Home » चांगली झोप कशी मिळेल हे जाणून घेण्यासाठी आजचा दिवस आहे खास

चांगली झोप कशी मिळेल हे जाणून घेण्यासाठी आजचा दिवस आहे खास

by Team Gajawaja
0 comment
Sleep Day
Share

झोपायला कोणाला आवडत नाही….हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. कारण भरपूर झोप काढायची संधी मिळाली, तर ती कोणीही सोडत नाही.  चांगल्या दहा-बारा तासांच्या झोपेची मजाच काही और असते.  पण झोप जास्त घेतली तरी त्याचा त्रास होतो आणि झोप कमी झाली तरी ते आरोग्यास तापदायक ठरते,  याची माहिती आहे का…झोपेबाबत हे सर्व सांगण्यामागे एक कारण आहे, ते म्हणजे आज, 17 मार्च हा जागतिक झोप दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय.  अर्थात या दिवशी फक्त झोपा काढायच्या नाहीत, तर झोप आपल्या आरोग्यास किती उपयोगी आहे, आणि चांगली झोप कशी मिळेल याची माहिती करुन घ्यायचा आजचा दिवस आहे(Sleep Day). चांगली झोप ही उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते.  2008 रोजी पहिल्यांदा जागतिक झोपेचा दिवस साजरा करण्यात आला. वर्ल्ड स्लीप सोसायटीने यासाठी पुढाकार घेतला आहे.  दरवर्षी स्लीप डे साठी एक थीमही जाहीर करण्यात येते यावर्षीची थीम, स्लीप इज एसेंशियल फॉर हेल्थ ही आहे. (Sleep Day)

जागतिक झोप दिवस साजरा (Sleep Day) करण्यामागचे कारण जाणणे गरजेचे आहे.  आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी स्वस्थ झोप ही महत्त्वाची ठरते.  मानवी आरोग्याची गुरुकिल्लीच म्हणून झोपेकडे बघितलं जातं. पण अनेकांना झोप लागत नाही आणि काहींना ती खूपच लागते. अशात समतोल ठेवणे गरजेचे असते.  आणि हाच समतोल काय आहे, हे सांगण्याचा प्रयत्न या जागतीक झोप दिवसानिमित्त करण्यात येतो.  आरोग्यासाठी झोप किती महत्त्वाची आहे आणि ती कमी किंवा जास्त असल्यास काय नुकसान होऊ शकते,  याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठीच हा दिवस साजरा केला जातो.  किती तासांची झोप योग्य आहे आणि किती नाही, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात.   आधुनिक जीवनशैलीमुळे झोपेचे ताळतंत्र बिघडले आहे.  त्यामुळे आजारपणाचे विशेषतः मानसिक आजारपणाचे प्रमाण वाढले आहे.   त्यामुळे झोपेसाठी वर्ल्ड स्लीप सोसायटीने पुढाकार घेत जनजागृती  करायला सुरुवात केली.  याचाच एक भाग म्हणजे जागतीक झोप दिवस.  वर्ल्ड स्लीप सोसायटीने 2008 मध्ये प्रथमच जागतिक झोप दिवस साजरा केला.  वर्ल्ड स्लीप सोसायटीचे जुने नाव वर्ल्ड असोसिएशन ऑफ स्लीप मेडिसिन (WASM) होते.  ही एक ना नफा संस्था आहे. वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तज्ञ यामध्ये काम करतात आणि झोपेशी संबंधित समस्यांचा अभ्यास करतात.(Sleep Day)

झोप आणि आपले चांगले आरोग्य दोन्ही गोष्टी समान आहेत. कमी झोपल्याने शरीरावर वाईट परिणाम होतात. तसेच जास्त झोप घेतली तरी शरीरावर त्याचा परिणाम होतो. झोप पूर्ण झाली नाही तर शरीराला खूप थकवा जाणवतो असे अनेकदा दिसून येते. शरीराची उर्जा पातळीही खूप कमी होते.  आरोग्य तज्ञ सांगतात की, प्रौढ व्यक्तींनी किमान 8 तासांची झोप पूर्ण केली पाहिजे (Sleep Day).  त्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक असा आराम मिळतो.  झोपेची कमतरता आरोग्यास हानी पोहोचवते.  एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जे लोक 5 तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना कोरोनरी आर्टरी डिसीज (PAD) चा धोका असतो.  संशोधकांचे म्हणणे आहे की, जगातील 200 दशलक्षाहून अधिक नागरिकांना कोरोनरी आर्टरी डिसीज चा धोका  आहे.  या आजारात हृदयापासून पायांपर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या धमन्या अरुंद होतात किंवा ब्लॉक होतात ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो. अशा स्थितीत हृदयविकाराचा धोका वाढ शकतो.  जशी कमी झोप हानिकारक आहे, तशीच जास्त झोपही हानिकारक आहे.  जास्त झोपल्याने व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहत नाही. त्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार यांसारखे आजार होतात.  दररोज अनेक तास विनाकारण झोप घेत असल्यास त्याचे शरीरावर किती नकारात्मक परिणाम होतात.  जास्त झोप घेतल्यास लठ्ठपणा येण्याची दाट शक्यता असते. त्याचा पचनसंस्थेवरही परिणाम होतो.  त्याचबरोबर उच्चरक्तदाब, मधुमेह यांसारखे आजार वाढू शकतात.  रक्तातील साखरेची पातळीही वाढू लागते. (Sleep Day)

==========

हे देखील वाचा : लग्नापूर्वी फर्टिलिटी चाचणी… वादात पडला शाही परिवार

==========

झोपेची गरज व्यक्तीच्या वयावर अवलंबून असते. लहान मुलाला जास्त झोप लागते.  प्रौढ व्यक्तीसाठी सरासरी 8 तासांची झोप चांगली मानली जाते.   योग्य प्रकारे झोप घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी, इन्सुलिनची पातळी, कोलेस्टेरॉल, लेप्टिन, घरेलिन आणि कॉर्टिसोलची पातळी यांसारखे हार्मोन्स शरीरात स्थिर राहतात.  हे हार्मोन्स शरीराच्या सर्व कार्यांसाठी आवश्यक असतात. एकूण झोप ही शरीरास आवश्यक असते, पण किती तास झोपायचे आणि कधी झोपायचे हे महत्त्वाचे आहे.  त्यासाठीच आजचा दिवस महत्त्वाचा आहे.  आपल्या शरीराला वयानुसार किती झोप घेणे आवश्यक आहे, ते जाणून घ्या आणि निवांत झोपा.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.