचली आहे. जगातील १५,१०० पेक्षा अधिक बँका आणि आर्थिक कंपन्यांसोबत वीजाकार्डचे नेटवर्क जोडले गेले आहे. ही जगातील सर्वाधिक दुसरी मोठी पेमेंट टेक्नॉलॉजी कंपनी आहे. वीजाने ६० वर्षांपूर्वी कागदाचे क्रेडिट कार्ड जारी केले होते आणि त्यामुळे या संदर्भात क्रांती झाली. त्या काळात नोट सुद्धा त्याला म्हटले जायचे. त्यानंतर काही कार्ड्स आले आणि डिजिटल पेमेंटला वेग मिळाला. (VISA success story)

भारतात चार प्रकारचे कार्ड जारी केले जातात. यामध्ये वीजा, मास्टर, मेस्ट्रो आणि रुपे कार्ड. परदेशात पेमेंट करण्यासाठी वीजा कार्डची गरज असते. कारण जगभरात ते कार्ड वापरण्यास आणि चलनास परवानगी आहे. आता जाणून घेऊयात वीजा कंपनीच्या यशाची कथा.

कागदापासून बनलेले जगातील पहिले क्रेडिट कार्ड
अमेरिकेतील डी वार्ड हॉकला वीजा कंपनीचे संस्थापक असे म्हटले गेले आहे. हॉक अमेरिकेतील एका बँकेत काम करायचे. त्यांच्याच म्हणण्यावरुन बँक ऑफ अमेरिकता क्रेडिट कार्ड कंपनी झाली होती. बँक ऑफ अमेरिकेने १९५८ मध्ये लहान आणि मध्यम वर्गातील व्यापाऱ्यांसाठी कागदापासून बनवलेले बँक अमेरिका कार्ड जारी केले. हे अशा प्रकारचे पहिलेच कार्ड होते. यापूर्वी त्याला लाइसेंस कार्ड असे म्हटले जायचे. १९७० पर्यंत या कार्डवर बँक ऑफ अमेरिकेचे थेट नियंत्रण संपुष्टात आले होते. १९७६ मध्ये बँक अमेरिका कार्डचे नाव बदलून वीजा असे करण्यात आले.

VISA success story
VISA success story

१९८३ मध्ये वीजा कंपनीमध्ये काही मोठे फेरबदल करण्यात आले. २०००८ मध्ये ते जेव्हा अमेरिकेत जेव्हा मंदीचा काळ सुरु होता तेव्हा वीजा कंपनीच्या आधारावर ती रजिस्टर झाली आणि १७.९ अरब डॉलर त्यांनी मिळवले. आपल्या वेगळ्या प्रकारच्या पेमेंट सिस्टिमच्या कारणास्तव ते वेगाने प्रसिद्ध होऊ लागले. जगभरात मान्यता मिळाल्यानंतर त्याच्या ग्राहकांची संख्या वाढली. हे सुरु करण्याचे श्रेय ही नेहमीच डी वार्ड हॉक यांना दिले गेले आहे. प्रत्येक वर्षाला या कार्डचा वापर ऐवढा वाढला की, त्यामुळे डिजिटल पेमेंटच्या फील्डमध्ये त्यांनी क्रांती आणली.(VISA success story)

हे देखील वाचा- क्रेडिट कार्डच्या माध्यमातून रिकामे होऊ शकते तुमचे बँक खाते, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

कशी कमाई करते वीजा कार्ड
सर्वसामान्यपणे असे मानले जाते की, वीजा कंपनी कार्जवर व्याजाच्या शुल्काच्या रुपात कमाई करते. मात्र या शुल्काच्या माध्यमातून जारी करणाऱ्या बँकेची कमाई होते. वीजाची कमाई थेट ग्राहकांच्या माध्यमातून होत नाही. हे कंपनी वीजा फॉर मॉडेलमधून कमाई करते. कंपनी काही गोष्टींमधून कमाई करते. जसे ३९ टक्के रेवेन्यू डाटाची प्रोसेस करते. यामध्ये पेमेंटला अधिकृत करणे, सेटलमेंट, वॅल्यू एडेड सर्विसचा समावेश आहे. कंपनीने २०२१ मध्ये याच्या माध्यमातून १२.८ अरब डॉलर रुपयांची कमाई केली होती. या व्यतिरिक्त ३४ टक्के कमाई सर्विस रेवेन्यू म्हणजेच एटीएम एक्सेस फी आणि २२ टक्के आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण आणि अन्य ५ टक्के बिझनेस टू बिझनेसच्या माध्यमातून कमाई केली. सध्या जगभरात त्याचे ३.८ अरब युजर्स आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.