ट्विटरकडून अशी घोषणा करण्यात आली आहे की, १ एप्रिल पासून युजर्सच्या अकाउंटवरुन ब्लू टीक मार्क हटवण्यास सुरुवात केली जाणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर पडण्याची शक्यता आहे. कारण कंपनी वेरिफाइड अकाउंटसाठी जगभरात सब्सक्रिप्शन मॉडेल सुरु केले आहे. ऐवढेच नव्हे तर कंपनी वेरिफिकेशनसाठी वापरले जाणारे निळी टीक सुद्धा हटवू शकते. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये कंपनीने असे म्हटले की, १ एप्रिल पासून ट्विटर जगभरातील LegacyBlue ला बंद करण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल.(Twitter Blue Tick)
याचसोबत सर्व लिगेसी वेरिफाइड अकाउंटवरील ब्लू टीक हटवले जाणार आहे. दरम्यान, फ्री ब्लू टीक असणाऱ्या पैसे देऊन ट्विटर ब्लू टीकचे सब्सक्रिप्शन घेतल्यास तर ते हटवले जाणार नाही. मात्र लिगली वेरिफाइडचा टॅग हटवला जाईल.
खरंतर ट्विटरचे मालक झाल्यानंतर मस्क यांनी ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन जारी केले होते. ज्यासाठी युजर्सला शुल्क मोजावे लागणार असल्याचे स्पष्ट केले होते. ट्विटर ब्लू चे सब्सक्रिप्शन असणाऱ्या युजर्सला दीर्घ पोस्ट करण्याची सुविधा मिळते. या व्यतिरिक्त ब्लू टीक मिळते आणि त्याचसोबत ट्विटला एडिट करण्याचा ऑप्शन ही मिळतो.
आता एलन मस्क फ्री असणारे ब्लू टीक काढून टाकले जात आहेत. भारतात ट्विटर ब्लूच्या मोबाइल प्लॅनसाठी युजर्सला ९०० रुपयांचे पेमेंट करावे लागणार आहे. तर वेब वर्जनसाठी ६५० रुपयांचे शुल्क द्यावे लागणार आहे. याच दरम्यान एलन मस्क यांनी नुकत्याच फ्री अकाउंटवरुन एसएमएस आधारित टू फॅक्टर ऑथेंटिकेशन फिचर सुद्धा हटवले आहे. त्यामुळे जर तुम्हाला अकाउंटसाठी ब्लू टीक हवे असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला कमीत कमी ६५० रुपयांचे पेमेंट करावे लागणार आहे. अन्यथा ब्लू टीक हटवले जाईल.(Twitter Blue Tick)
हे देखील वाचा- iPhone युजर्सला आता एडिट करता येणार व्हॉट्सअॅप मेसेज
ट्विटरचा लिगेसी ब्लू चेक कंपनी सर्वाधिक जुने वेरिफिकेशन मॉडल आहे. या अंतर्गत सरकार, कंपन्या, ब्रँन्ड्स आणि ऑर्गेनाइजेशन, न्यूज ऑर्गेनाइजेशन आणि पत्रकार, मनोरंजन, स्पोर्ट्स आणि गेमिंग अॅक्टिव्हिटीज यांच्यासह अन्य लोकांचे अकाउंट वेरिफाइड केले जाते. भले एलन मस्क यांनी ट्विटरवर ब्लू टीकसाठी शुल्क वसूल करणार असल्याचे सांगितले आहे तरीही काही असे अकाउंट्स आहेत ज्यांच्याकडून कोणताही शुल्क घेतला जाणार नाही. तसेच जर तुम्ही एखाद्या वेरिफाइड संघटनेशी संबंधित असाल तरीही शुल्क आकारला जाणार नाही. आता ब्लू टीक ऐवजी गोल्डन आणि ग्रे टीकचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. हे टीक विविध अकाउंटच्या हिशोबाने दिले जातात.