खगोलशास्त्र अनेक आश्चर्यकारक माहितींनी युक्त आहे. त्यातच एक म्हणजे, धूमकेतू. बर्फापासून बनलेला आणि केरसुणीच्या आकारासारखा धूमकेतू हा खगोलशास्त्रामधील संशोधनचा विषय आहे. अंतराळात असणा-या धूमकेतूपैकी एक धूमकेतू चक्क 80,000 वर्षानंतर पुन्हा एकदा आकाशात दिसू लागला आहे. अत्यंत दुर्मिळ अशा या धूमकेतूचे दर्शन पुन्हा एकदा झाल्यानं खगोलशास्त्रज्ञांना आनंद झाला आहे. मात्र एकीकडे 80,000 वर्षानंतर दिसलेल्या या धूमकेतूचे हे आगमन अशुभ असल्याचे भविष्यकारांचे मत आहे. Tsuchinshan-ATLAS नावाचा हा धूमकेतू 11 ऑक्टोबरपासून उत्तर गोलार्धात दिसत आहे. या धूमकेतूचा शोध जानेवारी 2023 मध्ये लागला होता. या धूमकेतूची उच्च लंबवर्तुळाकार कक्षा आहे, ज्यामुळे तो एकदाच दृश्यमान होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही उपकरणाशिवायही हा धूमकेतू दिसत आहे. (Tsuchinshan-ATLAS)
खगोलशास्त्राचा अभ्यास करणा-यांसाठी ही सर्वात आनंदाची बातमी आहे. हा धूमकेतू पाहायचा असल्यास 14 ते 24 ऑक्टोबर ही सर्वोत्तम वेळ असून मध्यरात्रीनंतर केव्हाही आकाशात दिसणार आहे. धूमकेतू साध्या डोळ्यांनी जरी दिसणार असला तरी, तो अधिक चांगल्यापद्धतीनं बघण्यासाठी दुर्बिणीचा वापर केल्यास त्यातील बारकावेही टिपता येणार आहेत. 80,000 वर्षांपूर्वी दिसलेला हा धूमकेतू, अंधुक शेपटी असलेल्या अंधुक ताऱ्यासारखा आकाशात दिसत आहे. आकाशात सध्या 80,000 वर्षापूर्वी आलेला अजूबा पुन्हा एकदा प्रकाशमान झाला आहे. हा अजूबा म्हणजे एक धूमकेतू आहे. यासोबत धूमकेतू म्हणजे, नेमकं काय हेही जाणण्याची गरज आहे. (International News)
धूमकेतू हे सूर्यमालेतील बर्फाळ पिंड आहेत. हे लघुग्रहांसारखे आहेत, परंतु त्यात बर्फाचे प्रमाण अधिक असते. धूमकेतू सूर्यापासून दूर तयार झाले असतात. पण हेच धूमकेतू सूर्याजवळ येताच ते तापतात आणि वायू आणि धूळ सोडतात, ज्यामुळे त्यांची शेपटी तयार होते. मग हे धूमकेतू सूर्याच्या नियंत्रणाखाली जाऊन शंकूच्या आकाराच्या मार्गाने फिरत राहतात. धूमकेतूंच्या कक्षेवर बृहस्पतिचा जास्त प्रभाव असतो, त्यामुळे त्यांची कक्षा बदलते. आता Tsuchinshan-ATLAS नावाचा हा धूमकेतू या पुढील काही दिवसात सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर आणि सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात दिसणार आहे. Tsuchinshan-ATLAS हा अवकाशात असलेल्या सर्वात दुर्मिळ धूमकेतूपैकी एक आहे. (Tsuchinshan-ATLAS)
11 ऑक्टोबरपासून हा धूमकेतू दृश्यमान झाला आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करणा-यांसाठी दुर्मिळ संधी मिळाली आहे. संध्याकाळी तेजस्वी शुक्रता-याजवळ हा धूमकेतू दिसत आहे. हा धूमकेतू ज्यांना बघायचा आहे, त्यांनी सूर्यास्तानंतर लगचेच आकाशाचे निरिक्षण केले तर त्यांना तो पश्चिम क्षितिजावर दिसत आहे. सूर्यास्तानंतर सुमारे 40 मिनिटे, पश्चिम क्षितिजाच्या दिशेनं बघितल्यास Tsuchinshan-ATLAS धूमकेतू दिसत आहे. अधिक सोप्यारितीनं त्याला शोधायचे असेल तर शुक्रता-याच्या दिशेला या धूमकेतूचे दर्शन होत आहे. Tsuchinshan-ATLAS हा धूमकेतून जसजसा आठवडा पुढे जाईल तसा तो अधिक दूर जाणार असून त्याला बघण्यासाठी दुर्मिळ वा अन्य प्रगत साधनांचा वापर करावा लागणार आहे. (International News)
Tsuchinshan-ATLAS हा धूमकेतू 2023 च्या सुरुवातीला चीनच्या पर्पल माउंटन ऑब्झर्व्हेटरी आणि दक्षिण आफ्रिकेच्या लघुग्रह टेरेस्ट्रियल-इम्पॅक्ट लास्ट अलर्ट सिस्टमच्या टीम्सद्वारे शोधला गेला. हा धूमकेतू जसजसा सूर्याजवळ जाईल, तसे उष्णतेमुळे बर्फाचे बाष्पीभवन होऊन लाखो मैलांपर्यंत त्याचा विस्तार होईल, असे संशोधकांचे मत आहे. तेव्हा नेत्रदीपक अशी शेपटी रुपात हा धूमकेतू दिसणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या अखेरीस हा धूमकेतू क्षीण होऊन उघड्या डोळ्यांनी बघता येणार आहे. तर नोव्हेंबर महिन्यापासून Tsuchinshan-ATLAS धूमकेतू बघण्यासाठी दुर्बिणीचा वापर करावा लागणार आहे. 28 सप्टेंबर रोजी हा धूमकेतू सूर्याच्या अगदी जवळ पोहोचणार आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास करणा-यांसाठी ही सर्वात सुवर्णसंधी मानली गेली आहे. (Tsuchinshan-ATLAS)
======
हे देखील वाचा : उमर बिन लादेनला फ्रान्सने केले गेट आऊट
======
असे असले तरी 80,000 वर्षानंतर दिसणा-या या धूमकेतूचे आगमन हे अशुभ असल्याचे मत काही ज्योतिषजाणकारांनी व्यक्त केले आहे. धूमकेतूचे आगमन म्हणजे, युद्धाची चाहूल अशी धारणा आहे. त्यातच जगावर सर्वत्रच युद्धजन्य परिस्थिती आहे. अशातच अत्यंत दुर्मिळ धूमकेतू पुन्हा प्रकाशमान झाल्यानं हा एक अशुभ संदेश असल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि ताऱ्यांच्या स्थितीचा पृथ्वीवर घडणाऱ्या घटनांवर परिणाम होतो, असे म्हणण्यात आले आहे. धूमकेतू दिसल्यास राजकीय उलथापालथ होते, असेही जाणकारांचे म्हणणे आहे. त्यातच आता दिसत असलेल धूमकेतू हा 80,000 हजार वर्षानंतर दिसत आहे, त्यामुळे त्याच्या दिसण्याणे जसा आनंद व्यक्त होत आहे, तशीच भीतीही व्यक्त होत आहे. (International News)
सई बने