Home » घरात देवघराची रचना कशी असावी? जाणून घ्या वास्तूशास्र काय सांगते

घरात देवघराची रचना कशी असावी? जाणून घ्या वास्तूशास्र काय सांगते

by Team Gajawaja
0 comment
Vastu Tips
Share

Vastu tips for deoghar- घरावर, आपल्या कुटुंबावर देवाची कृपा असावी म्हणून आपण नेहमीच त्याच्याकडे प्रार्थना करत असतो. तसेच आयु्ष्यात येणाऱ्या प्रत्येक सुख-दु:खासाठी आपण देवाला तुझे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू देत असे ही म्हणतो. त्यामुळे घरात असलेला देव्हारा हा आपण नेहमीच स्वच्छ करण्यासाठी त्यात असलेल्या देवांची नेहमीच पूजा करतो. मात्र वास्तूशास्रात वास्तूसह देवघराला फार महत्व दिले गेले आहे. कारण जो आपणांस संकटातून मुक्त करतो अशा परमेश्वरास आपल्या घरात त्याचे स्वत: चे वेगळे घर असलेले कधीही चांगलेच. देवघर हे बंगल्याच्या किंवा घराच्या इशानय कोन्यात असावे. पूर्वेस तोंड करुन म्हणजेच पश्चिमेला दार असेल तर अधिक उत्तम. फक्त दक्षिणाभिमुख देवघर ठेवू नका. ईशान्य कोपऱ्याच्या खोलाती, पश्चिमेस देवांचे मुख करुन किंवा पूर्वेस देवांचे मुख करुन ठेवावे. या व्यतिरिक्त इशान्य खोलीच्या आग्नेय कोपऱ्यात देवाची समई किंवा दिवा लावावा. जागेअभावी दोन किंवा तीन खोल्या असतील तर शक्यतो कोणत्याही खोलीच्या ईशान्य दिशेला देवघर असावे. लहान देवघर असल्यास ते जमिनीवर ठेवावे. देवघर कधीच लटकवून किंवा अडकवून ठेवू नये.

देव्हाऱ्यावर अपवित्र वस्तू किंवा अडगळ ठेवण्यापासून दूर रहा. बहुतांश जणांच्या घरात देव्हारा असतो पण त्यात असलेल्या देवांच्या मुर्तींची कधीच पूजा केलेली नसते. त्यामुळे देवघर हे नेहमीच स्वच्छ, सुंदर आणि पवित्र असावे. रोज सकाळ-संध्याकाळी देवासमोर दिवाबत्ती करावी. रोज एक तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा लावल्यास अगदी उत्तम. त्याचसोबत घरात प्रत्येक गुरुवारी धूप जाळावा. जुने जीर्ण किंवा खराब झालेले फोटो किंवा मुर्ती विधीसह विसर्जित कराव्यात.

नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यात देवघर झाडण्यासाठीचा झाडू ठेवावा. वायव्य कोपऱ्यात सहाण, चंदन ठेवावे. ईशान्य कोपऱ्यात पाण्याचे भांडे किंवा भरलेल्या तांब्याचा कलश असावा. दक्षिणेला तोंड करुन कोणत्याही देवाच्या तसबिरी किंवा मुर्त्या ठेवू नये. देवतांचे मुख एकमेकांसमोर येत असे ही ठेवू नये. पूजाघरास लाकडाचा उबंरठा आवश्यक करुन घ्यावा. दर पौर्णिमेला या उंबरठ्यास गोमूत्र हळद कालवून त्याचा लेप लावावा. स्रियांच्या मासिक पाळीवेळी देवघरात जाऊ नये. देवघरात बसून अभद्र बोलू नये.

हे देखील वाचा- आपल्या घराची वास्तू सदैव आनंदित राहण्यासाठी खास टीप्स

Vastu Tips
Vastu Tips

घरातील मंडळींनी अधिकाधिक नामस्मरण करावे. देवाला लावल्या जाणाऱ्या उदबत्त्याही मंद सुंगधीत असाव्यात. उग्र नसाव्यात. देवघरात नैवेद्य दाखवावा मात्र देवघरात बसून कधीच जेऊ नये. देवघरात जाण्यापूर्वी पाय धुवावेत. मद्यपान, मांस खाल्ले असेल तर देवघरात जाऊ नये. देवघरात जाण्यासाठी दोन दारे असावीत. देवघरात शिवलिंग असावे. पण शंकराचा फोटो शक्यतो नसावा. कारण शंकर भगवान हे स्मशानप्रिय आहेत, ते विरागी आहेत.(Vastu tips for deoghar)

भगवान शंकर यांच्या फोटोऐवजी तुम्ही शिवलिंग ठेवू शकता. पण त्याच्या टोकाची बाजू ही उत्तरेस असावी. देवघरात उभ्या मुर्त्या ठेवू नये. सर्व देव विराजमान झालेले असावेत. रोजच्या रोज पूजेवेळी घंटेचा किककिणाट करावा. या व्यतिरिक्त पूर्वापार शंख असेल तर तो पूजेत रोजच्या रोज पाणी भरुन ठेवावा. कोणत्याही देवघराचे जेवढे पावित्र्य राखले जाईल तेवढे आपल्या वास्तूमध्ये शांतता, समाधान लाभेल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.