Home » अर्थसंकल्प देशासाठी का महत्वाचा असतो? कोणती टीम तयार करते? अशा काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

अर्थसंकल्प देशासाठी का महत्वाचा असतो? कोणती टीम तयार करते? अशा काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

by Team Gajawaja
0 comment
Budget 2023
Share

प्रत्येक महिन्याला घर खर्चाचे एक बजेट तयार केले जाते. तेव्हा सुद्धा काही गोष्टींचा विचार केला जातो. जसे की, कोणत्या खर्चासाठी किती पैसे बाजूला काढायचे किंवा आपत्कालीन स्थितीसाठी किती पैसे असावेत अशा प्रकारचा विचार करुनच घरच्या महिन्याभराचे बजेट तयार होते. परंतु हे बजेट प्रत्येक व्यक्तीच्या मासिक उत्पन्नावर अवलंबून असते. अशाच प्रकारे जेव्हा देशाचा अर्थसंकल्प तयार केला जातो तेव्हाची प्रक्रिया अत्यंत महत्वपूर्ण असते. याची प्रक्रिया ही अर्थसंकल्प सादर करण्याच्या ५-६ महिन्यांआधीच सुरु होते. हजारो-लोक दिवस-रात्र एक करुन पूर्ण हिशोब करत असतात. भारतीय संविधानातील कमल ११२ नुसार,केंद्रीय अर्थसंकल्प हा एखाद्या वर्षासाठी सरकारच्या अंदाजे उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा असतो. (Union Budget Process)

अर्थसंकल्प बनण्यामागील उद्देश
अर्थसंकल्प बनवण्यादरम्यान सरकारचे लक्ष हे उत्पन्नाची साधन वाढवत योजनांसाठी पैसे जमा करणे, देशाच्या आर्थिक विकासाचा दर वाढवण्यासाठीच्या योजना, लोकांच्या आर्थिक स्थितीत बदलासह गरिबी आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी योजना तयार करण्याकडे असते. त्याचसोबत देशातील महत्वाची बांधकाम, रेल्वे, वीज, रस्ते यांच्यासाठी सुद्धा रक्कम एकत्रित करण्यासंदर्भात ही अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. सरकारच्या उत्पन्नाच्या प्रमुख साधनांमध्ये विविध प्रकारचे कर आणि महसूल, शासकीय शुल्क, दंड, दिलेले गेलेले व्याज अशा प्रकारचा समावेश असतो.

अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी सर्वांचे मत घेतले जाते
अर्थसंकल्प तयार करण्यासाठीच्या प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी अर्थ मंत्रालय गेल्या काही वर्षांपासून नागरिकांचे मतं मागते. त्याचसोबत अर्थ मंत्रालय उद्योगासंबंधित संघटना आणि पक्षांचे सुद्धा मतं मागतात.

Union Budget Process
Union Budget Process

कोण तयार करतं अर्थसंकल्प?
अर्थ संकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत अर्थ मंत्रालय, नीति आयोग आणि सरकारच्या अन्य मंत्रालयांचा समावेश असतो. अर्थ मंत्रालय प्रत्येक वर्षी खर्चाच्या आधारावर गाइडलाइन जारी करते. त्यानंतर मंत्रालयांना आपल्या मागण्या सांगाव्या लागतात. अर्थ मंत्रालयाचा बजेट डिविजनवर अर्थसंकल्प बनवण्याची जबाबदारी असते. हे डिविजन नोएडल एजेंसी असते.

बजट डिविजन सर्व मंत्रालय, राज्य, केंद्र शासित प्रदेश, स्वायत्त संस्था, विभाग आणि संरक्षण विभागाला सर्कुलर जारी करुन त्यांना पुढील वर्षाच्या अनुमानाबद्दल सांगण्यास सांगतात. मंत्रालये आणि विभागांच्या मागण्या आल्यानंतर अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागामध्ये यावर सखोल चर्चा होते.

या व्यतिरिक्त आर्थिक प्रकरणींमधील विभाग आणि महसूल विभाग अर्थशास्रज्ञ,उद्योगपती, शेतकरी आणि सिविल सोसायटी सारख्या हितधारकांसोबत बैठक होते. या दरम्यान, त्यांचे विचार ही ऐकले जातात. अर्थसंकल्पापूर्वीच्या बैठकांचा काळ संपल्यानंतर टॅक्स प्रस्तावांवर अंतिम निर्णय अर्थ मंत्र्यांसोबत घेतला जातो. अर्थसंकल्पाला अंतिम रुप देण्यापूर्वी प्रस्तावासंदर्भात पंतप्रधानांसोबत ही चर्चा केली जाते.

कोणत्या विभागाला किती मिळते रक्कम हे कसे ठरवले जाते?
अर्थसंकल्प तयार करण्यादरम्यान, प्रत्येक मंत्रालय आपल्या विभागाला अधिकाधिक फंड मिळावा याची प्रयत्न करत असतो. परंतु मर्यादित उत्पन्नामुळे सर्व मंत्रालयांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत. अशातच एखाद्या विभागाला किती रक्कमेची तरतूद करावी, यावर बातचीत करण्यासाठी अर्थ मंत्रालय ऑक्टोंबर-नोव्हेंबर दरम्यान, अन्य मंत्रांलयांसोबत बैठक घेतात. त्यामध्ये एक ब्लूप्रिंट तयार केली जाते. बैठकीत प्रत्येक मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी फंड मिळवण्यासाठी अर्थमंत्र्यांसोबत वाटाघाटी ही करतात.(Union Budget Process)

अत्यंत गोपनीय असतात अर्थसंकल्पाचे कागदपत्र
अर्थसंकल्पाचे कागदपत्र अत्यंत गोपनीय असता. बजेट तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान, अर्थ मंत्रालयाचे मुख्य अधिकरी ते अधीनस्थ कर्मचारी, स्टेनोग्राफर्स, टाइपराइटर्स, प्रिटिंग प्रेसचे कर्मचारी आणि अन्य लोक ही कार्यालयातच राहून काम करतात. गोपनीयता कायम रहावी म्हणून अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना आपल्या परिवाराशी बातचीत ही करायला दिली जात नाही. या दरम्यान, अर्थसंकल्प तयार करणारे आणि त्याच्या प्रकाशनासंदर्भातील लोकांवर ही गुप्तचर खात्याची करडी नजर असते. त्याचसोबत अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांचे भाषण हे अत्यंत सुरक्षित कागदपत्र असते. जे अर्थसंकल्प सादर होण्याच्या दोन दिवस आधी छापण्यासाठी पाठवले जाते.

हलवा सेरेमनी ही महत्वाची
अर्थसंकल्पासंबंधित कागदपत्रांची छपाई सुरु होण्यापूर्वी नॉर्थ ब्लॉक स्थित अर्थ मंत्रालयात हलवा सेरेमनी होते. ज्यामध्ये अर्थमंत्री अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेतील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हलवा देतात. ही सेरेमनी झाल्यानंकर अर्थसंकल्प सादर होई पर्यंत अर्थ मंत्रालयासंबंधित अधिकाऱ्यांना सात दिवसापर्यंत दूर ठेवले जाते. या दरम्यान, त्यांचा ही कोणाशी संपर्क ठेवला जात नाही. संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतरच त्यांना बाहेर येण्यास परवानगी असते.(Union Budget Process)

हे देखील वाचा- देशात अर्थसंकल्पाची सुरुवात कशी झाली होती?

राष्ट्रपतींची परवानगी घेऊनच अर्थसंकल्प सादर होतो
अर्थसंकल्पाचा पहिला ड्राफ्ट हा सर्वात प्रथम राष्ट्रपतींच्या समोर ठेवला जातो. त्यासाठी वापरला जाणारा कागद हा निळ्या रंगाचा असतो. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी केंद्र सरकारला राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतरच केंद्रीय मंत्रीमंडळाच्या समोर तो ठेवला जातो. नंतर संसदेच्या दोन्ही सदनात सादर केला जातो. सामान्य अर्थसंकल्प हा दोन हिस्स्यात विभागला जातो. पहिल्या हिस्स्यात सामान्य आर्थिक सर्वे आणि नीतिंबद्दलचा तपशील असतो. तर दुसऱ्या हिस्स्यात येणाऱ्या वर्षासाठी प्रत्येक आणि अप्रत्य करांसंदर्भातील प्रस्ताव असतो


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.